Maharashtra News LIVE : माजी पंचायत समिती सदस्याचे गोदिंयात शोले स्टाईल आंदोलन

| Updated on: Apr 26, 2024 | 12:20 AM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 24 एप्रिल 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra News LIVE : माजी पंचायत समिती सदस्याचे गोदिंयात शोले स्टाईल आंदोलन

महाराष्ट्रात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. उद्धव ठाकरे यांची आज हदगाव येथे जाहीर सभा पार पडणार आहे. हिंगोली लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ हदगावमध्ये सकाळी 11:30 वाजता जाहीर सभा होईल. महाविकास आघाडीचे ठाकरे सेनेचे नागेश पाटील आष्टीकर तर महायुतीकडून शिंदे शिवसेनेचे बाबुराव कदम कोवळीकर यांच्यामध्ये हिंगोली लोकसभेत लढत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची जाहीर सभा आहे. सोलापुरातील एक्झिबिशन ग्राउंडवर राहुल गांधींची जाहीर सभा पार पडणार आहे. 12 वर्षानंतर राहुल गांधी सोलापूर मध्ये येत आहेत .यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Apr 2024 03:00 PM (IST)

    EVM आणि VVPAT बाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण

    सकाळी कोर्टाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याचिकाकर्त्यांच्या वकिलांची बाजू सुद्धा न्यायालयाने ऐकली. कोर्टाने आधीच हा निकाल राखून ठेवला होता मात्र कोर्टाला काही शंका असल्याने त्याची उत्तर आज त्यांनी समजून घेतली. कोर्टाने हा निकाल आता राखून ठेवला आहे. पुढच्या काही दिवसात सुप्रीम कोर्ट या प्रकरणाचा निकाल देणार आहे.

  • 24 Apr 2024 02:50 PM (IST)

    निवडणुकीचं भाकीत सांगा, बक्षिस मिळवा

    सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. अनेक राजकीय नेते देखील ह्या फसवणुकीला बळी पडतात, त्यामुळे अज्ञानी आणि भाबडया लोकांच्यात गैरसमज पसरतात आणि अंधश्रध्दा निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने देशातील सर्वच ज्योतिषांना निवडणूक निकालाचे अचूक भविष्य वर्तवून एकवीस लाख रुपये बक्षिस जिंकण्याचे आव्हान दिले आहे अशी माहिती अनिस ने दिली आहे. त्यासाठीची आव्हान प्रक्रिया व प्रश्नावली देखील महाराष्ट्र अंनिसने जाहीर केली आहे.

  • 24 Apr 2024 02:40 PM (IST)

    सदाभाऊंची पवारांवर टीका

    पवार साहेब जर तुमची जात वेगळी असती, तुमचेही आडनाव फडणवीस असते तर तुम्हालाही कोणी हुंगले नसते, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केली.

  • 24 Apr 2024 02:30 PM (IST)

    भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

    देशात पुन्हा मोदीजींच सरकार आलं, तर येणाऱ्या काळात बाबरचा बच्चा-बच्चा जय श्रीराम बोलेलं. उदयपूरमध्ये एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करताना भाजपचे नेते सीपी जोशी यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.

  • 24 Apr 2024 02:20 PM (IST)

    पीएम किसानचा हप्ता जमा होणार

    PM Kisan योजनेचा 17 वा हप्ता ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जमा होणार आहे. मे महिन्यात अखेरच्या सत्रात हा हप्ता पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

  • 24 Apr 2024 02:10 PM (IST)

    शिर्डी लोकसभेत तिरंगी लढत

    शिर्डी लोकसभा मतदार संघात तिरंगी लढत होत आहे. वंचित आघाडीच्या वतीने उत्कर्षा रुपवते मैदानात उतरल्या आहेत. आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्या जाहीर प्रचार सभा घेतील.

  • 24 Apr 2024 02:00 PM (IST)

    पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन

    15 व्या वित्त आयोग कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. त्याची चौकशी करण्याच्या मागणीसाठी गोंदियात पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. प्रशासनाने विहित मुदतीत भ्रष्टाचाराची चौकशी न केल्याने माजी पंचायत समिती सदस्य टाकीवर चढले.

  • 24 Apr 2024 01:55 PM (IST)

    केशव उपाध्ये यांचे मोठे विधान

    देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे, असं वक्तव्य याआधी मनमोहन सिंहानी केलं होतं. या घटकासाठी काँग्रेसचं प्रेम उतू जात आहे. केवळ एका विशिष्ट समाजाची मतं मिळवण्यासाठी लागूनचालन केलं जात आहे, असे विधान केशव उपाध्ये यांनी केले आहे.

  • 24 Apr 2024 01:42 PM (IST)

    रावेर लोकसभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

    आज रावेर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील मोठ्या शक्ती प्रदर्शनात उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या मतदार संघाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत

  • 24 Apr 2024 01:34 PM (IST)

    जालना लोकसभेचे उमेदवार कल्याण काळे यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

    जालना लोकसभेचे उमेदवार कल्याण काळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्यानंतर जालना शहरातील जुना मोंढा भागात प्रचार सभा घेण्यात आली.

  • 24 Apr 2024 12:50 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही- शरद पवार

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. मोदींनी पेट्रोलची किंमत कमी केली नाही. मोदींनी सामान्यांची महागाईतून सुटका केली नाही. गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. देशात आज मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. गेल्या दहा वर्षांत मोदींनी काही केलं नाही, आता ते आमच्यावर टीका करतात, असं शरद पवार म्हणाले.

  • 24 Apr 2024 12:40 PM (IST)

    धैर्यशील मोहिते पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका

    धैर्यशील मोहिते पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे. "सोलापूर जिल्ह्याच्या विकासाची अवस्था ही हाफ चड्डी झाली आहे. सोलापूर जिल्हा पुन्हा हाफ चड्डी होऊ देणार नाही. सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादीमय केल्याशिवाय राहणार नाही," असं ते म्हणाले.

  • 24 Apr 2024 12:30 PM (IST)

    माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्यासाठी राज्य सरकारला परवानगी

    पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला परवानगी दिली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात 20 रिक्षा सुरू कराव्यात आणि या रिक्षा हातरिक्षा चालकांनाच द्याव्यात, असे आदेशही न्या. भूषण गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

  • 24 Apr 2024 12:20 PM (IST)

    रणवीर सिंह 'डीपफेक' प्रकरणात गुन्हा

    अभिनेता रणवीर सिंहच्या डीपफेक व्हिडीओप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला. रणवीरच्या वडिलांच्या तक्रारीवरून या प्रकरणी एक्स या सोशल मीडियावरील एका युजरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर अधिक तपास करत आहे.

  • 24 Apr 2024 12:10 PM (IST)

    मुंबईत तापमानाचा पारा घसरला

    गेले काही दिवस तापमानात घट झाल्यामुळे मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरी हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे उकाडा कायम आहे. दरम्यान पुढील चार-पाच दिवस उन्हाचा तडाखा जाणवणार नाही. मात्र आर्द्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे.

  • 24 Apr 2024 11:55 AM (IST)

    Live Update | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचे पुन्हा आंदोलन

    विद्यापीठाच्या परीक्षा विभागा विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून ठिय्या आंदोलनाला सुरुवात... पुणे विद्यापीठाच्या परीक्षा होऊन निकाल लागल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी फोटोकॉपी साठी अर्ज केला होता, त्यांना दीड महिना उलटून गेल्यानंतर सुध्दा फोटोकॉपी मिळालेली नाही विद्यार्थ्यांचा आरोप... परीक्षा विभागात विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाबाजी

  • 24 Apr 2024 11:42 AM (IST)

    Live Update | वसंत मोरे आज भरणार उमेदवारी अर्ज

    पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे आज भरणार उमेदवारी अर्ज... पुण्यातील कात्रज भागातून मोठे शक्ती प्रदर्शन करत वसंत मोरे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले... बाईक आणि कार रॅली काढून वसंत मोरे यांच्याकडून शक्ती प्रदर्शन...

  • 24 Apr 2024 11:30 AM (IST)

    Live Update | गद्दारी विरुद्ध प्रचंड राग, बेरोजगारी महागाईवर बोलायला तयार नाही - जितेंद्र आव्हाड

    जळगाव लोकसभा मतदारसंघात एकंदरच भाजपच्या विरोधात वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे... गद्दारी विरुद्ध प्रचंड राग, बेरोजगारी महागाईवर बोलायला तयार नाही... पहिल्या फेरीत निवडणुकीचे वातावरण विरोधात जात असल्यामुळे लगेच हिंदू मुस्लिम सुरू केलं... पहिल्या टप्प्यात 78 जागा धोक्यात असल्यामुळे भाजप हिंदू मुस्लिम राजकारण करतंय... असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

  • 24 Apr 2024 11:20 AM (IST)

    Live Update | शरद पवार गटाचा उद्या जाहीरनामा प्रसिद्ध होणार

    शरद पवार गटाचा उद्या जाहीरनामा प्रसिद्ध होणार... उद्या शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत होणार प्रकाशन.. उद्या पुण्यात कार्यक्रमचं आयोजन करण्यात आलं आहे...

  • 24 Apr 2024 11:04 AM (IST)

    Live Update | मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज जाहीर सभा

    माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज जाहीर सभा... माढा तालुक्यातील मोडनिंब येथे सभा पहिली सभा पार पडतेय... या सभेसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील सभास्थळी दाखल झालेत.

  • 24 Apr 2024 11:00 AM (IST)

    काँग्रेस नेते राहुल गांधी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर, आज सोलापुरात जाहीर सभा

    काँग्रेस नेते राहुल गांधी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आज सोलापुरात होणार जाहीर सभा. काँग्रेसच्या सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आज राहुल गांधींची जाहीर सभा पार पडणार आहे. शहरातील मरीआई चौकातील एक्झिबिशन मैदानावर जाहीर सभा पार पडेल.

  • 24 Apr 2024 10:50 AM (IST)

    भाजपने शिवेसेनेच्या सातबाऱ्यावर गद्दारांचं नाव लिहीलं - उद्धव ठाकरे

    भाजपने शिवेसेनेच्या सातबाऱ्यावर गद्दारांचं नाव लिहीलं अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

    देशात हुकूमशाहीविरोधातील लाट आहे. हे घटना, संविधान बदलतील अशी लोकांमध्ये भीती आहे.

  • 24 Apr 2024 10:36 AM (IST)

    जालना लोकसभेसाठी आज कल्याण काळे उमेदवारी अर्ज दाखल करणार

    जालना लोकसभेसाठी आज कल्याण काळे उमेदवारी अर्ज भरतील.  काँग्रेसचे कल्याण काळे महाविकास अघडीचे जालना लोकसभेचे उमेदवार आहेत. 2009 मध्ये कल्याण काळे यांनी रावसाहेब दानवे विरोधात दिली होती लढत, कल्याण काळे फक्त साडेआठ हजार मतांनी पराभूत झाले होते.

  • 24 Apr 2024 10:15 AM (IST)

    नांदेड - शिवाजी कांबळे यांची पुन्हा घरवापसी

    नांदेड - धाराशिवचे भाजपाचे माजी खासदार शिवाजी कांबळे आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रेवश करणार. शिवाजी कांबळे हे सध्या भाजपाच्या प्रदेश कमिटी मध्ये असल्याची माहिती. शिवाजी कांबळे यांची पुन्हा घर वापसी

  • 24 Apr 2024 10:06 AM (IST)

    पुरंदर मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का

    पुरंदर मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने काँग्रेसला धक्का बसला आहे.  संभाजी कुंजीर यांनी रात्री अजित पवारांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश. कुंजीर यांच्यासोबत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा अजित पवार गटात प्रवेश झाला.  संभाजी कुंजीर यांच्या पक्ष प्रवेशामुळे पुरंदरमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली

  • 24 Apr 2024 09:53 AM (IST)

    वाशिममध्ये शेतकऱ्यांचे नुकसान

    वाशिमच्या कारंजा तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळं मेहा येथील शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. मोठ्या कष्टानं फुलवलेली चार एकर पपईची बाग उध्वस्त झालीयं. शेतकरी नरेंद्र मोतीराम वानखडे यांनी एक वर्षाआधी चार एकर क्षेत्रात पाच हजार रोपे लावून त्याचे संगोपन केलं होतं. मात्र या वादळी वाऱ्यामुळं लाखों रुपयांचं नुकसान झालं.

  • 24 Apr 2024 09:42 AM (IST)

    दुसरा टप्पा, प्रचाराचा आज शेवटचा दिवस

    दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. आज विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, अकोला आणि बुलडाणा मतदारसंघातील प्रचारतोफा थंडावणार आहे. त्यापूर्वी अमरावतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची खा. नवनित राणा यांच्यासाठी सभा होणार आहे.

  • 24 Apr 2024 09:22 AM (IST)

    पोहण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू

    मावळ तालुक्यातील कासारसाई धरणात दुपारी पोहायला गेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. माधव सिंग असे बुडाले तरुणांचे नाव आहे. माधव कासारसाई धरणात दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

  • 24 Apr 2024 09:05 AM (IST)

    शिवाजी पार्कवर धुळीचा नागरिकांना त्रास

    दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरील धुळ, गर्दुल्यांचा वावर यामुळे मॉर्निंग वॉकला येणारी नागरिक, स्थानिक रहिवाशी हैराण झाले आहेत. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, वार्ड ऑफिसर यांच्यासोबत मैदान परिसरातील नागरिकांच्या बैठका ही झाल्या आहेत. पण कोणीही याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे आता नागरिक हैराण झाले आहेत.

  • 24 Apr 2024 08:59 AM (IST)

    Maharashtra News : पिंपरी चिंचवडमध्ये 25 लाखांची रोकड जप्त

    पिंपरी चिंचवडमध्ये 25 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 10.15 च्या सुमारास वाकड हद्दीत ही कारवाई करण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीत एका वाहनात ही रक्कम आढळली. निवडणूक आयोगाचे कर्मचारी आणि पोलिसांना संशय आल्यानं, या वाहनाची तपासणी करण्यात आली होती. ऐन निवडणुकीच्या काळात ही रक्कम आढळल्यानं खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्ती स्थानिक असल्याची प्राथमिक माहिती निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली आहे.

  • 24 Apr 2024 08:47 AM (IST)

    Maharashtra News : मावळमध्ये पोहायला गेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

    पुणे जिल्हा मावळ तालुक्यातील कासारसाई धरणात दुपारी पोहायला गेल्या तरुणाचा बुडून मृत्यू. माधव सिंग असे बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. माधव कासारसाई धरणात दुपारच्या सुमारास पोहण्यासाठी गेला होता, त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. वन्यजीव रक्षक मावळ संस्था अपदा मित्र मावळ शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेच्या सदस्यांनी हे शोधकार्य करत माधवचा मृतदेह बाहेर काढला.

  • 24 Apr 2024 08:23 AM (IST)

    Maharashtra News : शरद पवार साहेबांचे मी आभार मानतो - बच्चू कडू

    "आमच्या रॅलीत शेतकरी, शेतमजूर 70 हजार पेक्षा जास्त संख्येने उपस्थित राहतील. शरद पवार साहेबांचे मी आभार मानतो. हा लोकशाहीचा खून आहे. आमची परवानगी नाकारून भाजपला वेळेवर परवानगी दिली. संघर्ष कोणी सुरू केला हे मुख्यमंत्र्यांनी पाहले पाहिजे. रवी राणा बदमाश आहे. या संघर्षात आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न होता. अमरावती पोलीस आयुक्त रेड्डी हे युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष असल्यासारखे वागतात. अमरावती शहराचा सत्यानाश करून टाकला. कार्यकर्त्यांची बैठक घेऊन निर्णय घेऊ. आमच्या उमेदवाराचा विजय निश्चित आहे. अमरावती शहरात दररोज तीन-तीन कोटींचा जुवा खेळला जातो" असा आरोप बच्चू कडू यांनी केला.

  • 24 Apr 2024 08:18 AM (IST)

    Maharashtra News : काँग्रेस नेते राहुल गांधी आज सोलापूर दौऱ्यावर

    काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची जाहीर सभा. सोलापुरातील एक्झिबिशन ग्राउंडवर राहुल गांधींची जाहीर सभा पार पडणार आहे. 12 वर्षानंतर राहुल गांधी सोलापूर मध्ये येत आहेत. राहुल गांधी यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू. दुपारी साडेतीन वाजता राहुल गांधी सोलापुरात दाखल होणार. राहुल गांधी सोलापुरातून भाजपवर कशा पद्धतीची टीका करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले.

Published On - Apr 24,2024 8:17 AM

Follow us
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.