Maharashtra Political News live : श्रीकांत शिंदे आज कल्याणमधून भरणार उमेदवारी अर्ज

| Updated on: May 02, 2024 | 10:15 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 2 मे 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Political News live : श्रीकांत शिंदे आज कल्याणमधून भरणार उमेदवारी अर्ज

समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यानं भीषण अपघात. वाशिमच्या कारंजा समृद्धी महामार्गावरील टोलनाक्या जवळून काही अंतरावर नागपूरकडे जातांना घडली घटना. या अपघातात एक ठार तर दोन गंभीर जखमी. ट्रक चालक बराच वेळ ट्रकमध्ये पडला होता अडकून. शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यश. अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल. दोन्ही जख्मींना तात्काळ कारंजा ग्रामीम रुग्णालयात हलविण्यात आले. महामार्गावर पोलीस घटनास्थळी दाखल. राज्यातील 13 जिल्ह्यात पेसा शिक्षक भरतीला मुहूर्त कधी मिळणार? पेसा शिक्षक भरतीची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित. त्यावर ७ मे ला होणार सुनावणी. जवळपास साडे चार पेसा क्षेत्रात रिक्त आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी भरती करावी अशी मागणी. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 May 2024 05:52 PM (IST)

    धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशाच्या संबलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल

    केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओडिशाच्या संबलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. नामांकनापूर्वी प्रधान यांनी सुमारे चार किमी लांबीचा रोड शोही केला. रोड शो सुरू करण्यापूर्वी समलेश्वरी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.

  • 02 May 2024 05:37 PM (IST)

    आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू : अखिलेश यादव

    समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव म्हणाले की, आमचे सरकार आल्यावर आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. जर ते श्रीमंत लोकांचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करू शकत असतील तर आम्ही लाखो शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू.

  • 02 May 2024 05:25 PM (IST)

    सोनिया गांधी उद्या राहुल-प्रियांकासोबत अमेठी-रायबरेलीला जाण्याची शक्यता

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी अमेठी आणि रायबरेलीला भेट देणार आहेत. मात्र, तिन्ही नेत्यांच्या जाण्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

  • 02 May 2024 05:10 PM (IST)

    अतिक अहमद यांचा मुलगा अली अहमद याच्या खटल्याची सुनावणी पुढे ढकलली

    माफिया अतिक अहमदचा मुलगा अली अहमद याच्या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. बुधवारी जिल्हा न्यायालयात वकील संघाच्या संपामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. कोर्ट आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 मे रोजी करणार आहे.

  • 02 May 2024 03:57 PM (IST)

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर

    नाशिकच्या निलगिरी बागेतील हेलिपॅडवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाच मिनिटांपासून नाशिकमधील शिवसेना पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. मंत्री दादा भुसे , आमदार सुहास कांदे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासोबत केली हेलीपॅडवर चर्चा झाली  आहे.

  • 02 May 2024 03:45 PM (IST)

    प्रकाश आंबेडकर बार्शीमध्ये दाखल

    वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बार्शीमध्ये दाखल होत आहे. उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारार्थ बार्शीत जाहीर सभा होतेय. बार्शीतील पांडे चौकामध्ये जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

  • 02 May 2024 03:30 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबारमध्ये जाहीर सभा

    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नंदुरबार मध्ये जाहीर सभा होणार आहे.  भाजपाचे उमेदवार डॉ. हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी ७ मेला नंदुरबार शहरात येणार आहेत. नरेंद्र मोदी यांची सभेसाठी जागेच नियोजन केलं जात आहे. नरेंद्र मोदी हे नंदुरबार जिल्ह्यात येत असल्यामुळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

  • 02 May 2024 03:15 PM (IST)

    पुण्यात महायुतीची बैठक

    शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीकडून भाजपा नेते प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. पुण्याच्या चाकण इथं भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उमेदवार शिवाजी आढळराव पाटलांसह भोसरीचे आमदार महेश लांडगे, दौंड चे आमदार राहुल कुल , प्रदीप कंद आणि इतर जिल्ह्यातील महत्त्वाचे तीनही पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

  • 02 May 2024 01:41 PM (IST)

    खासदार सुभाष भामरे यांच्या प्रचारार्थ युवा मोर्चा रिंगणात

    भाजप युवा मोर्चाच्या वतीने खंडेराव मंदिरात आरती करून प्रचाराचा शुभारंभ. बाजारपेठेत मतदारांच्या गाठी भेट करत प्रचाराचे पत्रक वाटप. भाजप युवा मोर्चाचे अनेक कार्यकर्ते प्रचारासाठी देताय घरोघरी भेट..

  • 02 May 2024 01:21 PM (IST)

    भूषण पाटील यांचे मोठे विधान

    हजारोच्या संख्येने अर्ज दाखल करण्यासाठी लोक दाखल झालेत. भाजपविरोधात किती राग आहे हेच यातून दिसतंय. आज उत्तर मुंबईतून हायफाय नेत्याला भाजपनं उतरवलंय, असे भूषण पाटील यांनी म्हटले.

  • 02 May 2024 01:02 PM (IST)

    मनसे नेते अभिजीत पानसे आणि गिरीश महाजन यांच्यात अर्धा तास चर्चा

    नाशिकमध्ये राज ठाकरेंच्या सभेचे नियोजन. महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मनसेचे नेते नाशिकमध्ये. थोड्याच वेळात महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल होणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देखील राहणार उपस्थित

  • 02 May 2024 12:50 PM (IST)

    नाशिक- भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार

    नाशिक- भाजपाचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हरिश्चंद्र चव्हाण हे भाजपचे माजी खासदार आहेत. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ते भाजपपासून दूर आहेत. नाराज हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

  • 02 May 2024 12:40 PM (IST)

    महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज दाखल करताना दादा भुसेंची प्रतिक्रिया

    "महायुतीच्या उमेदवारांचा आज आम्ही अर्ज दाखल करणार आहोत. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. पूर्ण ताकदीनं निवडणूक लढणार आणि जिंकणार आहोत. पंतप्रधान मोदींनी केलेले काम जनतेसमोर मांडणार आहोत. महायुतीचे कार्यकर्ते वर्षभर लोकांच्या संपर्कात असतात. त्याचा देखील आम्हाला निवडणुकांमध्ये निश्चित फायदा होणार, असं दादा भुसे म्हणाले.

  • 02 May 2024 12:30 PM (IST)

    मे महिन्यातही उष्णतेची लाट कायम, हवामान विभागाचा इशारा

    मे महिन्यातही देशाच्या बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम मध्य प्रदेश, दक्षिण राजस्थान, गुजरात या भागात या महिन्याचे 8 ते 11 दिवस तीव्र उष्णतेचे असतील, असा इशारा देण्यात आला आहे.

  • 02 May 2024 12:20 PM (IST)

    कोकण रेल्वेवर 29 मेपर्यंत मेगाब्लॉक

    कोकण रेल्वेवरील माजोर्डा ते मडगाव विभागातील रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम करण्यात येणार असल्याने आजपासून 29 मेपर्यंत कोकण रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकचा मुख्यत: परिणाम गोवा आणि त्यापुढे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांवरहोणार असला तरी त्या गाड्यांच्या विलंबामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचाही खोळंबा होण्याची शक्यता आहे.

  • 02 May 2024 12:10 PM (IST)

    कांदिवली, बोरिवलीत आज पाणीपुरवठा बंद

    पाइपलाइन बदलण्याच्या कामानिमित्त कांदिवली आणि बोरिवली परिसरातील काही भागांत आज रात्री 10 वाजल्यापासून शुक्रवारी 3 मे रोजी रात्री 10 वाजेपर्यंत 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. आर दक्षिण आणि आर मध्य विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

  • 02 May 2024 12:00 PM (IST)

    अजित पवारांचा शरद पवार यांच्यावर निशाणा

    1978 ला वसंत दादांच सरकार पाडलं त्यावेळी त्यांनी चव्हाण साहेबांचं ऐकलं नाही, ज्यांनी संधी दिली त्यांना पाडलं, अनेक वेळा पक्ष साहेबांनी बदलला, असा निशाणा अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर साधला.

  • 02 May 2024 11:54 AM (IST)

    संजय राऊत यांची टीका

    चंद्रहार पाटलाची संपत्ती काय आहे तर 56 चांदीच्या गदा. एकदा जिंकून सांगलीची मान त्यांनी वाढवली. ही त्याची ताकत आहे का कारखाने सूतगिरणीय असायला पाहिजे. तर आम्ही त्यांना निवडून दिलं तर कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

  • 02 May 2024 11:44 AM (IST)

    सुजय विखे यांनी साधला निशाणा

    भाजप नगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटलांनी शरद पवार यांच्या नगर येथील होणाऱ्या सभेवर निशाणा साधला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते असून यांनी महाराष्ट्रभर फिरलं पाहिजे मात्र ते नगर मध्येच पाच ते सहा सभा घेत आहे, असे ते म्हणाले.

  • 02 May 2024 11:28 AM (IST)

    बंडखोरीने चंद्रहार पाटील नाराज

    महाराष्ट्रमध्ये सांगलीत वेगळा प्रयोग झाला आहे. असं मला वाटतं कारण माझ्या घराण्यात कोणीही आमदार खासदार नाही. माझ्यासारख्या शेतकऱ्यांच्या मुलाला महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्याचे चंद्रहार पाटील यांनी सांगितले.आपलं दुर्दैव आहे की घटक पक्षातल्या लोकांनी बंडखोरी केल्याचे त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपली उमेदवारी जनतेसाठी असल्याचे ते म्हणाले.

  • 02 May 2024 11:23 AM (IST)

    अभिजीत पाटील भाजपच्या वाटेवर?

    येत्या एक ते दोन दिवसांत पंढरपूर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

  • 02 May 2024 11:11 AM (IST)

    रामदास आठवलेंच्या कवितांनी आणली रंगत

    रामदास आठवले यांनी मावळची सभा कविता सादर करुन गाजवली. त्यांनी ज्यांच्या नशिबात नाही हरणे त्यांचं नाव श्रीरंग बारणे, नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी तुमच्यासमोर आहेत अनेक कारणे, का निवडून येणार नाहीत आप्पा बारणे, असे यमक जुळवले.

  • 02 May 2024 11:00 AM (IST)

    मुंबईची लाईफ लाईन डोंबिवलीकरांसाठी डेड लाईफ

    लोकलच्या गर्दीमुळे सात दिवसात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. धावत्या लोकलमधून 23 तारखेला अवधेश दुबे तर 27 एप्रिल रोजी राहुल अष्टेकर आणि 29 तारखेला रिया राजगोरे यांचा मृत्यू झाला.

  • 02 May 2024 10:50 AM (IST)

    मुंबई - कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील परिचारिकांचं आंदोलन सुरू

    मुंबईच्या कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील परिचारिकांचं काम बंद आंदोलन सुरू आहे. महिला रुग्णाने एका परिचारिकेला मारहाण केल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. संबंधित रुग्ण महिलेवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

  • 02 May 2024 10:36 AM (IST)

    कल्याण डोंबिवली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा अर्ज थोड्याच वेळात भरणार

    थोड्याच वेळात कल्याण डोंबिवली लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. डोंबिवलीत कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. श्रीकांत शिंदे यांच्याकडून मोठं शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. महायुक्तीचे ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के हे या रॅलीमध्ये पोहोचले आहेत. थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही दाखल होणार आहेत.

  • 02 May 2024 10:08 AM (IST)

    भाजप म्हणजे चोरांचा पक्ष - विजय वडेट्टीवार यांची टीका

    भाजप म्हणजे चोरांचा पक्ष. त्रिकुटाने राज्य अधोगतीकडे नेलंय. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

  • 02 May 2024 09:54 AM (IST)

    Maharashtra News : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये दिग्गजांच्या सभा

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातल्या प्रचाराच्या अंतिम टप्यात दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका होणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांची बुधवार ३ मे रोजी रत्नागिरीत सभा होत आहे. नारायण राणेंच्या प्रचारासाठी अमित शहा पहिल्यांदाच रत्नागिरीत येणार आहे. तसेच उद्धव ठाकरे यांची तोफ राणेंच्या बालेकिल्यात धडाडणार आहे. उद्धव ठाकरे विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी येणार आहेत.

  • 02 May 2024 09:42 AM (IST)

    Maharashtra News : उज्ज्वल निकाम राज ठाकरे यांच्या भेटीला

    उत्तर मध्य मुंबईतील भाजपचे उमदेवार उज्ज्वल निकाम आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दोन्ही नेते पोहचले.

  • 02 May 2024 09:27 AM (IST)

    Maharashtra News : काचीगुडा - हिसारसाठी विशेष रेल्वे फेऱ्या

    उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने काचीगुडा - हिसार - काचीगुडा विशेष गाडीच्या मे आणि जून महिन्यात 18 फेऱ्या मंजूर केल्या आहेत. काचीगुडा - हिसार विशेष गाडीच्या 9 फेऱ्या तर हिसार - काचीगुडा विशेष गाडीच्या 9 फेऱ्या अशा आहे ऐकून 18 फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. 2 मे ते 27 जून दरम्यान ही गाडी धावणार आहे याबाबत दक्षिण मध्य रेल्वे वेळापत्रक जाहीर केले आहे.

  • 02 May 2024 09:08 AM (IST)

    Maharashtra News : श्रीकांत शिंदे भरणार अर्ज

    कल्याण लोकसभेत एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज भरणार आहे. उमेदवारी अर्ज भरायच्या आधी डोंबिवलीच्या गणेश मंदिरात गणपतीचे दर्शन घेत शक्ती प्रदर्शन करत भव्य रॅली काढण्यात येणार आहे.

  • 02 May 2024 08:56 AM (IST)

    Maharashtra News : धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना मान्य नाही - शरद पवार

    "एकदा म्हणाले कुणाच तरी बोट धरुन राजकारणात आलो. धर्माच्या आधारावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. मोदींनी जरी धर्माच्या आधारावर आरक्षण दिलं, तरी संघर्ष करु. मोदी आता भटकती आत्मा म्हणून गेले. मोदी काहीही बोलतात" अशी टीका शरद पवार यांनी केली.

  • 02 May 2024 08:53 AM (IST)

    Maharashtra News : स्थानिक नेते लिहून देतात, तेवढं मोदी बोलतात - शरद पवार

    "FRP मुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर भाव मिळतो. FRP ही संकल्पना आम्ही सुरु केली. मोदींना हे माहित नाही. साताऱ्यात मोदींना यशवंतवराव चव्हाणांच्या नावाचा विसर पडला. स्थानिक नेते लिहून देतात, तेवढं मोदी बोलतात" शरद पवार यांची टीका.

  • 02 May 2024 08:50 AM (IST)

    Maharashtra News : शरद पवारांचा नरेंद्र मोदींना जोरदार टोला

    मूळ मुद्दे सोडून लोकांना इतर ठिकाणी वळवण्याचा कार्यक्रम. शरद पवारांचा नरेंद्र मोदींना जोरदार टोला. स्थानिक मुद्यावरुन भाषण सुरु करणं ही मोदींची स्टाईल आहे असं शरद पवार म्हणाले.

  • 02 May 2024 08:47 AM (IST)

    Maharashtra News : महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेण्याच कारण काय? - शरद पवार

    भाजपाला महाराष्ट्रातील वातावरणाबाबत चिंता वाटत असावी. मोदींच्या सभा झाल्या पाहिजेत, म्हणून 5 टप्प्यात मतदान. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेण्याच कारण काय? असा सवाल शरद पवार यांनी विचारला.

  • 02 May 2024 08:29 AM (IST)

    Maharashtra News : राहुल गांधी यांची पुण्यात सभा

    उद्या पुण्यात महाविकास आघाडीच जोरदार शक्तिप्रदर्शन. राहुल गांधी यांची पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच सभा पुण्यात. एसएसपीएमच्या मैदानावर होणार राहुल गांधी यांची जाहीर सभा. राहुल गांधी यांच्या सभेकडे सगळ्यांच लक्ष. पुणे जिल्ह्यातील उमेदवारांसाठी राहुल गांधी यांची सभा. नरेंद्र मोदी पुण्यात येवून गेल्यानंतर ही सभा होत आहे, त्यामुळे या सभेकडे लक्ष. उद्या कांग्रेस महाविकास आघाडी करणार जोरदार शक्तिप्रदर्शन.

  • 02 May 2024 08:27 AM (IST)

    Maharashtra News : पक्षांतर्गत गटबाजी नको - नाना पटोले

    पुणे लोकसभेसाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचना. रवींद्र धंगेकर यांचं काम करताना पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवून काम करा. कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायची आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे फटका बसता कामा नये. सगळ्यांनी सक्रीय होऊन कामाला लागावं, नाना पटोले यांच्या सूचना.

Published On - May 02,2024 8:25 AM

Follow us
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.