
अंबरनाथ बुवापाडा परिसरात संघटनेच्या सभेसाठी जात असताना शिवसेना शिंदे गटाच्या अंबरनाथ नगरपरिषदेच्या उमेदवार किरण चोबे यांच्या गाडीचा अपघात झाला. चौबे यांचे ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे याला अचानक अटॅक आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाल्याची माहिती समोर . या अपघातातील मृतांची संख्या 4 वर पोहोचली आहे. अंबरनाथ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू. पुलावर झालेली वाहतूक कोंडी पाहता अपघातग्रस्त कारदेखील पोलीस स्थानकात हलवली. रायगडच्या महाड शहरात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जगताप कुटुंबाची साथ सोडून अनेक कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत दाखल आहेत. मालेगाव येथील डोंगराळे घटनेच्या विरोधात आता साधू महंत देखील आक्रमक झाले आहेत. डोंगराळ येथील एका लहान मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. याच घटनेचा निषेध व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची साधू महंतांनी मागणी केली आहे. यासह देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.
दहिसरमधील भंगार दुकानाला आग
दहिसरमधील गणपत पाटील नगर परिसरातील एका भंगार दुकानाला आग
आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश
आगीत भंगारचं दुकान जळून खाक, मोठं नुकसान
ठाण्यात शिवसेना शिंदे गटाकडून अब की बार 100 पारचा नारा
ठाणे महापालिकेत 100 नगरसेवक निवडून आणण्याचे टारगेट
ठाण्यामध्ये शिवसेना शिंदे गटाची महत्त्वाची बैठक पार पडली
ठाण्यातील आनंद आश्रम येथे पार पडली बैठक
ट्विटर आणि चॅनलवर पक्ष चालत नाही तर पक्ष चालवायला लोकांमध्ये जावं लागतं, त्यांचा विश्वास जिंकावा लागतो अशी टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यांच्या चिन्हावर उमेदवार नाही ते त्यांनी पहावे असा सल्लाही यावेळी गोरे यांनी रोहित पवारांना दिला आहे. भाजपचे बिनविरोध उमेदवार निवडून आल्यावर रोहित पवार यांनी टीका केली होती, त्या टीकेला आज धाराशिव मध्ये गोरे यांनी प्रत्युत्तर दिले.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणा’च्या (म्हाडा) अभिन्यासात एकत्रित पुनर्विकासास पात्र असलेल्या परिसरात यापुढे एकल इमारतीच्या पुनर्विकासाला परवानगी न देण्याचे धोरण राज्य शासनाने जारी केले आहे.
शिवसेनेने आपल्या जिल्हा संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाने प्रमुख नेत्यांची नियुक्ती केली आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आमदार आणि खासदार काम करतील. खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी आहे. एकूण 40 जिल्हा संपर्कप्रमुखांची पदे जाहीर करण्यात आली आहेत.
नगरपालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर ठेवावे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. कुठल्याही कार्यकर्त्यांनी गटबाजी करू नये असा सल्ला बावनकुळे यांनी दिला आहे. अन्यथा पाच वर्षांसाठी पक्षाचे आणि नेत्याचे दार बंद होईल असा इशारा बावनकुळे यांनी दिला आहे.
जी20 शिखर परिषदेबाबत पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “मी दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झालेल्या जी20 शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात भाग घेतला. हे सत्र सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासावर केंद्रित होते. आफ्रिका प्रथमच जी20 शिखर परिषदेचे आयोजन करत आहे, म्हणून आता आपल्या विकासाच्या आदर्शांवर पुनर्विचार करण्याची आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारा आणि पृथ्वीचा समतोल राखणारा विकास निवडण्याची योग्य वेळ आहे. भारताचे प्राचीन विचार, विशेषतः समग्र मानवतावादाचे तत्व, आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतात.”
बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. तेलगाव धारूर रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात दुचाकीवरील पती पत्नीसह दोन मुलं जखमी झालेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जम्मूच्या बिश्नाह शहरात, एका ड्रग्ज तस्कराच्या भावाच्या घरावर मोठी कारवाई करण्यात आली. त्याचे घर उद्ध्वस्त करण्यासाठी बुलडोझरचा वापर करण्यात आला.
#WATCH | J&K | Drug smuggler’s brother’s house was demolished in the Bishnah town of Jammu pic.twitter.com/ANrPtbQNR1
— ANI (@ANI) November 22, 2025
शिवसेना संपर्कप्रमुख महेश गायकवाडांनी खैरे कुटुंबाची भेट घेतली. तसेच त्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंनी खैरे कुटुंबाशी फोनवरून संवाद साधला.
चित्रपट सेनेचे पदाधिकारी गेले 18 वर्ष राज ठाकरेंसोबत आहेत, त्यांनी ग्वाही दिलीय शेवटपर्यंत सोबत राहू. रमेश परदेशी का सोडून गेले मला माहित नाही त्यांना शुभेच्छा.रमेश परदेशी आणि या बैठकीचा काहीही संबंध नाही. या अगोदर देखील बैठक घेतल्या आहेत, असं अमेय खोपकर म्हणाले.
“भाजपा आणि गद्दार किती ढोंगी आहेत हे आता लक्षात यायला लागलय. ही लढाई सोपी नाही. तुम्ही एका जोशात आहात. जोशात असलं पाहिजे. पण डोळे उघडे ठेऊन सगळीकडे बघा. भाजप कपट, कारस्थान करणारा पक्ष आहे” असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर क्रुझर गाडीचा टायर फुटून अपघात. पाच जणांचा जागीच मृत्यू. तीन महिलांचा समावेश. सात ते आठ जण गंभीर जखमी. जखमींना सोलापूर येथे उपचारासाठी हलवले. अपघातातील सर्व प्रवासी दक्षिण उळे सोलापूर येथील असल्याची प्राथमिक माहिती. सोलापूरकडून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी जात होती गाडी. क्रुझरचे टायर फुटल्याने क्रुझर झाली पलटी. पलटी झालेल्या क्रुझरची ट्रॅक्टरला धडक.
अर्णव खैरे आत्महत्या प्रकरण. भाजप नेत्या व आमदार चित्रा वाघ यांनी आज खैरे कुटुंबाची भेट घेऊन या संपूर्ण घटनेबाबत संताप व्यक्त केला. अर्णव हा भाषा विषयक विषारी राजकारणाचा पहिला बळी. राजकीय भविष्याचा पाया रचण्यासाठी एका मराठी मुलाचा बळी घेणार का? ठाकरे बंधुंवर चित्रा वाघ यांची टिका.अर्णव हा हुशार,अभ्यासू मुलगा होता. फक्त एका हिंदी वाक्यावरून त्याला मारहाण करण्यात आली आणि त्या धक्क्यातून त्याने आत्महत्या केली.
तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत १९ जागा बिनविरोध, ९ जागांवर रंगणार चुरस रंगणार आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड झाली. एकूण ३२ उमेदवारांनी माघार घेतली असून, याआधी ७ अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे एकत्रित ३९ अर्जांची माघार नोंदली गेल्याने १९ जागा बिनविरोध ठरल्या आहेत. परिणामी, तळेगावमध्ये आता केवळ ९ प्रभागांमध्येच प्रत्यक्ष मतदानाची लढत होणार आहे.तर नगराध्यक्षपदावर तिरंगी लढत स्पष्ट. नगराध्यक्ष पदासाठीची स्पर्धाही निर्णायक रूप धारण केली.
मावळातील तळेगावात अजित पवारांचे आमदार सुनील शेळकेंनी बंधू सुदाम शेळकेंच्या प्रचाराचा नारळ फोडलाय. भाजपसोबत युती असताना माजी मंत्री बाळा भेगडेंनी अपक्ष उमेदवार उभा केला, त्यामुळं सुदाम शेळके बिनविरोध होऊ शकले नाहीत. प्रचाराचा नारळ फोडताच शेळकेंनी हा आरोप केला. तळेगाव नगरपरिषदेत आमचे दहा आणि भाजपचे नऊ नगरसेवक आम्ही बिनविरोध निवडून आणले. असा दावा शेळकेंनी केला. त्यामुळं भाजपने खेळी करत सुदामला निवडणुकीच्या रिंगणात आणलं अन आमदार शेळकेंची कोंडी केलीये. मी युती करुन नगरपरिषद बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता, भाजपमुळं ते घडलं नाही, आता मी भावाचा प्रचार करणार नाही. जनतेनं भावाचा फैसला करावा, असं शेळके म्हणालेत. मात्र भाजपनं हा डाव टाकल्यानं आमदार शेळकेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
पुण्यातील वडगाव नगरपंचायत निवडणुकीत १९ जणांनी माघार घेतली. ४५ उमेदवार रिंगणात वडगाव नगरपंचायत निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी १ आणि नगरसेवक पदासाठी १९ उमेदवारांनी माघार घेतली. आता नगराध्यक्षपदासाठी ४ उमेदवार, तर नगरसेवक पदाच्या १७ जागांसाठी एकूण ४५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात राहिले आहेत. ही निवडणूक मुख्यतः भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात रंगणार आहे. काही प्रभागांत तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती होणार असल्याने वातावरण तापले आहे. सात वर्षांनंतर होत असल्याने ही निवडणूक अधिक लक्षवेधी ठरत आहे.निवडणुकीसाठी एकूण ८९ अर्ज दाखल झाले होते. छाननीत १२ अर्ज बाद झाले, तर ७७ अर्ज वैध ठरले होते.
सांगलीची कन्या आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाची उपकरणदार स्मृती मानधना यांचा शाही विवाह सोहळा 23 तारखेला सांगलीतील कवठेपिरांन रोड येथील मानधना फार्म हाऊस वर होणार आहे काल या ठिकाणी रात्री हळदीचा समारंभ संपन्न झाला आज मेंदीचा आणि संगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे थोड्याच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी सांगली पोलीस दलाच्या वतीने बॉम्ब शोधक डॉग स्कॉड पथक या ठिकाणी दाखल झाला असून या ठिकाणी अनेक मान्यवर या शाही विवाह सोहळ्यासाठी येणार असल्यामुळे या डॉग्सच्या माध्यमातून विवाह स्थळाची संपूर्ण तपासणी आणि पाहणी करण्यात येत आहे
गोंदियात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने प्रचार सुरू झाला आहे. लोकांचा प्रतिसाद मिळत असून शिवसेनेची ताकद वाढत चालली आहे. मोठ्या मतांना मी निवडून येणार असा दावा शिवसेनेचे उमेदवार डॉ. प्रशांत कटरे यांनी केला आहे.
काल न्यायालयाच्या आवारात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमी आजही न्यायालयाचा दरवाजा बंदच आहे. कालच्या आक्रोश मोर्चा नंतर आज देखील मुख्य दरवाजा बंदच ठेवण्यात आला आहे. न्यायालय सांगेल तेव्हाच गेट उघडण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती वकिलांनी दिली आहे.
ऐन नगरपालिका निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजीला आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय खेळीला कंटाळून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाउपाध्यक्ष झुंजार धांडे आणि ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख राजू महुवाले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून आणि संदीप क्षीरसागर यांच्यावर आरोप करत उपजिल्हाप्रमुख राजू महुवाले यांनी राजीनामा दिला आहे. नगरपालिका निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गट आणि ठाकरे गटात राजीनामा नाट्य सुरू झाले आहे.
मुंबईतील जुहू बीचवर बोटिंग करताना दोन मुली समुद्रात पडल्या असून दोघींना बाहेर काढण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी १०:१५ वाजता मुंबईतील जुहू बीचवर ‘Twister Ride’ नावाच्या बोटीवर बोटिंग करत असताना दोन मुली अचानक समुद्रात पडल्या. सध्या दोघांनाही सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. दोघेही ट्विस्टर राईड नावाच्या बोटीवर बोटिंग करत होते.
मुखेड नगरपालिकेसाठी भाजपकडून स्नेहा तमशेट्टे भरला होता उमेदवारी अर्ज… काँग्रेस उमेदवाराचा अर्ज झाला बाद तर पुतणीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चुलतीची माघार…
शिंदेंनी शिवसेना फोडताना जी तलवार वापरली, त्याच तलवारीने आता त्यांचा घात होत आहे… नाराज शिंदे यांना भाजप काडीचीही किंमत द्यायला तयार नाही… महाराष्ट्रात ‘नाराजी’चं महानाट्य कोसळून पडणार हे नक्की आहे! ‘सामना’तून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधण्यात आला आहे.
काशिमिरा पोलीस स्टेशन हद्दीत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रायव्हेट कंपनीत काम करणाऱ्या इसमाचा मृतदेह रिक्षामध्ये आढळला आहे. हा घातपात आहे की नैसर्गिक मृत्यू—याचा तपास काशिमिरा पोलीस करत आहेत.
छावणी पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल. आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्ता हानी, सरकारी कामात अडथळा आणल्याचा आरोप. सार्वजनिक संपत्ती हानी अधिनियम 1984 कलम 3 महाराष्ट्र पोलीस अधिनियम नुसार गुन्हा दाखल..
मा
अंबरनाथच्या मटका चौक परिसरात ट्रक आणि दुचाकीचा जोरदार अपघात. दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी असून दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शी यांच्या माहितीनुसार ट्रक चालक टर्न घेत असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने ट्रकला धडक दिल्याने हा अपघात घडला.
निवडणुकीत शिंदे सेना विरुद्ध मनसे अशी लढत होण्याची शक्यता. शिवसेना पक्षफुटी नंतर एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात मनसे ताकद दाखवणार असल्याची महिती. महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला सोडण्यात येणाऱ्या जागा त्याच ठिकाणी उद्धव ठाकरे मनसेला सोडणार असल्याची सूत्रांची माहिती.
मुक्ताईनगर मी मंजूर केलेले काम थांबवण्यात आले. आमदारांनी काय म्हटलं हे मला माहिती नाही. मुक्ताईनगरमध्ये भारतीय जनता पार्टी मजबूत होती. नगरपंचायत भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होती. मला खंत होती माझा एवढं वर्चस्व असून काही केलं नाही. काहींनी मुक्ताईनगर विकासाचे कामे थांबवल्यामुळे मी मैदानात उतरली आहे
कॉंग्रेसमध्ये प्रचंड विसंवाद असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली असून याचा फटका बसत असल्याचे त्यांनी म्हटले.
पुणे- नवले पुलावर प्रतिकात्मक दशक्रिया विधी आंदोलन केलं जात आहे. स्थानिक नागरिकांकडून राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाचा दशक्रिया विधी करण्यात येत आहे. नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर स्थानिकांनी हे आंदोलन केलं. नवले पुलावरच्या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला होता.
धाराशिव मध्ये शिवसेना आणि भाजपा मध्ये जागा वाटपावरून वाद, त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रताप सरनाईक शिवसैनिकांची बैठक घेणार आहेत.
शिवसेना महायुती मधून वेगळं लढण्याच्या तयारीत असून जागा वाटपावरून तणाव आहे. भाजपचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी ऐनवेळी पाठीत खंजीर खुपसला असा आरोप वसेनेचे जिल्हाध्यक्ष सुरज साळुंखे यांनी केला आहे .
बीड – ऐन नगरपालिका निवडणुकीत शरद पवार गट आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राजीनामा नाट्य सुरूआहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या राजकीय खेळीला कंटाळून ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुख आणि शरद पवार गटाच्या उपाध्यक्षांनी राजीनामा दिला .
अंबरनाथच्या शास्त्रीनगर परिसरातील धक्कादायक घटना घडली आहे. खिडकीतून घरात शिरून 1 वर्षाच्या बालकाचा अपहरणाचा प्रयत्न झाला. शास्त्रीनगर साईबाबा मंदिर समोर असलेल्या श्रीनाथ गायकवाड यांच्या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न झाला. मात्र रस्त्यावर उभे असलेल्या रिक्षा चालकांना शंका आल्याने, विचारपूस केल्यानंतर आरोपीने उलट–सुलट उत्तरं दिल्याने खरं समजलं आणि अपहरणाचा प्रयत्न फसला. स्थानिक नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि त्याला अंबरनाथ पोलिसांच्या ताब्यात दिलं.
अंबरनाथ अपघात प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे यांचा ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे याच्यावर निष्काळजीपणाने वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींच्या तक्रारीनंतर अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केला .
काल संध्याकाळी सातच्या सुमारास प्रचार सभेसाठी जात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे हे जात असताना अंबरनाथ पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या पुलावरती अपघात झाला होता . अपघात इतका भीषण होता की या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू तर चार जण जखमी झाले. या अपघातात पोलिसांनी आरोपी बनवलेले लक्ष्मण शिंदे यांचा देखील मृत्यू झाला असून अधिक तपास सुरू आहे.