tv9 Poll : आता निवडणुका झाल्या तर कुणाला मतदान करणार? tv9 मराठीचा ऑनलाईन पोलचा निकाल ठाकरे सरकारसाठी धोक्याची घंटा?

| Updated on: Mar 11, 2022 | 11:07 PM

चार राज्यांमध्ये भाजपने विजयी आघाडी घेतली. त्यामुळे राज्यातही असेच चित्र दिसेल असे भाजप नेते सांगत आहेत. राज्यातलं आजचे राजकीय वातावरण पाहता, भाजप नेते रोज सरकार पडण्याच्या तारखा सांगत आहे.

tv9 Poll : आता निवडणुका झाल्या तर कुणाला मतदान करणार? tv9 मराठीचा ऑनलाईन पोलचा निकाल ठाकरे सरकारसाठी धोक्याची घंटा?
महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा?
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : कालच्या पाच राज्यंच्या निवडणूक निकालने (Five State Election result 2022) राजकीय परिस्थिती काहीशी बदलली आहे. कारण चार राज्यातले निकाल पाहता भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला (Bjp Vs mahavikas Aghadi) थेट आव्हान देऊन टाकलंय. पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजपने बाजी मारली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा या चार राज्यांमध्ये भाजपने विजयी आघाडी घेतली. त्यामुळे राज्यातही असेच चित्र दिसेल असे भाजप नेते सांगत आहेत. राज्यातलं आजचे राजकीय वातावरण पाहता, भाजप नेते रोज सरकार पडण्याच्या तारखा सांगत आहे. तर सरकार पाडणार नाही पण सरकार पडल्यास पर्यायी सरकार देऊन असे सूचक विधान फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलं आहे. त्यामुळे सर्वांनाच बुचकाळ्यात पाडलंय. पण आजच्या परिस्थित निवडणुका झाल्या तर राज्याचा कौल कुणीकडे असेल याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्यासाठी आम्ही लोकांची मतं जाणून घेण्यासाठी ऑनलाईन पोल घेतला आहे.

यूट्यूबचा पोल काठावर

हा पोल घेताना आम्ही दोन सोशल मीडिया माध्यमांचा आधार घेतला आहे. त्यात यूट्यूब आणि ट्विटरचा समावेश आहे. यूट्यूबवर या प्रश्नावर हजारो लोक व्यक्त झाले आहेत. 94 हजार लोकांनी आपले खुले मत याबाबत नोंदवले आहे. त्यातील 46 टक्के लोक मविआला मतदान करणार असे म्हणत आहेत. तर 45 टक्के लोक भाजपला मत देणार म्हणत आहेत त्यामुळे हा पोल अगदी काठावर आहे. कोणत्याही क्षणी हे पारडं कुणीकडेही झुकू शकते. त्यामुळे ही महाविकास आघाडीसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. त्यामुळे या पोलने कधीही निवडणूक झाली तरी ती महाविकास आघाडीसाठी सोपी नसणार आहे एवढं मात्र अधोरेखित केले आहे. तर याच पोलवर 9 टक्के लोक इतर पर्यायाचा विचार करत आहेत.

यूट्यूबच्या आकड्यात अटीतटीची लढत

ट्विटरच्या पोलमध्ये भाजप सुसाट

तर दुसरीकडे ट्विटरवर मात्र हा पोल वेगळे आकडे दाखवत आहे. ट्विटवर या पोलमध्ये 60 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी भाजपला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे हे आकडे महाविकास आघाडीतील नेत्यांचे धाबे दणाणायला लावणारा आहे. ट्विटरवरच्या पोलवर केवळ 31 टक्के मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. या थेट लोकांच्या प्रतिक्रिया असल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. तर ट्विटवर 8 टक्के लोक इतर पर्यायचा विचार करत आहेत. त्यामुळे ताजे निवडणुकीतले चित्र महाराष्ट्रात किती मोठा परिणाम घडवून आणत आहे हेही दिसून येते.

महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा

Budget: मविआचा अर्थसंकल्प म्हणजे “घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ”: सदाभाऊ खोत

मुंबईचा महापौर भाजपचा तर उपमहापौर रिपाईचा असणार, रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाचं कामकाज घेतलं काढून, दुसरा आयोग स्थापन होणार?