Budget: मविआचा अर्थसंकल्प म्हणजे “घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ”: सदाभाऊ खोत

सध्या एसटी बंद आहेत पहिल्या जुन्या एसटी गाड्या सडायला लागलेल्या आहेत आणि नवीन 3000 एसटी आम्ही गाड्या खरेदी करणार म्हणजे परत हे या माध्यमातून कमिशन खायला मोकळे अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केलीय.

Budget: मविआचा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ: सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 9:57 PM

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने (MVA Government) सादर केलेले बजेट हे म्हणजे “घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ” अशा पद्धतीने हे आजचं बजेट सादर झालं आहे, अशी टीका रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी अर्थसंकल्पावर केली आहे.  शेतकऱ्यांना(Farmer),शेतमजुरांना व बारा बलुतेदारांना काहीही मिळाल नाही, असं सदाभाऊ खोत म्हणाले.  50 हजार रुपये मागच्या शेतकऱ्यांना पैसे देऊ म्हणून घोषणा केली. पण ते कधी मिळणार अजून माहिती नाही. दोन लाखाच्या वरती ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे त्यांना काय देणार या सर्व बाबींवर सरकार काहीही बोलेल नाही, असं सदाभाऊ खोत म्हणाले. वीज बिलाच्या मुद्यावर सरकारनं काही म्हटलेलं नाही, असंही खोत यांनी सांगितलंय.

पेट्रोल डिझेलचा कर कमी केला नाही

दुसऱ्या बाजूला वीज माफी दिली पाहिजे होती पण वीज बिलाबाबत सरकार काहीही बोललेल नाही. सोन्या वरचा टॅक्स कमी केलं, बिल्डरांच्या खरेदी व्यवहारावर चे टॅक्स कमी केले. परंतु डिझेल पेट्रोलचा टॅक्स कमी केला नाही. या राज्यातल्या शेतकऱ्यांना काही दिलं नाही. या राज्यातल्या बारा बलुतेदारांना काही दिले नाही. राज्यातल्या धनगर, माळी, ओबीसीसमाज यालाही काही दिलेलं नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचा दिलासा या राज्यातल्या जनतेला देण्याचे काम या सरकारने केलेले नाही, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पान पुसली

एसटी कर्मचाऱ्यांचे तोंडाला तर पानेपुसली. सध्या एसटी बंद आहेत पहिल्या जुन्या एसटी गाड्या सडायला लागलेल्या आहेत आणि नवीन 3000 एसटी आम्ही गाड्या खरेदी करणार म्हणजे परत हे या माध्यमातून कमिशन खायला मोकळे. असा हा दिशाहीन आणि भरकटलेला  अर्थसंकल्प आहे, अशी टीका देखील सदाभाऊ खोत यांनी केलीय.

इतर बातम्या:

शिवसेनेच्या गडात भाजपचा मराठी कट्टा, कोळीवाड्यात आशिष शेलारांचं सेनेवर टीकास्त्र

Special Report | 4 राज्यातील भाजपच्या विजयाचा महाराष्ट्रात परिणाम होणार? -Tv9

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.