मुंबईचा महापौर भाजपचा तर उपमहापौर रिपाईचा असणार, रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?

काहीही झालं तरी मुंबई महापालिका (Bmc Election 2022) यंदा आमचीच अशी हाक भाजप नेत्यांनी दिली आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) सुरात सूर मिसळला आहे.

मुंबईचा महापौर भाजपचा तर उपमहापौर रिपाईचा असणार, रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
मुंबई महानगरपालिकेबाबत आठवलेंचं मोठं वक्तव्यImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 8:38 PM

धुळेपाच राज्यातली चार राज्य भाजपने जिंकल्यानंतर (Election result 2022) भाजप नेत्यांकडून आगामी निवडणुकीत महाराष्ट्र जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. एवढेच नाही तर आगामी मुंबई महापालिके्या निवडणुकीत शिवसेनेला हद्दपार करू असा दावा भाजप करत आहे. काहीही झालं तरी मुंबई महापालिका (Bmc Election 2022) यंदा आमचीच अशी हाक भाजप नेत्यांनी दिली आहे. त्यातच आता केंद्रीय मंत्री आणि रिपाईचे नेते रामदास आठवलेंनी (Ramdas Athawale) सुरात सूर मिसळला आहे. आगामी काळात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रत भाजपा – रिपाई युतीचे सरकार येणार असून विरोधकांची दयनीय अवस्था होणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते धुळ्यातील पिंपळनेर येथे आदिवासी व दलित समाजाच्या मेळाव्यानिमित्त आले होते.

पुन्हा आमचीच सत्ता येणार

पाच राज्यात झालेल्या निवडणुकीत जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामावर विश्वास ठेवत पाच पैकी चार राज्यात यश मिळाले आहे. मात्र पंजाबात अकाली दलासोबत युती न झाल्याने पंजाबात आप चे सरकार आले आहे. त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन करतो असे ते म्हणाले. तसेच केंद्राने शेतकऱ्याचे भावनाचा विचार करून कृषी कायदे मागे घेतल्याचे आठवले म्हणाले. तसेच झालेली निवडणूक ही 2024 च्या दृष्टीने महत्वाची असल्याचे ते म्हणाले.

मुंबई महापालिका आमचीच

तसेच येणाऱ्या मुंबई मनपाच्या निवडणुकीत भाजपाचा महापौर व रिपाईचा उपमहापौर होणार असल्याचे ते म्हणाले. काही दिवसात मुंबई महापालिकेच्या निवडणुकांचे बिगूल वाजण्याची शक्यता आहे. गेल्या तीन दशकापासून मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगाड फडकत आहे. मात्र आगामी निवडणुकीत आम्ही मुंबई शिवसेनेच्या ताब्यातून काढून घेऊ असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केलाय. तसेच केंद्राचा व केंद्रीय तपास यंत्रणाचा काही संबंध नसून ते स्वातंत्र्य असल्याचे आठवले म्हणाले. तसेच पत्रकारांनी विचारलेल्या प्रशांना उत्तर देताना म्हणाले की, फडणवीस यांच्या विरोधात सबळ पुरावे दिल्यास त्यांच्यावर देखील ईडी कारवाई करेल असे ते म्हणाले. राज्यात सध्या या चोकशी आणि अटकेवरून मोठा राजकीय गदारोळ सुरू आहे. कालच पंतप्रधान मोदी यांनीही यावर भाष्य केले आहे.

राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाचं कामकाज घेतलं काढून, दुसरा आयोग स्थापन होणार?

भारताचं मिसाईल पाकिस्तानात पडलं, तांत्रिक बिघाड झाल्याची संरक्षण मंत्रालयाची माहिती

युवराज संभाजीराजे छत्रपती यांचं कोल्हापुरात जंगी स्वागत! पाहा खास Photo

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.