AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताचं मिसाईल पाकिस्तानात पडलं, तांत्रिक बिघाड झाल्याची संरक्षण मंत्रालयाची माहिती

भारत आणि पाकिस्तान यांच्याबाबतची एक मोठी बातमी हाती येते आहेत. शुक्रवारी भारतानं पाकिस्तानात चुकीनं मिसाईन डागलं गेल्याची वृत्त स्वीकरालं आहे. भारत सरकारनं याबाबत खेदही व्यक्त केला आहे.

भारताचं मिसाईल पाकिस्तानात पडलं, तांत्रिक बिघाड झाल्याची संरक्षण मंत्रालयाची माहिती
भारताचे मिसाईल पाकिस्तानात पडलंImage Credit source: tv9
| Updated on: Mar 11, 2022 | 8:03 PM
Share

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) यांच्याबाबतची एक मोठी बातमी हाती येते आहेत. शुक्रवारी भारतानं पाकिस्तानात चुकीनं मिसाईन (Indian Missile) डागलं गेल्याची वृत्त स्वीकरालं आहे. भारत सरकारनं याबाबत खेदही व्यक्त केला आहे. सुरक्षा मंत्रालयानं शुक्रवारी याबाबत अधिक माहिती जारी केली आहे. 9 मार्च 2022 वेळी तांत्रिक बिघाडामुळे आकस्मित मिसाईल डागली गेली. भारतानं याची गंभीर दखल घेत तातडीनं उच्च स्तरीय न्यायालयीन चौकशीचे (Court Inquiry) आदेश जारी केले आहेत. पाकिस्ताननं गुरुवारी भारताकडून मिसाईल डागण्यात आल्याचा दावा केला होता. पाकिस्तानाची पंजाब प्रांतात हे मिसाईल डागण्यात आलं होतं. पासिक्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजन जनरल बाबर इफ्तिखार यांनी याबाबतचा दावा केला होता.  भारताकडून झालेल्या तांत्रिक चुकीचा फायदा घ्यायचा पाकिस्तानच्या इशाद्यावर संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण देऊन पाणी फिरवले आहे. मात्र पाकिस्तानकडून सुरूवातील या घटनेचे भाडवल करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला गेला.

एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट

पाकिस्तानकडून जारी करण्यात आलेला व्हिडिओ

मिसाईल कुठे पडले, कसे पडले, याबाबत एक व्हिडिओ पाकीस्तानकडून जारी करण्यात आलाय. ट्विट केलेल्या व्हिडिओत त्यांनी त्यांची बाजू मांडली आहे.

नेमका घटनाक्रम काय?

  1. सुरतगडमधून 6.43 मिनिटांनी एक मिसाईन डागलं गेलं.
  2. पाकिस्तानात हे मिसाईल पडलं, तेव्हा वेळ होती 6.50 मिनिटं
  3. तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचा भारत सरकार आणि संरक्षण मंत्रालयाचा दावा
  4. निर्जन वस्तीत मिसाईल पडल्यानं मोठा अनर्थ टळला.
  5. ज्या पाकिस्तानी नागरिकाच्या जमिनीत हे मिसाईल पडलं, त्या ठिकाणच्या जमिनीचं नुकसान झाल्याचा दावा केला जातो आहे.
  6. भारतातून आलेलं सुपर सोनिक फ्लाईंग ऑब्जेक्ट पाकिस्तानात जाऊन पडल्याचा दावा पाक सैन्याच्या प्रवक्त्यानं दिला होता, याचा व्हिडीओदेखील त्यांनी जारी केला होता.
  7. अवघ्या तीन मिनिटात मिसाईलने 124 किलोमीटरचे अंतर कापल्याची माहितीही समोर आली आहे.

सुरक्षा मंत्रालयानं काय म्हटलंय?

पाकिस्तानच्या हद्दीत मिसाईल पडल्याच माहिती समोर आली आहे. ही अत्यंत दुःखद घटना आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असं सुरक्षत्रा मंत्रालयानं म्हटलंय. पाकिस्ताननं गुरुवारी भारताकडून मिसाईल डागण्यात आल्याचा दावा केला होता. पाकिस्तानाची पंजाब प्रांतात हे मिसाईल डागण्यात आलं होतं. पासिक्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजन जनरल बाबर इफ्तिखार यांनी याबाबतचा दावा केला होता. नऊ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजून 43 मिनिटांनी एक वेगवान वस्तू भारतीय हवाई क्षेत्रातून झेपावत आली. त्यानंतर मार्ग भटकून ही पाकिस्तानातील हद्दीत घुसली आणि कोसळली, असं मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी म्हटलंय.

मिसाईलमुळे टेन्शनचा महोल

जगात आधीच रशिया आणि युक्रेनचे युद्ध सुरू असल्याने टेन्शनचा माहोल आहे. त्यात ही घटना समोर आल्यामुळे या घटनेचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तान करत आहे. दोन्ही देशातील संबंध बिघडण्यास भारत कसा जबाबदार आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न पालिस्तानकडून सुरू आहे. मात्र भारताच्या संरक्षण मंत्रालयाने वेळीच याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

पेटीएम पेमेंट्स बँक RBI च्या रडारवर! नवीन ग्राहक नोंदणीला बंदी; अर्थजगतात खळबळ

5 पैकी 4 राज्यात मोदींची हवा! आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विजयी रॅली गुजरातमध्ये

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.