
मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसमोर (Mahavikas Aghadi) आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव ठेवला आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. एमआयएमच्या या प्रस्तावावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. मात्र, महाविकास आघाडीत प्रमुख असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी मात्र एमआयएमचा हा प्रस्ताव धुडकावून लावला आहे. एमआयएम ही भाजपची बी टीम आहे. त्यामुळे त्यांच्याशी आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. तर पवारांनीही एमआयएमला महाविकास आघाडीत प्रवेश मिळणार नसल्याचं सांगितलं आहे. अशावेळी इम्तियाज जलील यांनी मात्र भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत जाण्याचे आमचे प्रयत्न सुरुच राहणार असल्याचं म्हटलंय. या पार्श्वभूमीवर एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून महाविकास आघाडीने योग्य केलं का? असा सवाल आम्ही जनतेला विचारला. ट्वीटर आणि यूट्यूब पोलद्वारे आम्ही जनतेचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय.
एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून महाविकास आघाडीने योग्य केलं का? हा प्रश्न आम्ही यूट्यूब पोलद्वारे प्रेक्षकांना विचारला होता. साधारण 9 तासात 46 हजार 742 प्रेक्षकांनी आपलं मत नोंदवलं. त्यात 69 टक्के लोकांनी महाविकास आघाडीचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय. तर 22 टक्के लोकांनी महाविकास आघाडीचा निर्णय चुकल्याचं सांगितलं. 9 टक्के लोक मात्र सांगता येत नाही, असं म्हणत आहेत.
एमआयएम आणि महाविकास आघाडीबाबत टीव्ही 9 मराठीचा यूट्यूबवरील पोल
यूट्यूब कम्युनिटीवरही आम्ही हाच प्रश्न विचारला. 9 तासात तब्बल 1 लाख 15 हजारापेक्षा अधिक प्रेक्षकांनी आपलं मत नोंदवलं. त्यात तब्बल 80 टक्के लोकांनी महाविकास आघाडीने एमआयएमचा प्रस्ताव धुडकावून लावत योग्य निर्णय घेतल्याचं म्हटलंय. तर 15 टक्के लोकांना महाविकास आघाडीचा हा निर्णय चुकला असल्याचं वाटतं. 5 टक्के लोक मात्र सांगता येत नाही असं म्हणत आहेत.
एमआयएम आणि महाविकास आघाडीबाबत टीव्ही 9 मराठीचा यूट्यूब कम्युनिटीवरील पोल
ट्वीटरच्या पोलवर आम्ही जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा आठशेपेक्षा अधिक लोकांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यात 64.1 टक्के लोक महाविकास आघाडीचा एमआयएमला सोबत न घेण्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हणत आहेत. 26.7 टक्के लोकांना मात्र महाविकास आघाडीचा हा निर्णय चुकला असल्याचं वाटतं. तर 9.2 टक्के लोक सांगता येत नसल्याचं म्हणत आहेत.
एमआयएम आणि महाविकास आघाडीबाबत टीव्ही 9 मराठीचा ट्वीटरवरील पोल
इतर बातम्या :