AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AMC Election 2022 Ward 27 | अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये कोण साधणार नेमका नेम

मागिल वेळी अकोला महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा होता. मात्र यावेळी गणित बदलली आहेत. पण 2017 चा विचार केला असता 80 पैकी 48 जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.

AMC Election 2022 Ward 27 | अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये कोण साधणार नेमका नेम
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 17, 2022 | 6:13 PM
Share

अकोला : राज्यातील महापालिकेच्या निवडणूकांचा (Election) बिगूल वाजला आहे. निवडणूका आता तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष हे कामाला लागले आहेत. तर एका वार्डात आता तीन नगरसेवक असल्याने इच्छुकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. मात्र प्रभाग आरक्षित झाल्याने काही इच्छुकांना चांगलाच धक्का लागला आहे. महापालिकेच्या एकूण 30 प्रभागातून 91 जणांनाच नगरसेवक पदाची लॉटरी लागणार आहे. 15 प्रभागात तीनपैकी दोन जागा महिलांसाठी आरक्षित राहणार आहेत. प्रभाग आरक्षित झाल्याने काही इच्छुकांची चांगलीच अडचण झाली आहे. मागिल वेळी अकोला महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा होता. मात्र यावेळी गणित बदलली आहेत. पण 2017 चा विचार केला असता 80 पैकी 48 जागा भाजपने जिंकल्या होत्या. त्यामुळे सत्ता मिळवण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

अकोल्यातील लोकसंख्या 18,18,617 एवढी आहे. त्यात पुरुषांची लोकसंख्या 9,36,226 एवढी असून महिलांची लोकसंख्या 8,82,391 इतकी आहे. अकोला महापालिकेत एकूण 91 जागा आहेत. त्यापैकी 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. 15 जागा अनुसूचित जातीसाठी आणि दोन जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. तर प्रभाग 27 मध्ये एकूण लोकसंख्या 18228 आहे. ज्यात एससी 4750 आणि एसटी 240 लोकसंख्या आहे.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

प्रभाग क्रमांक प्रभाग 27 आरक्षण

प्रभाग क्रमांक प्रभाग 27 मध्ये तीन वॉर्ड असणार आहेत. ज्यात वॉर्ड 27 -अ, वॉर्ड 27- ब, आणि वॉर्ड 27-क असणार आहेत. वॉर्ड 27 -अ मध्ये अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. तर 27- ब हा सर्वसाधारण(महिला) आणि वॉर्ड 27-क हा सर्वसाधारण असा आरक्षित झाला आहे. त्यामुळे येथे काटेकी टक्कर पाहायला मिळेल.

प्रभाग क्रमांक प्रभाग 27 स्थळ- सोमठाणा, अकोली खुर्द, कमला नेहरू नगर, सिध्दार्थवाडी, यशवंत नगर, गंगानगर बोहरा कॉलनी, तथागत नगर, शिवसेना वसाहतचा काही भाग, हमजा प्लॉट भाग, मोडकेवाडी.

भाजपा    
शिवसेना
राष्ट्रवादी काँग्रेस
काँग्रेस
अपक्ष

प्रभाग क्रमांक प्रभाग 27 सिमा :

उत्तर- राष्ट्रीय महामार्ग क्र.०६ पासून उत्तरेकडे आवार भिंत ओलांडून शिवसेना वसाहतीमधील श्री पुरुषोत्तम रावणकर यांचे घरापर्यंत तेथून पुढे श्री. पुरुषोत्तम रावणकर यांचे घरामागील वल्लीने पूर्वकडे संजय किराणा पर्यंत तेथून पुढे संजय किराणाचे पुर्वेकडील रस्त्याने श्री. संदिप उबाळे यांचे घरापर्यंत तेथून पुढे श्री. उबाळे यांचे घराचे उत्तरेकडील रस्त्याने पुर्वेस दत्त चौक जयभोले किराणा पर्यंत तेथून पुढे दक्षिणेस रस्त्याने श्री. वामन तुळशिराम तिडके यांचे घरापर्यंत तेथून पुढे पूर्व रस्त्याने दुर्गा माता मंदिर दुर्गा चौक पर्यंत तेथून पुढे उत्तरेस शिवसेना वसाहत रस्त्याने श्री. गजानन रामसिंग डाबेराव यांचे घरापर्यंत तेथून पुढे श्री. डाबेराव यांचे घराचे उत्तरेकडील रस्त्याने पुर्वेस श्री. सतिष देशमुख यांचे घरापर्यंत तेथून पुढे मोर्णा कालव्यापर्यंत नंतर मोर्णा कालव्याने दक्षिणेकडे मोबाईल टॉवर पर्यंत (शकीर खान जाहागीर खान यांचे घरापर्यंत) तेथून पुढे शकीर खान जाहागीर खान यांचे घराचे दक्षिणेकडील रस्त्याने पुर्वेकडे डॉ. वसीम रिजवी यांचे दावाखान्या पर्यंत हरिहरपेठ रोडपर्यंत तेथून पुढे याच रस्त्याने दक्षिणेकडे रोनक स्टील अँड सिमेंट पर्यंत नंतर दुकानाचे दक्षिणेकडील रस्त्याने पूर्वकडे असेही अलीम घराचे पूर्वकडील रस्त्याने जय गजानन कुलतथून पुढे पूर्वेकडे राष्ट्रीय महामार्ग के ०६ ने राष्ट्रीय महामार्ग क्र. ०६ व मोर्णा नदीच्या संगमापर्यंत

पूर्व मोर्णा नदी व राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या संगमापासून दक्षिणेकडे मोर्णा नदीच्या तीराने गांव सोमठाणाचे उत्तर हद्दीच्या संगमापर्यंत पूढे मोर्णा नदीने सोमठाणाच्या पूर्व हीच्या संगमापर्यंत पुढे पश्चिमेकडील सोमठाणाच्या दक्षिण हद्दीनने सोमठाणाच्या पूर्व व दक्षिण कोप-यापर्यंत.

दक्षिण- गांव सोमठाणा च्या दक्षिण व पूर्व कोप-यापासून सोमठाणाच्या दक्षिण हद्दीने पश्चिमेकडील सोमठाणाच्या दक्षिण व पश्चिम कोप-या पर्यत.

पश्चिम- गांव सोमठाणाच्या दक्षिण व पश्चिम कोप-यापासून उत्तरेकडील सोमठाणा व हिंगणा अकोली खुर्दचे पश्चिम हद्दीने मौजे अकोलाचे दक्षिण हद्दीच्या संगमापर्यत पूढे पूर्व कडे मोजे अकोलाचे दक्षिण हद्दीने मोजे अकोला दक्षिण व पूर्व कोप-यापर्यंत पूढे उत्तरेकडे मौजे अकोलाचे पूर्व हद्दीने तेथून पुढे उत्तरेकडे अकोला वाशिम रोडने मोजे अकोलाचे उत्तर-पूर्व कोप-या पर्यंत तेथून पुढे मोजे अकोलाचे उत्तरेकडील हद्दीने पश्चिमेकडे सालासार बालाजी मंदिराकडे जाणा-या रस्त्यापर्यंत तेथून पुढे याच रस्त्याने उत्तरेकडे गंगा माता मंदिरापर्यंत तेथून पुढे मंदिराचे समोरील रस्त्याने पुर्वेकडे दि अकोला अर्बन को-ऑप. बँक एपीएमसी शाखेपर्यंत तेथून पुढे बँकचे समोरील रस्त्याने राष्ट्रीय महामार्ग क्र. चे संगमापर्यंत तेथून पुढे राष्ट्रीय महामार्ग क्र.६ ने पश्चिमेकडे शिवसेना वसाहत मधिल श्री. पुरुषोत्तम रावणकर यांचे घरापासून आवारभिंत ओलांडून येणा-या सरळ रेषेच्या संगमापर्यंत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.