चाकूच्या धाकाने लुटले पावणेदोन कोटी, 15 तासांत पोलिसांनी केले जेरबंद

| Updated on: Nov 21, 2021 | 11:11 AM

मूल रोडवरील अरविंदनगरमध्ये राहणारे नाजनीन कोलसावाला (वय 33) हे घरकाम करतात. 17 नोव्हेंबररोजी दुपारी पाच अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी घुसले. गळ्याला चाकू लावला आणि नकली पिस्तुलचा धाक त्यांना दाखविण्यात आला.

चाकूच्या धाकाने लुटले पावणेदोन कोटी, 15 तासांत पोलिसांनी केले जेरबंद
प्रातिनिधीक छायाचित्र
Follow us on

नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातल्या रामनगर पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मोठी कारवाई केली. अरविंदनगरातून पाच आरोपींनी चाकूचा धाक दाखवून पावणेदोन कोटी रुपये लूटले होते. ही रक्कम लुटण्यासाठी नाजनीन कोलसावाला यांच्या गळ्याला चाकूचा धाक दाखविला. तसेच नकली पिस्तुल दाखवून रक्कम घेऊन चोर पसार झाले होते. पोलिसांनी 15 तासांत चोरट्यांना अटक केली.

मूल रोडवरील अरविंदनगरमध्ये राहणारे नाजनीन कोलसावाला (वय 33) हे घरकाम करतात. 17 नोव्हेंबररोजी दुपारी पाच अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरी घुसले. गळ्याला चाकू लावला आणि नकली पिस्तुलचा धाक त्यांना दाखविण्यात आला.

नाजनी यांच्या भावाच्या बेड रूममधील बॉक्समधील थैल्यात ठेवलेले 1 कोटी 73 लाख 50 हजार रुपयांच्या चार थैल्या त्या चोरट्यांनी ताब्यात घेतल्या. दरोडा टाकून पांढर्‍या रंगाच्या गाडीने पळून गेले. याप्रकरणी नाजनीन यांनी रामनगर पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. या आधारावर पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करून तपास केला. पोलीस निरीक्षक मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोधपथकातील अधिकारी हर्षल ओकरे, पोउपनिरीक्षक भुरले व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

सीसीटीव्ही कॅमेरे, गोपनीय बातमीदारांची मदत

घटनास्थळाच्या आजूबाजूच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व गोपनीय बातमीदार यांच्या माहितीप्रमाणे अनोळखी आरोपींचा शोध घेण्यासाठी सपोनि हर्षल अकरे हे डी.बी. पथकासह नागपूर येथे रवाना झाले. तसेच पोउपनिरीक्षक विनोद भुरले हे डी.बी. पथकासह बल्लारशाह, राजुरा येथे गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यासाठी रवाना झाले. अज्ञात आरोपींचा सायबर सेलच्या मदतीने कसोसीने शोध घेण्यात आला. डी.बी. पथकाने दोन आरोपीतांना नागपूर येथून ताब्यात घेतले. तसेच पळून जाण्याकरिता वापरलेले वाहन हुन्डाई आय- 20 जप्त करण्यात आले. तसेच आरोपींकडून दरोडा घालून चोरून नेलेले एकूण रोख रक्कम 1 कोटी 73 लाख रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा मरांजो कंपनीची चार चाकी वाहन, नकली पिस्तुल व चाकू जप्त करण्यात आले.

यांनी केली कारवाई

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुन्हे शोध पथकातील सपोनिरीक्षक हर्षल अकरे, पोउपनिरीक्षक विनोद भुरले तसेच सर्व डी.बी. पथकातील कर्मचार्‍यांनी आरोपींचा शोध घेतला. अवघ्या 15 तासात आरोपी तसेच गुन्ह्यातील रोख रक्कम जप्त केली आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलिस व सायबर पोलिस कर्मचार्‍यांनी केली.

गरज पडल्यास कृषी कायदे परत लागू करणार; राज्यपाल कलराज मिश्रांच्या विधानाने खळबळ

माफी मागून चालणार नाही, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पीएम केअर फंडातून भरपाई द्या; संजय राऊतांची मागणी