AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गरज पडल्यास कृषी कायदे परत लागू करणार; राज्यपाल कलराज मिश्रांच्या विधानाने खळबळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी या कायद्यांबाबतचं वेगळच विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे.

गरज पडल्यास कृषी कायदे परत लागू करणार; राज्यपाल कलराज मिश्रांच्या विधानाने खळबळ
kalraj mishra
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 11:02 AM
Share

जयपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेत असल्याचं जाहीर केलं आहे. मात्र, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र यांनी या कायद्यांबाबतचं वेगळच विधान करून एकच खळबळ उडवून दिली आहे. गरज पडल्यास पुन्हा कृषी कायदे लागू करू, असं धक्कादायक विधान मिश्र यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

भदोही येथे मीडियाशी संवाद साधताना कलराज मिश्र यांनी हे विधान केलं आहे. गरज पडल्यास पुन्हा अशा प्रकारचे कायदे लागू केले जाऊ शकतात. मात्र, सध्या हे कायदे मागे घेतले जात आहेत, असं मिश्र यांनी सांगितलं.

कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच

कृषी कायदे मागे घेण्यात आल्यानंतर मिश्र यांनी त्याचं समर्थन केलं होतं. तसेच मोदींच्या या निर्णयाची प्रशंसाही केली होती. कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचेच होते. सरकारने शेतकऱ्यांना समजावण्याचा अटोकाट प्रयत्न केला. मात्र तरीही शेतकरी आंदोलनावर ठाम होते. कृषी कायदे मागे घ्या म्हणून अडून बसले होते. त्यामुळेच सरकारला हे कायदे मागे घ्यावे लागले, असं त्यांनी म्हटलं होतं.

काय म्हणाले होते मोदी?

शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी, वर्षानुवर्षे ही मागणी होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही प्रामाणिक हेतूनं शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणले. आम्ही ही गोष्ट शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. अर्थशास्त्रज्ञ, शेतकरी यांनी त्यांना कृषी कायदे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या, बदलण्यास तयार झालो. कायदे दोन वर्ष स्थगित करण्यास तयार झालो. पण केंद्रीय कृषी कायद्यांचा विषय सुप्रीम कोर्टात गेला. मला त्याच्या अधिक खोलात जायचं नाही. देशवासियांची माफी मागून सांगतो की आमची तपश्चर्या कमी पडली असेल. दिव्याच्या प्रकाशासारखं सत्य आम्ही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही. आज गुरुनानक यांचं प्रकाश पर्व आहे. आज मी कोणालाही दोष देणार नाही. येणाऱ्या संसंदेच्या अधिवेशनात आम्ही ते कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. आता आम्ही हे कायदे रद्द करत असल्याची घोषणा नरेंद्र मोदी यांनी केली होती.

आता घरी जा

तुम्ही घरी परत जावा. शेतात जावा. आपण नवी सुरुवात करत आहोत. आपण आजपासून नवी सुरुवात करत आहोत. आपण झिरो बजेट शेतीला सुरुवात करत आहोत, असं मोदी म्हणाले. पिकांची रचना बदलण्यासाठी, एमएपसी वाढवण्यासाठी एका समितीची स्थापना करत आहोत. याकमिटीत केंद्र सरकार, राज्य सरकार, कृषी अर्थशास्त्रज्ञ, शेतकरी संघटना यांचे सदस्य सहभागी असतील, असं मोदी म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

माफी मागून चालणार नाही, मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पीएम केअर फंडातून भरपाई द्या; संजय राऊतांची मागणी

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक, धुळे-नंदुरबार, साताऱ्यात 10 जागांसाठी आज मतदान

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर, हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.