AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री घरातून किंचाळण्याचा आवाज..अल्पवयीन मुलीवर दोघा वृद्धांचा अत्याचार

कोळसेवाडी पूर्व परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचारांच्या घटना वाढत असल्याने आमदार आणि नगरसेवकांनी संतप्त होत पोलिसांची भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली आहे.

रात्री घरातून किंचाळण्याचा आवाज..अल्पवयीन मुलीवर दोघा वृद्धांचा अत्याचार
kalyan crime news
| Updated on: Jun 22, 2026 | 7:07 PM
Share

कल्याणमध्ये अतिशय धक्कादायक घटना घडली आला आहे. एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघा जरठ व्यक्तींनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात कोळसेवाडी पोलिसांनी अख्तर मनियार आणि सलीम शेख या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हे दोघे ६० वर्षांचे आहेत. अल्पवयीन मुलीला आपल्या घरात बोलून तिच्यावर दोघांनी अत्याचार केला अल्पवयीन मुलीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्यांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मुलीची सुटका करत या दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कल्याण पूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. येथील एका घरातून एका १५ वर्षांच्या मुलीचा आरडाओरडा ऐकू येत होता. मुलीचा ओरडाओरड सुरू असताना आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना जाग आली.  लोकांनी याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटना स्थळी दाखल झाले. या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही.

घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार

मात्र, पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. आरोपींमध्ये अख्तर मणियार आणि सलीम शेख यांची नावं समोर आली आहे. ही दोघे रात्रीच्या वेळी एका पंधरा वर्षांच्या मुलीला घरात घेऊन आले होते. घरातच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती आहे. ही मुलगी गरीब कुटुंबातील असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मणियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहा विक्रीचा व्यवसाय करतो. तर सलीम हा रिक्षा चालक आहे. हे नेहमी विविध मुलींना रात्रीच्या वेळी या घरात आणायचे. नेहमीप्रमाणे काल देखील त्यांनी अशाच प्रकारचे कृत्य केले.

लोकप्रतिनिधी झाले आक्रमक

या वेळेला अचानक या घरातून आरडाओरडीचा आवाज आला आणि त्यानंतर आजूबाजूच्या रहिवाशांनी पोलिसांना फोन करून ही घटना सांगितली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला असता मुलगी भेदरली होती. या दोघा नराधमांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करून पुढचा तपास सुरू केला आहे. मात्र, कल्याण कोळसेवाडी परिसरात वारंवार अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आता स्थानिक आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक महेश गायकवाड, यासह अन्य नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले असून पोलिसांना निवेदन देत त्यांना या आरोपींना कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी केली आहे.

Follow Us
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन