शिवसेना आणि मनोज जरांगे यांच्यात मतभेद, पण…; ऑडिओ क्लिपमधील आरोपावरून मंत्री उदय सामंत स्पष्टच बोलले
मनोज जरांगे यांच्या ऑडिओ क्लिपमुळे राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य करत थेट मुख्यमंत्र्यांना चौकशीची मागणी केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपने राज्यातील राजकारण ढवळून निघालंय. या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपसहित श्रीकांत शिंदे यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे. या ऑडिओ क्लिपनंतर मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधाऱ्यांचा मराठा आंदोलन चिरडण्याचा प्लान होता, असा आरोप केला. परंतु शिंदे गटाच्या मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. शिवसेना आणि मनोज जरांगे यांच्यात मतभेद असले, तरी जरांगे यांनी मराठा समाजसाठी आंदोलन केल्याचं नाकरता येणार नाही. खरतंर या क्लिपच्या माध्यमातून कुणी कुटील डाव आखत असल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला आहे.
मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत जरांगे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. मंत्री सामंत म्हणाले, ‘ आमचे आणि मनोज जरांगे यांच्याशी मतभेद झाले असतील. ते शिंदेंवर बोलल्याने मतभेद झाले. परंतु त्यांनी मराठा समाजासाठी आंदोलन केलं, हे नाकारता येणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता न्याय मिळवून देण्याचे काम शिंदेंनी केलं. या क्लिपच्या माध्यमातून कुणी कुटील डाव आखत असेल, त्याची चौकशी आहे,अशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी आहे’.
‘ऑडिओ क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतलं, तर शिवसेना, एकनाथ शिंदे हे येतात. खरंतर मनोज जरांगे पाटील आणि शिवसेनेत वाद लावायचे होते. त्यामुळे त्यांनी हे केलं असावं. हे क्लिप जनतेकडे गेली आहे, आता त्याची चौकशी झाली पाहिजे. आंदोलन कसं थांबवायचं, आंदोलन थांबलं नाही, तर संबंधित यंत्रणेना कसं बोलवायचं. हे सगळं त्यात आहे. त्यावेळी 500 कोटींचा उल्लेख आहे. हा उल्लेख शिवेसेनेसाठी मोठा आहे. ओबीसींचे न्याय हक्क ठेवून मराठा समाजासाठी न्याय देण्यासाठी श्रीकांत शिंदे देखील अग्रेसर होते. त्यांच्याही नावाची बदनामी होते. त्यानंतर आपोआप एकनाथ शिंदे आणि शिवसेनेची बदनामी होते. मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. याबाबत चौकशी झाली पाहिजे. फॉरेन्सिक चौकशी झाली पाहिजे. भाजप आणि शिंदे गटात वाद लावण्याचा प्रयत्न करतंय का? जे मुख्यमंत्र्यांना माहीत नाही का, चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण यांनाही या गोष्टी माहीत आहे का? याची चौकशी केली पाहिजे, असे सामंत पुढे म्हणाले.
