AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Koffee With Karan 9 : हिंदी उच्चारांवरून ट्रोल करणाऱ्यांना रश्मिका मंदानाचं सडेतोड प्रत्युत्तर; अनेक भाषांमध्ये काम करण्याबाबतही केलं भाष्य

Koffee With Karan 9: 'कॉफी विथ करण ९' मध्ये अभिनेत्री रश्मिका मंदानाने तिच्या दाक्षिणात्य उच्चारांवर होणाऱ्या टीकेला स्पष्ट उत्तर दिले.पती विजय.सोबत तिने या शोमध्ये हजेरी लावली होती.

Koffee With Karan 9 :  हिंदी उच्चारांवरून ट्रोल करणाऱ्यांना रश्मिका मंदानाचं सडेतोड प्रत्युत्तर; अनेक भाषांमध्ये काम करण्याबाबतही केलं भाष्य
| Updated on: Oct 22, 2026 | 2:37 PM
Share

Koffee With Karan 9 : करण जोहरचा लोप्रिय चॅट शो ‘कॉफी विथ करण ‘ (Koffee With Karan 9) चा 9वा आणि शेवटचा सीझन गेल्या आठवड्यात सुरू झाला. पहिल्या भागात सलमान खान आणि करीश्मा कपूरने हजेरी लावल्यावर आता दुसऱ्या भात अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि तिचा पती, अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) हे दोघं आले होते. या शोमध्ये त्यांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. त्यादरम्यान रश्मिकाने तिच्या दाक्षइणात्य उच्चारांवरून जी टीका होते, त्यावर प्रतिक्रिया दिली. ऑनलाइन ट्रोलिंगमुळे ती भाषा आपलीशी करणं किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करणं थांबवणार नाही, त्यापासून मागे हटणार नाही.

‘करिअरच्या सुरुवातीपासूनच टीकेचा सामना करतेय’

अभिनेत्री रश्मिका मंदानाला हिंदी चित्रपटांमधील तिच्या उच्चारांवरून अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आता यावर रश्मिकाने आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. मनोरंजन विश्वात काम करताना टीका हा प्रवासाचा एक भाग असल्याचं सांगत, तिने ट्रोलिंगकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनही व्यक्त केला. कॉफी विथ करणमध्ये आलेल्या रश्मिका मंदानाने सांगितलं की, प्रसिद्धीच्या झोतात राहणाऱ्या कलाकारांना त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या टीकेला सामोरं जावं लागतं.  याबद्दल बोलताना रश्मिका म्हणाली, “ मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केल्यापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने माझ्यावर टीका किंवा ट्रोलिंग होत आली आहे. कधी माझ्या अभिनयावर, कधी भाषेवर, तर कधी माझ्या उच्चारांवरून मला लक्ष्य करण्यात आलं. पण मला स्वतःसाठी मर्यादा निर्माण करायच्या नव्हत्या. मला केवळ एका इंडस्ट्रीमध्ये काम करायचं नव्हतं, तर वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं होतं. मला फक्त एकच भाषा बोलायची नव्हती, तर अनेक भाषा शिकून त्यामध्ये काम करायचं होतं.”

‘माझा साऊथ इंडियन उच्चार असण्यात गैर काय?’

हिंदी चित्रपटांमधील आपल्या उच्चारांवर होणाऱ्या टीकेबद्दल रश्मिकाने ठाम उत्तर दिलं. ‘अ‍ॅनिमल’, ‘छावा’ यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या उच्चारांवरून चर्चा झाली होती. मात्र, दक्षिण भारतातून आलेली अभिनेत्री असल्यामुळे आपल्या बोलण्यात तसा उच्चार असणं स्वाभाविक असल्याचं तिने स्पष्ट केलं. रश्मिका म्हणाली, “खरं सांगायचं तर, मला याबद्दल काहीच अडचण नव्हती. लोक म्हणतात की माझा साऊथ इंडियन उच्चार आहे, पण मी दक्षिण भारतातून आले आहे. त्यामुळे माझ्या बोलण्यात तसा उच्चार असणारच. यापेक्षा वेगळा विचार करणं चुकीचं आहे.”

विविध भूमिका साकारण्याचा आनंद

करिअरच्या सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करण्याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घेतल्याचंही रश्मिकाने सांगितलं. विविध भूमिका साकारल्यामुळे अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळाल्याचं तिचं म्हणणं आहे. ती म्हणाली, “करिअरच्या सुरुवातीला मी वेगवेगळ्या प्रकारच्या चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. आज ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘द गर्लफ्रेंड’ यांसारख्या अगदी वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांचा भाग होता आलं, याचा मला आनंद आहे. कारण मी दोन्ही प्रकारच्या भूमिका साकारू शकते. ”

अनेक भाषांमध्ये स्वतः डब करण्यासाठी घ्यावी लागते मेहनत

रश्मिका मंदानाने आपल्या चित्रपटांना विविध भाषांमध्ये डब करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या मेहनतीबद्दलही भाष्य केलं. चित्रपटाच्या दिग्दर्शकांना दुसऱ्या कलाकाराच्या आवाजात डबिंग करण्याचा पर्याय आपण देते, असं तिने सांगितलं. मात्र, तिच्या अनेक दिग्दर्शकांना तिने स्वतःच डबिंग करावं, असं वाटतं. याबद्दल ती म्हणाली, “प्रत्येक चित्रपटाच्या वेळी मी माझ्या दिग्दर्शकांना सांगते की, तुम्हाला दुसऱ्या कोणाच्या आवाजात डबिंग करायचं असेल, तर मला त्याचं वाईट वाटणार नाही. पण माझे दिग्दर्शक सहसा दुसऱ्या कोणाकडून डबिंग करून घ्यायला इच्छुक नसतात. त्यांना वाटतं की मी स्वतःच माझ्या भूमिकेसाठी डबिंग करावं.”

Follow Us
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?