Video :’काय बाई सांगू? कसं गं सांगू? उदयनराजेंची शिवेंद्रराजेंवर हटके स्टाईल टीका

गुरुवारी सातारा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजपमधीलच त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर फिल्मी स्टाईलमध्ये उदयनराजेंनी टिका केली. यावेळी उदयनराजेंनी 'काय बाई सांगू? कसं गं सांगू? असं म्हणताच सभागृहामध्ये एकच हशा पिकला.

Video :'काय बाई सांगू? कसं गं सांगू? उदयनराजेंची शिवेंद्रराजेंवर हटके स्टाईल टीका
उदयनराजे भोसले
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Dec 24, 2021 | 10:38 PM

सातारा : भाजप खासदार उदयनराजे कधी कार्यकर्त्यांसोबत गाण्यावर ठेका धरतात. कधी कॉलर उडवून डायलॉग मारतात. कधी कार्यकर्त्यांना फ्लाईंग किस देतात. तर कधी गाड्यांवर स्टंट करताना दिसतात. स्टाईल आणि डायलॉगमुळे तर उदयनराजे हे नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता राजे चर्चेत आहेत ते भर सभेत गायलेल्या गाण्यानं.

काय बाय सांगू…उदयनराजेंनी गायले

गुरुवारी सातारा नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात भाजपमधीलच त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर फिल्मी स्टाईलमध्ये उदयनराजेंनी टिका केली. यावेळी उदयनराजेंनी ‘काय बाई सांगू? कसं गं सांगू? असं म्हणताच सभागृहामध्ये एकच हशा पिकला. उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये शाब्दीक चकमक देखील वारंवार उडत असते. काही दिवसांपूर्वी शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंचा नारळ फोड्या गँग असा उल्लेख केला. त्यानंतर उदयनराजेंनीही आपल्या स्टाईलमध्ये शिवेंद्रराजेंचा समाचार घेतला.

दोन्ही राजेंमधील शाब्दिक चकमक सुरूच

शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंना नारळफोड्याची उपमा दिल्यानंतर उदयनराजेंनी सुद्धा शिवेंद्रराजेंवर टिका करत त्यांची बुद्धी छोट्या मुलांच्या पेक्षासुद्धा कमी आहे असे म्हटले होते. शिवेंद्रराजे हे बालीश विधानं करत असल्याचं सांगत त्यांनी टीका करताना भान राखायला हवं असं ते म्हणाले होते.याला शिवेंद्रराजेंनी पुन्हा उत्तर दिलय उदयनराजेंची बुद्धी जर आमच्या पेक्षा जास्त आहे तर लोकांनी नोवडून दिलेलं खासदारकीचं पद सोडून पुन्हा उभं राहून पराभूत झालात. याला काय म्हणायचं? असा सवाल शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना केला. शिवेंद्रराजे आणि उदयनराजेंमधील तु-तु मैं-मैं सातारकरांसाठी काही नवीन नाही. मात्र उदयनराजेंच्या हटके स्टाईलनं ती अधिक रंगदार होते. दोन्ही राजे आता भाजपमध्ये आल्यावर किमान आतातरी हे संपेल असे सर्वांना वाटत होते, मात्र अजूनही एकमेकांना टोमणे मारायला राजे विसरत नाहीयेत.

Omicron : राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू, कुठे काय नियम असतील? वाचा सविस्तर

Pro Kabaddi League PKL 2021-22: एक-एक पॉईंट जोडत बुल्सची तमिळ थलायवाजवर मात

Winter Session : देवेंद्र फडणवीसांच्या प्रत्येक प्रश्नाला उपमुख्यमंत्री अजित पवारांचं उत्तर, वाचा सविस्तर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें