उदयनराजे दोन दिवसात भाजपात, दिल्लीत पक्ष प्रवेश होणार : चंद्रकांत पाटील

उदयनराजेंच्या पक्ष प्रवेशाला कुणीही खोडा घालत नाही, पण त्यांना दिल्लीत पक्षप्रवेश करायचाय, तर दिल्लीतच पक्षप्रवेश होईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय नारायण राणे यांच्याबाबत भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली असल्याचं ते म्हणाले.

उदयनराजे दोन दिवसात भाजपात, दिल्लीत पक्ष प्रवेश होणार : चंद्रकांत पाटील

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale in BJP) यांचा भाजप प्रवेश अखेर ठरलाय. येत्या दोन दिवसात त्यांचा भाजपात प्रवेश (Udayanraje Bhosale in BJP) होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil Karad) यांनी कराडमध्ये बोलताना दिली. उदयनराजेंच्या पक्ष प्रवेशाला कुणीही खोडा घालत नाही, पण त्यांना दिल्लीत पक्षप्रवेश करायचाय, तर दिल्लीतच पक्षप्रवेश होईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. शिवाय नारायण राणे यांच्याबाबत भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली असल्याचं ते म्हणाले.

गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे भाजपात जाणार अशी चर्चा होती. पण त्यावर कुणीही अधिकृतपणे माहिती दिली नव्हती. अखेर भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीच उदयनराजेंच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित पक्षप्रवेशाबाबत खुलासा केला.

उदयनराजेंसोबतच इतर काही नेतेही भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. पण पक्षात बदलण्यापूर्वी आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा द्यावा लागतो. आतापर्यंत राजीनामा दिलेल्या सर्व आमदारांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केलाय. आणखी काही मोठी नावं आता भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर साताऱ्यात पोटनिवडणूक होईल. पण ही पोटनिवडणूक विधानसभेसोबतच व्हावी, अशी उदयनराजेंची इच्छा आहे. दरम्यान, यापूर्वी उदयनराजेंचे बंधू शिवेंद्रराजे भोसले यांनीही भाजपात प्रवेश केला होता. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला यानिमित्ताने मोठं भगदाड पडलं आहे. विशेष म्हणजे विधानसभेच्या तोंडावर उदयनराजेंचा भाजपात प्रवेश झाल्यानंतर याचा राज्यभर परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *