आधी शरद पवारांची भेट, नंतर उदनयराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी 'वर्षा'वर

उदयनराजे 14 तारखेला तुळजापूरला तुळजाभवानी देवीला अभिषेक करणार आहेत. त्यानंतर त्याच ठिकाणी पत्रकार परिषदही घेणार असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे दुष्काळी भागाला भेटी देत आहेत. विजयानंतर त्यांनी सत्कारही स्वीकारला नव्हता.

Udayanraje bhosle, आधी शरद पवारांची भेट, नंतर उदनयराजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदनयराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन तास चाललेल्या बैठकीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे या भेटीपूर्वीच उदयनराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. दुष्काळ प्रश्न आणि विविध कामांसाठी उदयनराजेंच्या भेटीला गेल्याची माहिती आहे. याविषयी उदयनराजेंनी अधिकृतपणे काहीही सांगितलेलं नाही.

पवारांची भेट घेऊन उदनयराजे मराठा आरक्षण, दुष्काळ आणि शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावे या मागणीचं निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. उदयनराजे 14 तारखेला तुळजापूरला तुळजाभवानी देवीला अभिषेक करणार आहेत. त्यानंतर त्याच ठिकाणी पत्रकार परिषदही घेणार असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजे दुष्काळी भागाला भेटी देत आहेत. विजयानंतर त्यांनी सत्कारही स्वीकारला नव्हता.

विविध मागण्यांसाठी शरद पवार, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. निरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारं पाणी दुष्काळग्रस्त भागाला वळवण्यात येणार आहे. ते पाणी बारामतीसाठीच चालू ठेवावं, यासह इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर तिघांनीही एकदाच भेट घेण्याची ही पहिलीच वेळ होती. दुष्काळ आणि पाणी टंचाईबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली.

उदयनराजे आणि भाजपची जवळीक लोकसभा निवडणुकीपूर्वी पाहायला मिळाली होती. उदयनराजेंचं सर्वच पक्षांतील नेत्यांसोबत मैत्रीचे संबंध आहेत. यापूर्वीही ते अनेकदा मतदारसंघातील कामांसाठी मंत्रालयात गेले होते. उदयनराजे भाजपच्या वाटेवर असल्याचंही अनेकदा बोललं गेलं. पण अखेर त्यांनी राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढवत विजय मिळवला. मोदी सरकारने देशात हुकूमशाही आणली असल्याची टीकाही त्यांनी केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *