मोठी बातमी! उद्या उद्धव ठाकरे करणार सरकारला घाम फोडणारी घोषणा, पत्रकार परिषद बोलावली, राजकारणात वेगवान घडामोडी

राजकीय वर्तुळात सध्या घडामोडींना वेग आला आहे. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे, या पत्रकार परिषदेमध्ये ते मोठी घोषणा करणार आहेत.

मोठी बातमी! उद्या उद्धव ठाकरे करणार सरकारला घाम फोडणारी घोषणा, पत्रकार परिषद बोलावली, राजकारणात वेगवान घडामोडी
uddhav thackeray
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 02, 2026 | 10:04 PM

गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी घडताना दिसून येत आहेत. शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली, सहा खासदारांनी पक्षातून बंडखोरी केली, त्यांनी शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.  दरम्यान पक्षात पडलेल्या फुटीनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. ज्या -ज्या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटात फुट पडली, त्या सर्व सहाही मतदारसंघात उद्धव ठाकरे यांनी नुकतीच सभा घेतली. या सभेच्या माध्यमातून त्यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार हल्लाबोल केला.

दरम्यान त्यानंतर आता शुक्रवारी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे हे मोठी घोषणा करणार आहेत.  राम मंदिरातील दान घोटाळ्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा करण्यात येणार आहे.  उद्या उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाची घोषणा करणार आहेत. या पार्श्वभूमीवर  राज्य भरातील राम मंदिर आणि हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजन ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. दादर येथील हनुमान मंदिरात पहिल्या महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे, दादर पश्चिम येथील हनुमान मंदिरात शिवसेना ठाकरे गटाकडून रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. दरम्यान या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून होणार आहे. याबाबत खासदास संजय राऊत यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

 

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, शिवसेना ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत, एक म्हणजे सहा खासदारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, तर दुसार धक्का सचिन आहिर यांनी दिला आहे. त्यामुळे आता वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या देखील अडचणी वाढण्याच्या शक्यता आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांची उद्याची पत्रकार परिषद महत्त्वाची असणार आहे. या पत्रकार परिषदेत  ठाकरे आंदोलनाची घोषणा करणार आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us