
“23 जानेवारीपासून बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय. इथल्या भूमिपूत्रांसाठी शिवसेना एक पाऊल पुढे टाकत आहे, असं म्हटलं होतं. अनेक क्षेत्रात मराठी माणसांना दरवाजे बंद होते. त्यासाठी शिवसेनेने आंदोलने केली. अनेक सेनांची स्थापना केली. नुसती आंदोलन केली नाही तर प्रशिक्षण वर्गही सुरू केले. एखाद्या ठिकाणी आंदोलन केल्यावर रोजगार आणि नोकरीची संधी उपलब्ध झाली तर कुशल मुलं आणि मुली पाहिजे, यासाठी त्यांना पात्रतेप्रमाणे शिक्षण देण्यासाठी वर्ग सुरू केले” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आता जमाना पुढे जात आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट आणि लॉजिस्टिकचं मोठं क्षेत्र तयार झालं आहे. पोर्ट, एअरपोर्ट येत आहे, अशा ठिकाणी लोकांची गरज आहे. नोकरीची संधी गमावता कामा नये” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
“माझ्यासोबतची तज्ज्ञ लोकं नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. मागणी प्रमाणे ते माल पुरवणार आहेत. उत्तम दर्जेदार कुशल मुलं आणि मुलींची गरज आहे. कौशल्य देण्याचं काम शिवसेना भवनातून सुरू करत आहोत. 30 जणांची आम्ही बॅच घेत आहोत. त्यांना उद्या रोजगाराची हमी आहे. त्यांना विमानतळ आणि बंदराच्या ठिकाणी नेऊन प्रॅक्टिकल कामं दाखवलं जाईल. इथे शिकलेल्या विद्यार्थ्याला सर्टिफिकेट मिळाल्यावर त्याला नोकरी मिळाली पाहिजे. अशा पात्रतेचे तरुण तयार करणार आहोत” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
‘आमच्या इंडस्ट्री मध्ये लोकांची खूप गरज आहे’
“महाराष्ट्र हे इतर काही देशांपेक्षा मोठं राज्य आहे. राज्यातील क्षमतेचा वापर केला तर आपला देश मोठी इकोनॉमी होईल. महाराष्ट्रात मोठी इकोनॉमी होण्याची ताकद आहे. राज्यभर वर्ग सुरू करण्याची इच्छा आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “आमच्या इंडस्ट्री मध्ये लोकांची खूप गरज आहेत. ज्ञान हे खूप लागतं. संधी भरपूर आहे. लॉजिस्टिकची संधी मिळत नाही, ती इथे उपलब्ध करून दिली आहे. माणसं शिकण्यासारखी पाहिजे” असं शंतनू भडकंमकर म्हणाले.