Uddhav Thackeray Speech : गाढव ते गाढवच! कितीही भगवी शाल…ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात तुफान टोलेबाजी केली. त्यांनी आपल्या भाषणात शिंदे यांचे नाव न घेता जहरी टीका केली. तसेच भाजपाच्या कारभारावरही भाष्य केले.

Uddhav Thackeray Speech : गाढव ते गाढवच! कितीही भगवी शाल...ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल
uddhav thackeray speech
| Updated on: Oct 02, 2025 | 7:37 PM

Uddhav Thackeray Speech : दसऱ्यानिमित्त आज मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होत आहे. एकीकडे या मेळाव्याची तयारी केली जात होती, तर दुसरीकडे मुंबईत पावसाने ठाण मांडले होते. त्यामुळे ठाकरेंच्या दसरा मेळाव्यावर पासवाचे सावट आले होते. हा मेळावा होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. दरम्यान, आता पावसाला न जुमानता ठाकरे यांच्या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक हजर झाले आहेत. आपल्या या मेळाव्यात ठाकरे यांनी तुफान टोलेबाजी केली आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता बाळासाहेबांची शाल पांघरणारा गाढव, असे म्हणत टीका केली आहे.

बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं…

यावेळी बोलताना, जीवाला जीव देणारी माणसं हेच खरं सोनं असतं. अनेकांचं आपला पक्ष फोडण्याकडे लक्ष आहे. कारण त्यांना असं वाटलंय की काही लोकांना पळवलं आहे. त्यामुळे आताही पक्ष फोडता येईल. पण जे पळून गेले ते पितळ होतं. आता जे राहिले आहेत ते सोनं आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फुटीवर भाष्य केले. सोबतच त्यांनी वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे. पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरणाऱ्या गाढवाचं चित्र मी आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवावर कितीही शाली टाका. गाढव ते गाढवच असते. अमित शाहांच्या जोड्याचा भार वाहणारे ते गाढव आहे. जनता यांना एक दिवस जोडे मारणार आहे. तो दिवस काही लांब नाही, असे म्हणत ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली.

कळाबाईच्या कारभाऱ्याने स्वत:ची कमळं फुलवून घेतली

ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपाच्या कारभारावरही टीका केली. अनेकजण सांगत होते की आजचा मेळावा कसा घेणार. मी सांगत होतो की नेहमी जसा मेळावा घेतो, तसाच यंदाही मेळावा घेणार. उलट मी सांगायचो की यावेळी मोठा मेळावा होणार. असा जो चिखल झाला आहे, त्याला कारणीभूत ही कमळाबाई आहे. तुम्ही म्हणाल की पाऊस आणि कमाळाबाईचा काय संबंध आहे. पण कळाबाईच्या कारभाऱ्याने स्वत:ची कमळं फुलवून घेतली आहेत. बाकीच्यांच्या आयुष्याचा चिखल करून टाकला आहे, असे म्हणत भाजपाने मुंबईत चांगले काम केले नाही, असा आरोप केला.