AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात गरब्याच्या भर कार्यक्रमात शिंदेंच्या शाखाप्रमुखावर त्याने बंदूक रोखली अन्… नेमकं काय घडलं?

नवरात्रोत्सव सुरु असताना एका गरब्याच्या कार्यक्रमातील आनंद अचानक दहशतीमध्ये रुपांतरीत झाला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या...

ठाण्यात गरब्याच्या भर कार्यक्रमात शिंदेंच्या शाखाप्रमुखावर त्याने बंदूक रोखली अन्... नेमकं काय घडलं?
GarbaImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Oct 02, 2025 | 3:12 PM
Share

सर्वत्र नवरात्र उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो. ठाण्यातील उल्हासनगर येथे रंगलेला आनंदी नवरात्रोत्सवर दहशतीमध्ये अचानक बदलला. एका गरबा कार्यक्रमात सराईत गुन्हेगाराने शिवसेना शाखाप्रमुखावर बंदूक दाखवत हवेत गोळीबार केला. या घटनेमुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी तातडीने कारवाी केली आहे.

नेमकं काय घडलं?

उल्हासनगरमध्ये मंगळवारी कॅम्प 2 मधील 24 नंबर शाळा परिसरात बंजारा विकास परिषद येथे बालाजी मित्र मंडळ गरबा आयोजित करतो. या गरब्याचे आयोजक शिवसेना शाखाप्रमुख बाळा भगुरे हे आहेत. त्यांना स्थानिक सराईत गुन्हेगार सोहम पवार याने गरब्याच्या ठिकाणी रात्री साडे अकरा ते पावणे बारा वाजता अडवले. त्यानंतर सोहमे बाळा यांना प्रश्न विचारला की, “गरब्याला माझ्याकडून परवानगी घेतली का? मी इकडचा भाई आहे?” त्यानंतर तेथे उपस्थित असलेले सर्वजण घाबरले. सोहमने त्याच्या जवळ असलेली बंदूक काढली आणि बाळा भगुरे यांच्यावर निशाणा साधला.

वाचा: अभिनेत्री तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती? ऐकून फुटेल घाम

गुन्हेगार सोहमच्या कृत्याने गरब्यात एकच खळबळ उडाली. बाळा यांच्या भावाने प्रसंगावधान दाखवत मध्यस्थी केली.मात्र, चिडलेल्या सोहमने दहशत माजवण्यासाठी त्याच्या कडे असलेल्या बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या. यावेळी सोहमचा वडील अनिल पवारही दहशत निर्माण करण्यासाठी सोहमच्या बाजूने उभा असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती उल्हासनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष आव्हाड यांना मिळताच त्यांनी तत्काळ पोलिस पथकासह घटनास्थळ गाठत तपास सुरू केला आहे. या प्रकरणी बाळा भगुरे यांच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी केली आरोपीला अटक (Thane Crime News)

दरम्यान, बुधवारी पोलिसांनी वेगाने कारवाई केली. त्यांनी कॅम्प क्रमांक 4 येथून आरोपी सोहम पवार (वय 19) आणि त्याचे वडील अनिल पवार या दोघांना अटक केली. पोलिसांनी या दोघांकडून पिस्तुल जप्त केले आहे. या घटनेमुळे नवरात्रोत्सवाच्या आनंदाला आळा बसला असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.