AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक, ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, अपघातात एक जण जखमी तर…

Car Accident in Mumbai: मुंबईत ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं. अपघातावेळी आमदार महोदय कारमध्ये होते. तर त्यांचा चालक वाहन चालवत होता. मुंबई विमानतळावरून कांदवलीकडे जाताना हा अपघात झाला.

धक्कादायक, ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, अपघातात एक जण जखमी तर...
आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलंImage Credit source: फोटो प्रतिनिधीक
| Updated on: Sep 18, 2026 | 1:46 PM
Share

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : उद्धव ठाकरे सेनेचे आमदार सुनिल प्रभू यांच्या कारने पादचाऱ्याला उडवलं. अपघातात पादचारी व्यक्ती किरकोळ जखमी झाला, सुनील धुलविया असे जखमी इसमाचे नाव आहे. अपघात झाला तेव्हा आमदार सुनील प्रभू गाडीत होते आणि त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताची घटना घडली. मुंबई एअरपोर्टवरून कांदिवलीच्या दिशेने जाताना सुनील प्रभुंच्या गाडीचा धक्का लागून धुलविया जखमी झाला. जखमी इसमाच्या जबाबानंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

आमदारांनीच 100 क्रमांकावर केला फोन

मुंबई ठाकरे गटाचे आमदार सुनिल प्रभू यांच्या कारने पादचाऱ्याला उडवलं. अपघातात सुनील धुलविया हा पादचारी किरकोळ जखमी झाला. अपघात झाला तेंव्हा सुनील प्रभू गाडीत होते आणि त्यांचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या हद्दीत अपघाताची घटना घडली. मुंबई विमानतळाकडून कांदिवलीकडे जाताना ही घटना घडली. प्रभूंच्या वाहनाचा धक्का लागून हा इसम जखमी झाला. अपघात झाल्यानंतर सुनील प्रभू यांनी100 नंबरवर पोलिसांना फोन केला. आणि जखमीला रुग्णालयात नेण्यास सांगितलं अशीही माहिती समोर येत आहे. जखमी इसमाच्या जबाबानंतर गुन्हा दाखल केला जाणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावर टँकर पलटी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी येथील धोकादायक उड्डाणपुलाच्या वळणावर एक केमिकल वाहतूक करणारा टँकर पलटी झाला. गुरूवारी दुपारी अडीच वाजता हा अपघात घडला. गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणारा केमिकल टँकर पलटला. अपघातात टँकरचालक जखमी झाला. टँकरमधून मोठ्या प्रमाणात रसायनाची गळती झाली. त्याच्या उग्र वासाने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. चारोटी उड्डाणपुलावरील नागमोडी वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे टँकर पलटला. जखमी चालकाला तात्काळ कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या केमिकलचा वापर रंगनिर्मिती आणि इतर औद्योगिक कामांसाठी करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे.  या घटनेनंतर अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. टँकर बाजूला करण्याचे काम तात्काळ सुरू करण्यात आले. पण तोपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.

Follow Us
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC | तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन् फुल-घास चिन्हच गोठवलं
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?