AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी खळबळ! खासदारांच्या फुटीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले जे जातील…

पक्षातील खासदारांच्या संभाव्य फुटीवर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोठी खळबळ! खासदारांच्या फुटीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले जे जातील...
uddhav thackerayImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 15, 2026 | 5:24 PM
Share

UBT Party MP Revolt : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार बंड करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून हे खासदार नाराज असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता याच पक्षफुटीबाबत दिल्लीमध्ये मोठ्या हलाचाली वाढल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरेंचे खासदार वेगळा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. असे असतानाच आता उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांच्या या पहिल्या प्रतिक्रियेचे अनेक अर्थ काढले जात आहे.

आजचा दिवस माझा नाही, पण…

मिळालेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी खासदरांच्या फुटीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना जायचं आहे, त्यांनी खुशाल जावं, त्यांच भलं व्हावं. आजचा दिवस माझा नाही. पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल. बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जो सोडून जाईल, त्यांना एक दिवस नक्की पश्चात्ताप होईल, असे ठाकरे म्हणाले आहेत. तसेच कार्यकर्त्यांनी सहन करायला शिकावे, असे आवाहनही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे. त्यामुळेदेखील ठाकरे यांच्या पक्षातील फुटीबाबत वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते.

बैठकीला खासदार गैरहजर

पक्षात होणारी संभाव्य फूट लक्षात घेऊन उद्धव ठाकरे यांनी 14 जून रोजी आपल्या सर्व खासदारांची एक बैठक बोलवली होती. या बैठकीला एकूण 9 खासदारांपैकी 5 खासदार उनुपस्थित होते. परंतु ठाकरेंच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी उर्वरित 5 खासदारांनी ऑनलाईन हजेरी लावली, असा दावा केला होता. तसेच कोणताही खासदार आमच्या पक्षातून जाणार नाही, असा दावाही केला होता.

दिल्लीमध्ये नेमकं काय घडतंय?

सूत्रांच्या माहितीनुसार लवकरच ठाकरे यांच्या पक्षातील काही खासदार वेगळा गट स्थापन करणार आहेत. दिल्लीत ते आपल्या वेगळा गटाबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना देणार आहेत. एकीकडे ही चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरे यांच्या पक्षाचे  खासदार संजय देशमुख यांनी शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेतली आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी