AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच…

सोनम वांगचूक यांना रुग्णालयात दाखल करण्यावर उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच...
| Updated on: Jul 18, 2026 | 12:03 PM
Share

दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या 21 व्या दिवशी रुग्णालयात दाखल केले. दिल्ली पोलिसांनी कारवाई करत आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. वांगचुक यांनी शुक्रवारी रात्री संसदेवर मोर्च्याची आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु त्यांच्या 20 तारखेच्या आंदोलनाआधी दिल्ली पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर विरोधकांनी टीका केली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनीही सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं आहे. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी होती तर आधीच बोलायला हवं होतं, अशी पहिली प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. 

उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलनासाठी नागपुरात दाखल झाले. नागपुरात पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे माध्यमांशी संवास साधताना म्हणाले, ”निर्दयीपणी आणि क्रूरपणे युवकांच्या भवितव्याशी खेळलं जात आहे. लज्जास्पद आहे. वांगचुक यांच्या प्रकृतीची काळजी होती तर त्यांच्याशी आधीच बोलायला हवं होतं. मला कळत नाहीये, नीटची परीक्षा सरकार बरोबर घेऊ शकत नाही. म्हणून प्रशासनाचा संबंध नाही असं बोललो. आंदोलन नीट हाताळू शकत नाही. धर्मेद्र प्रधान यांच्यात असं काय आहे? किती बळी घेतल्यावर प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार आहे हे सरकारने एकदा जाहीर करावं. वांगचुक प्राणाहुती द्यायला तयार झाले आहेत. मुलं सुद्धा उपोषणाला बसले आहेत. नीट लीकमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. युवा शक्ती वाया जात असताना धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलंय की यांच्या चुकांवर सरकार पांघरून घालत आहे? असा सवाल त्यांनी केला.

‘पोलिसांचा जो दावा असेल कोर्टाची ऑर्डर दाखवावी. उचलून हॉस्पिटलमध्ये टाका असं कोर्टाने म्हटल्याची ऑर्डर दाखवावी. पोलिसांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली आहे. यापूर्वीही अनेक उपोषणे झाली आहेत. महात्मा गांधींनीही केली होती. चर्चा केल्यावर उपोषण सोडलं जातं. अण्णा हजारे यांचं उपोषण चर्चा करून सोडवलं गेलं. काँग्रेसचं सरकार असताना. आता भाजप सरकारनेही वांगचुक यांच्याशी चर्चा करून उपोषण सोडवावं, असेही ठाकरे म्हणाले.

‘मला वाटतं मोर्चा निघाला पाहिजे. २० तारखेला मोर्चा झाला पाहिजे. सरकार चालवणं म्हणजे आपलं म्हणणं रेटून नेणं नाही. यालाच हुकूमशाही म्हणतात. भाजप आणि प्रशासनाचा दुरान्वये संबंध नाही.त्यांना कुणाच्या प्राणाची किंमत नाही. आमचं म्हणणं हेच खरं असं सुरू आहे. भाजप आणि प्रशासनाचा संबंध राहिला नाही. त्यांना सरकार चालवता येत नाही. उपोषण हाताळता येत नाही. नीट परीक्षा व्यवस्थित घेतली जात नाही, म्हणून उपोषण सुरू होतं, अशी टीका ठाकरेंनी केली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...