
उद्धव ठाकरे सध्या मराठवाडा दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान ते शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, या मागणीवर ते ठाम आहेत. मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणी त्यांच्याकडून केली जातंय. 7 नोव्हेंबरपर्यंत ते मराठवाड्याच्या दाैऱ्यावर असून विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. नुकताच उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीका केलीये. केंद्रीय पथक झालेल्या नुकसानीची पाहणी मोबाईलची बॅटरी लावून करत असल्याचे त्यांनी म्हटले. भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना उद्धव ठाकरे दिसले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले की, पीक विम्याचे 40 ते 50 हजार मिळायला हवे होते. मोसंबीला 80 हजार मिळायला हवे होते. कापसाला वेगळे हवे होते. पीक विम्याचे पैसे मिळाले. तुम्ही खोटं बोलत आहेत. अकोल्यात 2 रुपये तीन रुपये मिळाले. पालघरमध्ये अडीच रुपये मिळाले. शेतकऱ्यांची थट्टा सुरू आहे. जेवढे तुम्ही भरले तेवढेही मिळाले नाही. सहा रुपये आले. बँकेचं स्टेटमेंट आहे. मुख्यमंत्र्यांनी अजब शोध लावला.
मुख्यमंत्री म्हणत आहेत, आता जर कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल. आता कोणी तरी मला गणित सांगा बँकांचा फायदा होऊ न देता कर्जमाफी कशी देतात. आता कर्ज नाही फेडलं तर खरीपाचं कर्ज मिळणार का. 30 जूनला कर्जमाफी देणार असेल तर तोपर्यंत हप्ते भरायचे की नाही भरायचे. भरायचे असेल तर कुठून भरायचे. कर्जमाफी करण्या आधी माती तर द्या. मग कर्ज द्या. मी हा विषय सोडणार नाही.
कर्जमुक्ती करा. आताच्या आता करा. निवडणुकीसाठी कर्जमुक्ती केली आहे. खोटं बोलत आहेत. सरकारने जाहीर केलेले पॅकेज आम्हाला मान्य नसल्याचेही सांगताना उद्धव ठाकरे दिसले. पॅकेज मान्य नाही पण जे जाहीर केलं ते तरी द्या ना. शेतकरी कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जमाफी झालीच पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. मराठवाड्यातील काही भागांमध्ये मोठा पाऊस झाला आणि शेतांचे मोठे नुकसान झाले.