AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या हातात लाठ्या असतील, बंदुका असतील पण…, उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट मोठा इशारा, शिवाजी पार्कमधून रणशिंग फुंकलं

नेट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर दादरच्या शिवाजी पार्क येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले आहेत, दरम्यान या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी देखील भेट दिली आहे.

तुमच्या हातात लाठ्या असतील, बंदुका असतील पण..., उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट मोठा इशारा, शिवाजी पार्कमधून रणशिंग फुंकलं
uddhav thackeray Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 24, 2026 | 5:42 PM
Share

नीट पेपरफुटीवरून सध्या देशात वातावरण चांगलंच तापलं आहे. गेल्या एक महिन्यापासून जंतर -मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्यामुळे आता देशभरात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आज मुंबईतील शिवारीज पार्क मैदानात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येनं विद्यार्थी सहभागी झाले आहेत. दरम्यान या आंदोलनाला आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी देखील भेट दिली आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आता थेट सरकारला मोठा इशारा दिला आहे.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

‘माझ्या देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. या चार दिवसांमध्ये आपण या जागेवर दुसऱ्यांना भेटलेलो आहोत. परवा मी दिल्लीला जाऊन आलो. रविवारी आपण पुन्हा भेटणार आहोत.  या गर्दीचं एक वैशिष्ट आहे, अनेक जण सांगतात की इकडे आमच्या ओळखीचं कुणी नाहीये, आणि नेमकी हीच गोष्ट महत्त्वाची आहे, आपण सर्व भारतीय आहोत, हिंदूस्थानी आहोत. आपल्याला आपली ओळख विसरायला भाग पाडून, आपल्याला भीती दाखवून आतापर्यंत आपल्यावर जे राज्य करत आहेत, त्यांनी हे दृष्य पहाण्यासारखं आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की मला त्यावेळी अनेकांनी विचारलं तुम्हाला काही बोलयाचं आहे का? तेव्हा मी म्हणालो मला काही बोलयाचं नाही, पण हा जनतेचा आवाज आहे, आणि हा आवाज दिल्लीवाल्यांना ऐकावाच लागेल. मी तमाम देशबांधवांना सांगतोय, दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, ठीक आहे, मी आता सरकारला इशारा देतोय, तुमच्या हातात बंदूका असतील, तुमच्या हातात लाठ्या असतील, पण आमच्या हातात हा तिरंगा आहे. या तिरंग्याशी लढत देण्याची आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नाही. या तुम्ही लाठ्या घेऊन या, बंदूका घेऊन या, मी तिरंगा घेऊन येतो. बघू तिरंगा जिंकतो की तुमची हुकूमशाही जिंकते, असा इशारा यावेळी उद्धव ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.

Follow Us
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
लंडनमध्ये एकनाथ शिंदेंना मोठा सन्मान, मराठी संस्कृतीचा केला गौरव
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं...
अरे हे काय घडलं? शिंदे गटाला मोठा धक्का... पक्षातील अनुभवी नेत्याचं पद धोक्यात
‘मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली?’ रोहित पवारांचा MPSC ला
मार्किंग पॅटर्न लीक झाला तर परीक्षा का घेतली? MPSC प्रकरणात नवा ट्विस्ट
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, आता परीक्षा कधी?
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडीओ शेअर केला अन् आज...
अभिजीत दीपकेचा मोठा निर्णय; काल व्हिडिओ शेअर केला अन् आज...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...