AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे युती होणार? ‘मातोश्री’वरून सर्वात मोठी अपडेट

गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, आता या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना विचारणा केल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिकेसाठी शिवसेना ठाकरे गट, मनसे युती होणार? 'मातोश्री'वरून सर्वात मोठी अपडेट
| Edited By: | Updated on: Jun 18, 2025 | 3:41 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. महाराष्ट्राच्या हितापुढे आमच्यामधील वाद, भांडंण किरकोळ असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचं स्वागत केलं होतं, युतीची तयारी दाखवली होती.

दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीच्या चर्चेनं जोर धरला आहे.  समोर आलेल्या माहितीनुसार आज ‘मातोश्री’वर पार पडलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकेर यांच्याकडून मनसेसोबत युती करायची की नाही? याबाबत पक्षाच्या माजी नगरसेवकांना विचारणा करण्यात आली आहे.

यावर युती केली तर फायदाच होईल अशी कबुली माजी नगरसेवकांनी दिल्याची माहिती देखील समोर येत आहे. मुंबईत युतीला अनुकूल वातावरण असल्याचंही माजी नगरसेवकांचं म्हणणं आहे. मुंबई महानगर पालिकेसाठी आपल्याला ज्या पक्षासोबत युती करायची आहे, त्यासंदर्भात तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय होईल, असंही या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

तुम्ही सोबत राहिलात, तुम्ही निष्ठावंत आहात. येत्या काळात आपल्याला अनेक बैठका घ्यायच्या आहेत. येत्या ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागू शकते. लवकरच शिवसेना भवन येथे आपण निवडणूक कार्यालय उघडणार आहोत, असंही या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज झालेल्या बैठकीवर प्रतिक्रिया देताना माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितलं की,  आज मातोश्रीवर बैठक झाली ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये निवडणूक लागू शकते असं उद्धव साहेब म्हणाले. त्यामुळे त्यावेळी महानगर पालिकेवर भगवा फडकवायचा असा निर्धार आम्ही केला आहे.  युती संदर्भात आम्हाला विचारणा केली, त्यावर आमचं म्हणणं आम्ही सांगितलं. सध्या वातावरण अनुकूल आहे असं आमचं म्हणणं आहे, ते आम्ही सांगितलं. सध्या एकत्रित आंदोलन होत आहे, कार्यकर्ते देखील काम करत आहेत, असं पाटील यांनी म्हटलं.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.