मी राजकारण उत्तम करतो त्यामुळे मला राजकारण करू द्या, तुम्ही…, फडणवीसांचा ठाकरे बंधूंना मिश्किल टोला, काय दिला सल्ला?
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. यावेळी फडणवीस यांनी ठाकरे बंधूंना मिश्किल टोला देखील लावल्याचं पहायला मिळालं.

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकाच व्यासपीठावर हजेरी लावली. दरम्यान कार्यक्रमापूर्वी फडणवीस आणि दोन्ही ठाकरे बंधू य़ांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली. ही चर्चा नेमकी कोणत्या विषयावर झाली हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आज राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर आल्याचं पहायला मिळालं. दादरच्या शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मिश्लिल टोला देखील लावल्याचं पहायला मिळालं.
‘मला राजकारण चांगल येतं, मी राजकारण करतो राजजी उत्तम व्यंगचित्रकार आहेत, उद्धव जी उत्तम छायाचित्रकार आहेत त्यांनी तेच करायला हवं. मला राजकारण करू द्या, असा मिश्किल टोला देखील यावेळी फडणवीस यांनी दोन्ही ठाकरे बंधूंना लगावला. दरम्यान आम्ही तिघे एकाच व्यासपीठावर आलो याचं मला अजिबात विशेष काही वाटलं नाही. कलेसाठी आम्ही असे एकत्र येण्यास नेहमी तयार असतो, असंही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी बोलण्याचा फायदा इतकाच की आता राज ठाकरे हे यावर काहीही बोलू शकणार नाहीत, त्यामुळे मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. व्यंगचित्र ही अशी एक कला आहे ज्यात काहीही एक शब्दही न बोलता जे बोलायचं आहे ते बोलता येत व्यक्त होता येत. एखादा अग्रलेख जेवढं सांगून जातो तेवढच एक व्यंगचित्र सांगून जातं. व्यंगचित्र आमच्यावर निघत असतात. आम्ही ऑब्जेक्ट सब्जेक्ट आहोत. मी राज ठाकरेंना विनंती केली होती माझ नाक मोठ काढा, कान मोठ काढा पण पोट कमी दाखवा राज ठाकरे यांनी ते ऐकल सध्यातरी असे कुठलेही व्यंगचित्र त्यांचं आलेल नाही पण बाकीचे काही ऐकत नाहीत, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.