
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज चारकोप विधानसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी कांदिवली पश्चिम विभाग क्रमांक 2 येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी चारकोप येथील मालवणी महोत्सवात सहभाग घेतला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांना बॉम्बे नावावर भाष्य करताना मोठी घोषणा केली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटले ते जाणून घेऊयात.
चारकोप येथील मालवणी महोत्सवात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘बऱ्याच वर्षांनी किंवा मला असं वाटतं प्रथमच या महोत्सवाला मी आलेलो आहे. मला वाटतंय मी मालवणला आलो आहे. आपल्या मालवणच्या पदार्थाचा दरवळ आहे. हल्ली या बाजूला येणे होत नाही. ट्रॅफिक वाढत आहे. मुंबईत सोयी ऐवजी गौरसोय वाढत आहे. मुंबईची हवा आता घातक होत चाललीय आपले राज्यकर्ते अकलेचे तारे तोडत आहेत.’
पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, मागील दोन चार वर्ष पालिकेत जो भ्रष्टाचार झालाय त्याचा उद्रेक झालाय. आता दोन्ही भगवे एकत्र झाले. काहीजण म्हणतात मुंबईचा महापौर हिंदू होणार आम्ही मराठी महापौर केले केले ते हिंदू नव्हते का? आम्ही हिंदू आहोत. पण महाराष्ट्राचा बळी जाऊ देणार नाही. हिंदीचा आम्हाला द्वेष नाहीये, पण सक्ती का करता. जिकडे बॉम्बे असेल तिकडे आम्ही मुंबई करू अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
आपल्या भाषणात उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, ‘मुंबईकरांच्या प्रेमात हे मिठाचा खडा टाकत असतील तर त्यांना बाजूला करण्या शिवाय राहणार नाही. अ मराठी मुस्लिमही म्हणत आहेत की त्यांना मुंबई शिवसेनेच्या ताब्यात हवी आहे. पक्ष चोरू शकतात पण आपले प्रेम चोरू शकत नाहीत. एक मालवणी जत्रोत्सव गिरगावमध्ये केला पाहिजे. कोंबडी वडे गिरगाव चौपाटीवर झाले पाहिजे. कधीही निवडणूक होईल. पंतप्रधान सांगतात ऑन नेशन ऑन इलेक्शन आम्ही सांगतो ऑन नाव ऑन मत.’