ठाकरेंचा खासदार भाजपात? बड्या नेत्याच्या सूचक विधानाने खळबळ; राजकारणात मोठ्या भूकंपाचे संकेत?

Maharashtra Politics : उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एक खासदार भाजपमध्ये सामील होण्याचे संकेत भाजपच्या बड्या नेत्याने दिले आहेत. याची माहिती जाणून घेऊयात.

ठाकरेंचा खासदार भाजपात? बड्या नेत्याच्या सूचक विधानाने खळबळ; राजकारणात मोठ्या भूकंपाचे संकेत?
Shivsena ubt MP may join BJP
Image Credit source: Google
| Updated on: Jun 10, 2026 | 4:13 PM

राज्यात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अनेक नेत्यांनी आपापल्या सोयीनुसार पक्षांतर केलेले आहे. खासकरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुतीतील पक्षांमध्ये प्रवेश केलेला आहे. यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे अनेक नेते एकनाथ शिंदे यांची शिवसेना किंवा भाजपमध्ये सामील झाले आहेत. अशातच आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. एक खासदार भाजपमध्ये सामील होण्याचे संकेत भाजपच्या बड्या नेत्याने दिले आहेत. त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ठाकरे गटाचा हा खासदार भाजपमध्ये…?

राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी म्हटले की, ‘आजारी असल्याने राज्यात किंवा देशात काय सुरू माहीत नाही. आज पश्चिम बंगालमधील 20 खासदारांनी बाहेर पडून NDA ला पाठींबा दिला. विविध राज्यांमध्ये नेते पंतप्रधान मोदी यांचे नेतृत्व स्वीकारण्यास इच्छूक आहेत. NDA किंवा घटक पक्ष आहेत यांना फार प्रयत्न करण्याची आवशक्ता पडत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे जर त्या यादीमध्ये असतील तर त्यांचे स्वागतच आहे. ते येतात की नाही येत हा त्यांचा निर्णय, जर ते आले तर आम्हाला वाईट वाटण्याचे काही कारण नाही.’ दरम्यान, वाकचौरे जर भाजप किंवा महायुतीतील पक्षात सामील झाले तर हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का असणार आहे.

पंतप्रधान मोदींचे कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान भूषविण्याचा विक्रम केला आहे. यावर बोलताना मोदींनी म्हटले की, जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात सलग 12 वर्ष देशाचा प्रधानमंत्री राहणे हे मोदींनी साध्य करून दाखवलं आहे. हे त्यांच कतृत्व, कार्यक्षमता अधोरेखीत करतं. भाजपच्या वतीने पुढील 15 दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल आहे. ज्यांनी पक्षासाठी वर्षानुवर्ष काम केल, संघर्ष केला, त्यांच्यासाठी आजचा दिवस समर्पित आहे.

Follow Us