AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : हिंदुंच्या मंगळसूत्राचं आता रक्षण कोण करणार? सौगात-ए-मोदीवरुन उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray : "मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आली तर पुरणपोळी द्यायची. आता जे उडाण टप्पू आहेत ते कसे टोपी घालून कसे जातात ते पाहा. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आऱोप करण्यापूर्वी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढला" अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Uddhav Thackeray : हिंदुंच्या मंगळसूत्राचं आता रक्षण कोण करणार? सौगात-ए-मोदीवरुन उद्धव ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 27, 2025 | 1:01 PM
Share

“अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं? अधिवेशनाने देशाला, राज्याला चांगलं गाणं दिलं. हे समाधान मानावं लागेल. कबरीपासून कामरापर्यंत असं अधिवेशन आहे. हे जयंत पाटील म्हणाले ते बरोबर आहे. सत्ताधाऱ्यांचा माज दिसला. या पूर्वी कधीही गेल्या काही वर्षात विरोधी पक्षाने राज्यपलांकडे जाऊन सत्ताधारी आपल्या पाशवी मताचा वापर कसा करतात आणि त्याचा वापर कसा करतात हे सांगितलं. असं कधी घडलं नव्हतं” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “गेल्या अनेक वर्षात सभापतीवर पहिल्याच अधिवेशनात अविश्वास ठराव आणावा लागला. असं कधीच झालं नव्हतं. अधिवेशन काळात बोलू दिल्या असतं आणि उत्तरं दिली असती तर मला जनतेसमोर बोलण्याची वेळ आली नसती” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा अशा घोषणा केल्या. वारेमाप घोषणा केल्या. जनतेला फसवा, जनता भोळीभाबडी आहे. मग सत्तेत यायचं आणि जनतेना चिरडून टाकलं. ही दडपशाही आहे. ही दडपशाही ब्रिटीशांना जमली नाही ती यांना काय जमणार?” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “मुस्लिमांनी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मतदान केल्यावर यांचे डोळे पांढरे झाले होते. मुस्लिमांनी मते दिले तर सत्ता जिहाद म्हणायचे. आता ईद निमित्त सौगात हे मोदी हा कार्यक्रम भाजपने घेतला आहे. ३२ लाख मुस्लिमांच्या घरी जाऊन ३२ लाख भाजपचे कार्यकर्ते भेट देणार आहे. हा सौगात ए मोदी नाही. हा निर्लज्जपणा आहे. सौगात ए सत्ता आहे. हे बोगस हिंदुत्ववादी आहेत” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

‘हिंदुंच्या मंगळसूत्राचं आता रक्षण कोण करणार?’

“मुस्लिमांच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणुका आली तर पुरणपोळी द्यायची. आता जे उडाण टप्पू आहेत ते कसे टोपी घालून कसे जातात ते पाहा. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा आऱोप करण्यापूर्वी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढला. हिंदुंच्या मंगळसूत्राचं आता रक्षण कोण करणार? आता आहे का हिंदुत्ववादी पक्ष?” असं उद्धव ठाकरे म्हणाले. “सौगात ए सत्ता ही बिहार, यूपी निवडणुकीपर्यंतच राहणार की अजूनही राहणार आहे. भाजपने एकदा हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं” अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी