AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल, आता भाजपमध्ये सगळे आयाराम…अन् भाजप कार्यकर्ते सतरंज्या..

Uddhav Thackeray : राज्यात भाजपचे सरकार आले पण निष्ठावंत कार्यकर्त्यांना काहीच मिळाले नाही. शिवसेना फोडल्यानंतर डबल इंजिन सरकारमध्ये आणखी एक डबा अजित पवार यांचा जुळला आहे. यामुळे खरा अन्याय निष्ठावंत कार्यकर्त्यांवर होत आहे.

उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल, आता भाजपमध्ये सगळे आयाराम...अन् भाजप कार्यकर्ते सतरंज्या..
Uddhav Thackeray Speech
| Updated on: Aug 27, 2023 | 4:10 PM
Share

हिंगोली | 27 ऑगस्ट 2023 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाची सभा रविवारी हिंगोलीत झाली. या सभेतून पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र केले. त्यांनी भाजपच्या राजकारणावर जोरदार टीका केली. त्यासाठी त्यांनी भाजप वाढवणाऱ्या कार्यकर्त्यांची आज काय परिस्थिती झाली आहे, हे सांगून भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेतील गद्दारांवर टीका केली. उद्धव ठाकरे यांचे संपूर्ण भाषण हे भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर केंद्रीत झालेले होते.

काय म्हणाले उद्धव ठाकरे

शिवसेना २५ ते ३० वर्षे भाजप सोबत युतीत होते. त्यावेळी आमच्यासोबत भाजपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज आम्हाला किव वाटते. या कार्यकर्त्यांनी भाजपसाठी आयुष्य झिजवले. त्यांनी मेहनत करुन भाजप हा पक्ष मोठा केला. परंतु तेच कार्यकर्ते आज उपाशी राहिले असून तूपशी मात्रा आयाराम झाले आहेत. यासाठीच तुम्ही भाजपसाठी मेहनत घेतली होती का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना विचारला.

डबल इंजिनमध्ये अजित दादा अन्

मला भाजपच्या कार्यकर्त्यांची दया येते. त्या कार्यकर्त्यांनी रात्रदिवंस मेहनत केली अन पक्ष वाढवला आहे. परंतु त्यांना आज सतरंज्या उचलाव्या लागत आहेत. सरकार आले पण त्यांना काहीच मिळाले नाही. शिवसेना फोडल्यानंतर डबल इंजिन सरकारमध्ये आणखी एक डबा अजित पवार यांचा जुळला आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांना काहीच मिळाले नाही. भाजपमध्ये तुम्हाला नेते घडवता येत नाही का? तुमच्या पक्षात नेते नाहीत का? तुम्हाला नेते माझे लागतात. वडील माझेलागतात. त्या दिल्लीच्या वडिलांची काय हिंमत राहिली नाही का? हे नामार्द आहेत. त्यांना स्वत:चे काही विचार नाही. भाजप फक्त कार्यकर्त्यांना वापरून घेते.

कुलभूषण जाधव यांचे काय झाले

पाकिस्तानात असणाऱ्या कुलभूषण जाधव याला सोडवण्यासाठी तुम्ही काय केले? तो पाकिस्तानी तुरुंगातून केव्हा बाहेर येणार आहे. तो तुरुंगात जिवंत आहे की मेला आहे? हे माहीत नाही आणि तुम्ही पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळत आहात, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला.

भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....