
कोणत्याही राजकीय कारणासाठी पत्रकार परिषद नाही. आपल्याच घरात मातृभाषेच्या लढ्यासाठी आहे असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी कारण नसताना हिंदीची सक्ती हा विषय जो काही महाराष्ट्रद्रोही सरकारकडून लादला जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र आली पाहिजे असे परखड मत मांडले. तसेच त्यांनी मराठी कलाकार आणि खेळाडूंनाही आवाहन केले आहे.
भाषेला नाही सक्तीला विरोध- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘मराठी भाषा भवनाचं उद्घाटन आम्ही केलं होतं. अजितदादाही सोबत होते. आता अजितदादा गप्प का आहे? तिथे एक वीटही रचली नाही. आता ते बिल्डरला दिलंय का माहीत नाही. आम्ही हिंदीला विरोध आहे. आम्ही सक्ती होऊ देणार नाही. नाही म्हणजे नाही. आमचा भाषेला विरोध नाही. सक्तीला विरोध आहे.’
वाचा: इराण- इस्त्रायल युद्ध संपले, पण 12 दिवसांमध्ये झालेल्या नुकसानाचा आकडा ऐकून बसेल धक्का!
“मराठी माणसाला या लढ्यात येण्याचं आवाहन”
पुढे ते म्हणाले, ‘भाजपचं एकाधिकारशाहीचं धोरण आहे. यातून छुपा अजेंडा आहे. आम्ही दीपक पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहोत. मी तमाम मराठी माणसाला या लढ्यात येण्याचं आवाहन करत आहे. चित्रपटसृष्टीतील विशेषता मराठीतील, खेळाडूंनी उतरावं, वकिलांनी उतरावं. साहित्यिक आलेच. जे जे मराठी आहेत, त्यांनी या आंदोलनात उतरावं. भाजपमधील सुद्धा अस्सल मराठी माणसांनी या आंदोलनात उतरावं. भाजपमध्ये अस्सल माणसं शोधणं हा संशोधनाचा विषय आहे. कोणी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही हिंदीची सक्ती लागू होऊ देणार नाही. सरकारच्या अधिकाऱ्यांना आझाद मैदानात भेटेल. आमचं आंदोलन सुरू असताना.’
शिवसेनेचा जन्मच मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी झाला आहे. आता समजलं असेल यांना शिवसेना का संपवायची आहे. कारण यांना महाराष्ट्रावर हुकूमशाही लादायची आहे. कारण तसं पाहिलं तर आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही, कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण याचा अर्थ कोणतीही भाषा आमच्यावर सक्तीने लादून घेणार नाही. आम्ही दीपक पवार यांच्या सोबत आहोत. मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना त्यात सहभागी होणार आहोत असे ते म्हणाले.