AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात? ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित असलेला खासदार माध्यमांसमोर, म्हणाला उद्या मीही दिल्लीला…

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठाकरे गटाचे खासदार शिंदेंच्या संपर्कात? ठाकरेंच्या बैठकीला उपस्थित असलेला खासदार माध्यमांसमोर, म्हणाला उद्या मीही दिल्लीला...
उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 15, 2026 | 6:11 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे एकनाथ शिंदे यांच्या संर्पकात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे लवकरच नवा गट स्थापन करण्याची शक्यता आहे. रविवारी उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांची बैठक बोलावली होती. उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावल्यापासूनच ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या या बैठकीला पक्षाच्या एकूण 9 खासदारांपैकी 4 खासदारच उपस्थित होते. इतर खासदार ऑनलाईन उपस्थित होते, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली, तसेच सर्व खासदार आमच्यासोबत असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता.

परंतु आता सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटात घडामोडींना वेग आला असून, खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी हे वृत्त फेटाळून लावलं आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीला राजाभाऊ वाजे हे प्रत्यक्ष उपस्थित होते.

‘वेगळा गट स्थापन करणार यात कोणतंही तथ्य नाही, मी संध्याकाळी कमासाठी दिल्लीला जाणार आहे, कामासाठी मला दिल्लीत जावं लागतं. मला याबद्दल माहिती नाही. कालच मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीला आम्ही चौघंजण हजर होतो. बाकीचे सर्वजण ऑनलाईन उपस्थित होते. त्यामुळे या चर्चेत काही तथ्य आहे, असं मला वाटत नाही, असं राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान  शिवसेना ठाकरे गटाच्या खासदारांनी दिल्लीत जाऊन प्रतापराव जाधव यांची भेट घेतली, आहे त्यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. ‘मला त्यात काही विशेष वाटत नाही, संजय देशमुख हे रविवारी व्हीसीद्वारे उद्धव ठाकरे यांच्याशी बोलले, आणि प्रतापराव जाधव हे देशाचे मंत्री आहेत. त्यामुळे मंत्र्यांना भेटायला गेले म्हणजे वेगळा गट स्थापन करतो असा त्याचा अर्थ होत नाही. मी उद्या दिल्लीला जाणार आहे, परवा माझी बैठक आहे, दिल्लीला कमिटीची बैठक आहे, त्यामुळे मी उद्या संध्याकाळी दिल्लीला जाणार आहे. त्यामुळे असं कामानिमित्त कोणीही दिल्लीला जाऊ शकतं, परंतु त्याचा अर्थ असा होत नाही, असं यावेळी राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी