महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचं समाधानकारक काम नाही, केंद्रीय आरोग्य सचिवांचं महाराष्ट्राच्या मुख्य आरोग्य सचिवांना पत्र

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार उडाला आहे. राज्यात दररोज कोरोनाचे 50 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत (Union Health Secretary letter to the Chief Health Secretary of Maharashtra on Corona Pandemic)

महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचं समाधानकारक काम नाही, केंद्रीय आरोग्य सचिवांचं महाराष्ट्राच्या मुख्य आरोग्य सचिवांना पत्र
केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 8:30 PM

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा हाहा:कार उडाला आहे. राज्यात दररोज कोरोनाचे 50 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आकडा लक्षात घेता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही पथक राज्यात पाठवले होते. हे पथक गेल्या आठवड्याभरापासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेत होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या 30 पथकांनी राज्यातील विविध भागांची पाहणी केल्यानंतर काही सूचना नोंदवल्या आहेत. याच सूचनांची माहिती देण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य आरोग्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवले आहे (Union Health Secretary letter to the Chief Health Secretary of Maharashtra on Corona Pandemic).

पत्रात अनेक सूचना नोंदवल्या

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा अनेक भागांमध्ये कमी पडत असल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. महाराष्ट्र आरोग्य विभागाने याबाबत गांभीर्याने विचार करुन कामकाज करावे, असा सल्ला पत्रात देण्यात आला आहे. या पत्रात महाराष्ट्रात काम करणाऱ्या 30 केंद्रीय पथकांनी काय सूचना नोंदवल्या आहेत याबाबत उल्लेख करण्यात आला आहे (Union Health Secretary letter to the Chief Health Secretary of Maharashtra on Corona Pandemic).

केद्रींय आरोग्य पथकाच्या महाराष्ट्र सरकारला 11 सूचना

1) सातारा, सांगली आणि औरंगाबादमधील कंटेन्मेंट झोनमध्ये प्रशासनाकडून समाधानकारक काम नाही. 2) सातारा, सांगली, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग योग्य पद्धतीने नाही. मनुष्यबळाच्या कमरतेमुळे हे काम योग्यरितीनं होत नाही. 3) सातारा, भंडारा, पालघर, अमरावती, जालना, लातूर जिल्ह्यातील कोरोना चाचणी क्षमता बाधित झाली आहे. त्यामुळे कोरोना रिपोर्ट येण्यास उशीर होतोय. 4) नांदेड – बुलढाण्यात आरटीपीआर चाचण्यांच्या रेश्यो योग्य नाही. 5 ) भंडारा आणि साताऱ्यात अनेक रूग्ण घरीच विलगीकरणात, या रूग्णांसोबत सतत फॉलोअप ठेवून मृत्यूदर कमी करावं लागणार. 6 ) साताऱ्यात रूग्णालयात दाखल झाल्यानंतर 72 तासात मृत्यू होणाऱ्या रूग्णांचं प्रमाण अधिक 7) अहमदनगर, औरंगाबाद, नागपूर, नंदुरबारमध्ये रूग्णांना जास्त वेगाने बेड्स कोरोना रूग्णांना लागत आहे 8) भंडारा, पालघर, उस्मानाबाद आणि पुण्यात ऑक्सिजन पुरवठ्यात समस्या 9) सातारा आणि लातूर जिल्ह्यात व्हेंटिलेटरमध्ये खराबी पाहवण्यास मिळाली 10) औरंगाबाद, नंदुरबार, यवतमाळ, सातारा, पालघर, जळगाव, जालना जिल्ह्यात आरोग्य सेवकांचा स्टाफ कमी आहे. या ठिकाणी अनेक आरोग्य सेवकांची गरज 11) कोविड संदर्भातील वागणुकीची योग्य अमलबंजावणीची अनेक जिल्ह्यात कमतरता. यासाठी आधिक क्षमतेनं ते करावं लागेल.

संबंधित बातमी : पुण्यात रेमेडेसिव्हीर इंजेक्शन हवंय ?, मग ‘या’ नंबरवर कॉल करा

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.