पुण्यात रेमेडेसिव्हीर इंजेक्शन हवंय ?, मग ‘या’ नंबरवर कॉल करा

पुण्यात रेमेडेसिव्हीर इंजेक्शन हवंय ?, मग 'या' नंबरवर कॉल करा (pune district collector passed order to set control room to manage supply of remdesivir injection)

पुण्यात रेमेडेसिव्हीर इंजेक्शन हवंय ?, मग 'या' नंबरवर कॉल करा
Remdesivir price cheaper
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 7:04 PM

पुणे : कोरोनावर उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीरचा तुटवडा जाणवू लागल्याने रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. अनेक ठिकाणी रेमेडेसिव्हीर खरेदी करण्यासाठी लोकांच्या लांब रांगा लागत आहेत. पुण्यात तर रोज हजारोंच्या संख्येने नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी रेमेडेसिव्हीरची मोठी गरज भासत आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांनी रेमेडेसिव्हीर इंजेक्शन वितरणासाठी नियत्रंण कक्ष सुरु केला आहे. रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचे वितरण सुलभ व्हावे हा यामागचा उद्देश आहे. (Pune district collector passed order to set control room to manage supply of Remdesivir injection)

फक्त एक कॉल करा 

पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. येथे रोज हजारो नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे येथे आरोग्य यंत्रणेवर ताण पडतोय. तसेच येथे औषधांचासुद्धा तुटवडा जाणवतोय. रेमेडेसिव्हीरसारख्या इंजेक्शनचा काळा बाजार जोमता सुरु असल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा साठा करुन ठेवणे, नंतर ते अवैधरित्या चढ्या भावाने विकणे असे प्रकार येथे अनेक ठिकाणी घडत आहेत. ही गंभीर परिस्थिती घेऊन पुण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये ज्यांना रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची गरज असेल त्यांना फक्त एका कॉलवर ते उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 020-26123371 किवा 1077 टोल फ्री नंबरवर कॉल केल्यांनतर रेमेडेसिव्हीर इंजेक्शन मिळणार आहे. हे नियंत्रण कक्ष आगामी 31 मे पर्यंत सुरु राहील.

रेमेडेसिव्हीरच्या निर्यातीवर बंदी

दरम्यान, देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. मागील अनेक दिवसांपासून देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या पार्श्वभूमीवर देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण वाढला असून दुसरीकडे रुग्ण वाढत असल्यामुळे औषधांचा तुटवडासुद्धा जाणवतो आहे. कोरोनावरील उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तर मोठा तुटवडा भासू लागलाय. औषधांची अशीच वाणवा राहिली तर आगामी काही दिवसांत परिस्थिती गंभीर होणार असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशात तयार होणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. जोपर्यंत देशातील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नाही तोपर्यंत इंजेक्शन देशाबाहेर न पाठवण्याचे  केंद्र सरकाने रेमेडेसिव्हीर तयार करणाऱ्या कंपन्यांना निर्देश दिले आहेत.

इतर बातम्या :

Corona Cases and Weekend Lockdown News LIVE : राज्यात आठ दिवसांच्या लॉकडाऊनची दाट शक्यता, टास्क फोर्स लॉकडाऊनच्या बाजूने

LIVE |  छत्तीसगढ, बीजापूर येथील नक्षल हल्याच्या पार्श्वभूमीवर अलर्ट, नक्षलवाद्यांच्या हालचालींवर पोलिसांचा वॅाच 

Remdesivir Injection | भारत सरकारनं रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवली, मोदी सरकारचा मोठा निर्णय

(Pune district collector passed order to set control room to manage supply of Remdesivir injection)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.