फडणवीस, शिंदे, अजितदादा पक्के बनिया… शाह यांची मिश्किल टिप्पणी; पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी अमित शाह यांची घोषणा काय?

महाराष्ट्रामध्ये यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतीच मोठी घोषणा केली आहे.

फडणवीस, शिंदे, अजितदादा पक्के बनिया... शाह यांची मिश्किल टिप्पणी; पूरग्रस्त महाराष्ट्रासाठी अमित शाह यांची घोषणा काय?
| Updated on: Oct 05, 2025 | 2:57 PM

महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीसदृश पाऊस पाहायला मिळाला. या अतिवृष्टीमुळे विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांत जनजीवन विस्कळीत होते. जोरदार पावसामुळे नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरते, तर घाट क्षेत्रांमध्ये भूस्खलन होण्याच्या घटना घडतात. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्याने सोयाबीन, कापूस, मका आणि फळबागांचे मोठे नुकसान होते. ज्यामुळे अनेक ठिकाणी ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले आहे. आता याच पार्श्वभूमीवर सरकारकडून तातडीने मदत दिली जावी, अशी मागणी केली जात आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी याबद्दल मोठी घोषणा केली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या शिर्डी दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. अमित शाह यांनी भाषणादरम्यान महाराष्ट्रातील अतिवृष्टीबद्दलही भाष्य केले. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर एकाप्रकारे इंद्रदेवाने यंदा संकट पाठवले आहे. ६० लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमीन आणि शेतीचे नुकसान झाले. २४-२५ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारकडून ३१३२ कोटी रुपये आम्ही महाराष्ट्र सरकारला दिले आहे. त्यातील १६३१ कोटी रुपये होते ते एप्रिल महिन्यातच पंतप्रधान मोदींनी दिले आहे, असे केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले.

कालच त्या तिघांनी माझ्यासोबत चर्चा केली

महाराष्ट्र सरकारने असे अनेक निर्णय घेतले आहेत, जेणेकरुन शेतकऱ्यांना मदत होईल. २२१५ कोटी रिलीफ फंड दिला. ज्यातून ३१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होईल. १० हजार रुपये रोख आणि ३५ किलो धान्यही महाराष्ट्र सरकारकडून दिले जात आहे. तसेच कर्जमाफीच्या वसूलीही रोखण्यास सांगितले आहे. ही महाराष्ट्रातील जी त्रिमूर्ति आहेत यातील कोणीही व्यापारी नाही. पण हे तिघेही व्यापारीपेक्षा जास्त आहेत. मला पद्मश्री पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बोलवलं आणि विचारले की भारत सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय करेल, कालच त्या तिघांनी माझ्यासोबत चर्चा केली आहे, असेही अमित शाहांनी म्हटले.

थोडासाही उशीर करणार नाही

मी मोदींच्या वतीने त्या तिघांना आश्वस्त केलं आहे की महाराष्ट्र सरकाराने आम्हाला सविस्तर रिपोर्ट पाठवावा, मोदी जी महाराष्ट्रातील शेतकऱ्याला मदत करण्यासाठी थोडासाही उशीर करणार नाही. हे सर्व यासाठी झालं आहे की महाराष्ट्रातील जनतेने शेतकऱ्यांचा विचार करणारे सरकार सत्तेत आणले आहे. आमच्या आमदारांनी एक महिन्याचे वेतन सीए रिलीफ फंडमध्ये दिले आहेत. तसेच आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कारखानाही मदत करणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे हात मजबूत करण्यासाठी अनेक ट्रस्ट समोर आल्या आहेत, असेही अमित शाह म्हणाले.