University of Health Sciences | समाजासाठी काय करू शकतो याचे चिंतन करा, कुलगुरू डॉ. कानिटकर यांचे आवाहन

| Updated on: Dec 25, 2021 | 4:13 PM

कुलगुरू डॉ. कानिटकर म्हणाल्या की, आपण ज्या समाजात राहतो त्यासाठी, आपण ज्या संस्थेत काम करतो त्यासाठी आणि आपल्या देशासाठी आपण काय करु शकतो यांचे चिंतन करण्याचा सुशासन दिन आहे.

University of Health Sciences | समाजासाठी काय करू शकतो याचे चिंतन करा, कुलगुरू डॉ. कानिटकर यांचे आवाहन
नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कार्यक्रमात कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी मार्गदर्शन केले.
Follow us on

नाशिकः समाज व देशासाठी आपण काय करू शकतो याचे चिंतन करा, असे आवाहन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष व सुशासन दिन निमित्ताने विद्यापीठातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, ओरिजिन फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप माने उपस्थित होते.

स्वतःमध्ये बदल घडवू…

कुलगुरू डॉ. कानिटकर म्हणाल्या की, आपण ज्या समाजात राहतो त्यासाठी, आपण ज्या संस्थेत काम करतो त्यासाठी आणि आपल्या देशासाठी आपण काय करु शकतो यांचे चिंतन करण्याचा सुशासन दिन आहे. या निमित्ताने विविध संकल्प करून समाजाच्या सकारात्मक वाटचालीकरिता प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. सुशासन दिनाच्या निमित्ताने नवनवीन गोष्टी आत्मसात करुन स्वतःमध्ये बदल घडवू. स्वतःला बदलले की समाज बदलेल व देशाची भरभराट होईल. आरोग्य आणि तणाव यांचे संतुलन राखण गरजेचे आहे, यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे, असेही त्या म्हणाल्या.

योग, प्राणायाम करा

ओरिजिन फाऊडेशनचे संस्थापक डॉ. संदीप माने यांनी तणाव मुक्ती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, शरीर आणि मन यांचा समन्वय साधने गरजेचे आहे. तणाव हा शरीरावर घातक परिणाम करतो. यासाठी नियमित योग व प्राणायम करणे गरजेचे आहे. नियमित संतुलित आहार आणि व्यायाम केल्यास तणाव कमी करता येतो. यासाठी मनाचा निर्धार आणि समाजात जागृती असणे गरजेचे आहे. जीवनशैलीत बदल केल्यास तणावापासून नक्कीच मुक्ती मिळेल. नियमित ध्यान व प्रार्थना केल्यास तणाव कमी होतो. विद्यार्थ्यांनी व सर्वांनी आभासी जगात जगू नका. प्रत्यक्ष जीवनातील सुख-दुःखाचे प्रसंगांचा अनुभव घेऊन निरामय आयुष्य जगावे, असे त्यांनी सांगितले.

वाजपेयी कवी मनाचे

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष व सुशासन दिन निमित्ताने विद्यापीठातर्फे पहिला कार्यक्रम घेण्यात येत आहे. माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वायपेयी यांच्या कवी गुणांचा त्यांनी उल्लेख केला. विद्यापीठातर्फे सुशासन दिनाच्या निमित्ताने यापुढे विविध चांगल्या संकल्पना व उपक्रम यांना प्राधान्य देण्यात येईल, त्यासाठी सर्वांनी सकारात्मक बदल करणे गरजचे असल्याचे त्यांनी सांगितले.

वाजपेयींना अभिवादन

कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वायपेयी यांच्या प्रतिमेला कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तणाव मुक्ती व्यवस्थापन विषयावरील व्याख्यानाचे यू-ट्यूब लिंकवरुन सदर कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. या ऑनलाईन व्याख्यानास विद्यापीठाचा अधिकारी वर्ग, संलग्नित महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

इतर बातम्याः

नाशिकमध्ये परवानगीविनाच भिर्रर्र…आयोजक सत्ताधारी शिवसेनेचे माजी आमदार, कोरोनाचे नियम पायदळी

Omicron | नाशिककरांच्या काळजाचा ठोका चुकला, कोरोनाचे रुग्ण 482 वर, जुन्या आठवणी ताज्या…

Rajesh Tope: राज्यात लॉकडाऊन कधी लागणार?; राजेश टोपेंनी सांगितलं नेमकं गणित