भर पावसात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन, अवकाळी पावसात नाना पटोले ओले चिंब

विदर्भात अवकाळी पाऊस सुरु आहे. रविवारी पाऊस सुरु असताना काँग्रेसने आंदोलन सुरु केले. पावसात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ओले चिंब झाले.पाऊस व सत्ताधारी यांच्यांविरोधात काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे, असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले.

भर पावसात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन, अवकाळी पावसात नाना पटोले ओले चिंब
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 26, 2023 | 3:23 PM

सुनील ढगे, नागपूर : सुरत सत्र न्यायालयानं राहुल गांधींना (Rahul Gandhi) शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली. त्याचे पडसाद राज्यात उमटत आहेत. राज्यात ठिकठिकाणी काँग्रेसकडून आंदोलने केली जात आहे. विदर्भात पाऊस सुरु असताना काँग्रेसने आंदोलन सुरु केले आहे. पावसात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आंदोलन केले.पाऊस सुरु असताना काँग्रेसचा संघर्ष सुरु आहे. आम्ही कुठलाही संघर्ष करायला तयार आहोत, असे सांगत नाना पटोले यांनी आपला निर्धार व्यक्त केला.

निसर्गही परीक्षा घेतोय

हे सुद्धा वाचा

नागपुरात भर पावसात काँग्रेसने सत्याग्रह आंदोलन सुरूच ठेवले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार भर पावसात कार्यकर्त्यांसह बसून सत्याग्रह करत आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी काही कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या होत्या. तर काहींनी मात्र पावसात ओलं होण्यातच आनंद मानला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आंदोलन दरम्यान आलेल्या अवकाळी पावसात ओले चिंब झाले. मात्र ते आपल्या आंदोलनाच्या निर्धारावर ठाम होते. निसर्गही आमची परीक्षा पाहत असल्याचे त्यांनी म्हटलेय. निसर्ग जरी आमची परीक्षा पाहत असला तरी सुद्धा आम्ही आमचा संघर्ष सुरू ठेवणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.

हवामान विभागाचा होता अंदाज

विदर्भात हवामान खात्याने आज पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. यात आज दुपारी अचानक वातावरणात बदल होत जोरदार पाऊस झाला. यात शहरातील काहो भागात 10 ते 15 मिनिट जोरदार पाऊस झाला तर काही भागात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. आज आणि उद्याही हवामान विभागानं पावसाच इशारा दिलाय.

दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलन

सुरत न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर दिल्लीत प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात दिल्लीत राजघाटावर संकल्प सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. देशभरात सर्वत्र काँग्रेसचे आंदोलन सुरु आहे. राहुल गांधींनी बड्या विद्यापीठातून पदवी घेतली आहे. तरीही तुम्हा त्यांना पप्पू म्हणून हिणवता. राहुल गांधी पप्पू नाहीये हे तुम्हालाही कळून चुकलं आहे. राहुल गांधींना जनता साथ देत आहे. राहुल गांधी यांनी संसदेत विचारलेल्या प्रश्नामुळे ते हादरून गेले आहेत, असं सांगतानाच आपल्या देशाचे पंतप्रधान घाबरट आहेत. ते अहंकारी आहेत. सत्तेच्या ढाली पाठी ते लपले आहेत. तुम्ही माझ्यावर केस दाखल करा, तुरुंगात पाठवा. पण सत्य बदलणार नाही. अहंकारी राजाला जनता उत्तर देणारच, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी यावेळी केला.

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.