AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाणे जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा,झाडे कोलमडली, घरांचे पत्रे उडाले

ठाणे जिल्ह्यासह राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. यवतमाळ येथे वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात झाडे कोसळून अपघात झाले आहेत.

ठाणे जिल्ह्यासह राज्यात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा,झाडे कोलमडली, घरांचे पत्रे उडाले
Unseasonal rains hit the state
| Updated on: May 07, 2026 | 6:22 PM
Share

राज्यातील ठाणे जिल्ह्यासह कल्याण- डोंबिवली, नाशिक, नंदूरबार, विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने थैमान घातल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्यामुळे अनेक जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिक-ठिकाणी घरांचे पत्रे उडाले आहेत. तर यवतमाळ येथील उमरखेड तालुक्यातील दराटी येथे वीज पडून श्रीनिवास राठोड (45) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली असून त्यात एक लहान मुलगा आणि एक महिला जखमी झाली असून त्यांना नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लावली असून धडगाव तालुक्यातील काकडदा आणि खामला परिसरात गेल्या अर्ध्या तासापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांच्या जखमांवर हा पाऊस मीठ चोळण्यासारखा असल्याचे म्हटले जात आहे.

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेच्या ठिकाण असलेल्या तोरणमाळला जोरदार पावसाचा हजेरी झाली आहे.गेल्या काही तासांपासून तोरणमाळला पाऊस सुरु असल्याने पर्यटकांची धावपळ झाली आहे. उन्हाच्या चटक्यापासून सुटका मिळवण्यासाठी आलेल्या पर्यटकांची या अचानक आलेल्या मुसळधार पावसाच्या अनुभव मिळाला आहे.निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांना सुरक्षित ठिकाण शोधताना चांगलीच कसरत करावी लागली आहे.

इगतपुरी तालुक्यात सतत दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. इगतपुरी, घोटी, तळेगाव, गावठा, काळुस्ते परिसरात जोरदार हवा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. नाशिकच्या बागलाण तालुक्याला अवकाळी पावसाने जोरदार तडखा दिला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेला आणि शेतात काढून ठेवलेला कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपला उन्हाळ कांदा शेतात काढुन ठेवला होता. मात्र, दुपारी अचानक हवामानात बदल झाल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळला. शेतात उघड्यावर पडलेला कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी ताडपत्री आणि प्लास्टिकच्या मदतीने कांदा झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली.

पालघरला तडाखा

पालघरच्या जव्हार, मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसाची दमदार हजेरी झाली आहे. पालघरच्या पूर्व भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी . अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे. वीट भट्टी उत्पादकांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला असला तरीउन्हाच्या उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

सिंधुदुर्गात विवाह सोहळ्यात अडथळे

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. वैभववाडी, फोंडा, करूळसह कणकवली तालुक्याच्या भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवसासाठी येलो अलर्ट जारी केला होता. ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाऱ्याचा वेग असेल असा अंदाज वर्तवला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विवाह सोहळ्यात आणि धार्मिक कार्यक्रमात पावसाने अडथळे आणले आहे. सायंकाळी ४ च्या सुमारास झालेल्या या पावसाने उकाड्यात काहीसा दिलासा मिळाला आहे.

महाड येथे जोरदार सरी

पोलादपूर बिरवाडीतही वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी झाली आहे. रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळला आहे. महाड लोणेरे माणगाव परिसरात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.महाडमध्ये ढगाळ वातावरणामुळे पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वांगणीत हाय टेन्शन वायरमध्ये पत्रा अडकला

मुसळधार पावसाने वांगणी आणि परिसराला झोडपून काढले आहे. त्यात एका घराचा पत्रा हाय टेन्शन वायरमध्ये अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असून नागरिक भयभीत झाले आहेत.वांगणी पश्चिमेकडील श्रीनगर भागात ही घटना घडली आहे. घराचा पत्रा हायटेन्शन वायरमध्ये अडकताच जीव वाचवण्यासाठी इथल्या रहिवाशांची धावाधाव झाली.

पावसाने ज्वारीच्या कडब्याचे नुकसान

नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी आज दुपारच्या सुमारास आवकाळणी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने आज नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला होता. सकाळ पासूनच आभाळ झाकोळुन आले होते दुपारच्या सुमारास हदगाव,तामसा , हिमायतनगर भागात पाऊस झाला. जिल्हयात अन्य ठिकाणी देखील पावसाच्या सरी बरसल्या. हदगाव , हिमायतनगर भागात वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस झाला. शहरात देखील पावसाने हजेरी लावलीये.

बीड -बीड जिल्ह्यातील काही भागात दुपारनंतर अचानक अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे.अवकाळी पावसामुळे बीड तालुक्यातील वडगाव कळसंबर परिसरात झेंडुच्या शेतीचे नुकसान झाले आहे. यापुर्वी झालेल्या पावसाने शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले होते यामुळे आज आणखी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

अमरावती जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला, अमरावती शहरासह ग्रामीण भागात तिवसा,मोर्शी तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली.अमरावती मधील शिरजगाव मोझरी, सालोरा आणी मोर्शी तालुक्यात जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी काढलेला कांदा, तीळ आणि भाजीपाल्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे, दुसरीकडे अवकाळी पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उन्हापासून दिलासा मिळाला आहे, आज सायंकाळी पुन्हा अमरावती जिल्ह्यात अशाच प्रकारे अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

यवतमाळ- यवतमाळमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने काही प्रमाणात उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान हे 40 डिग्री अंशांच्या पुढे होते.नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत होत्या. अशातच हवामान विभागाने दिलेल्या अंदाज नुसार 3 दिवसापासून वातावरणात बदल झाला आणि त्यानुसार आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसाने तीळ आणि ज्वारी पिकाला फटका बसणार आहे.

धाराशिव जिल्ह्याला पावसाचा तडाखा

धाराशिव जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा, कळंब परिसरात वादळीवारासह विजांच्या कडकडासह पाऊस कोसळला आहे.

कल्याण घरावर झाड कोसळले

कल्याण-डोंबिवलीत जोरदार पावसाने घरांचे पत्रे उडून रस्त्यावर आल्याची घटना घडली आहे. तसेच अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. कल्याण पश्चिमेतील रामदासवाडी परिसरात घरावर मोठे झाड कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे घराच्या छताचे आणि भिंतींचे मोठे नुकसान झाले घटनेवेळी घरातील सदस्य घरातच उपस्थित होते मात्र सुदैवाने सर्व सदस्य सुरक्षित बचावले.

कल्याणला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला आहे. झाडाची मोठी फांदी कोसळून तीन दुचाकी गाड्यांचे नुकसान झाल्याची घटना कल्याण पश्चिमेत साई शरणम गृहसंकुलात घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मुंबई  विमानतळाचे रनवे देखभालीचे काम पूर्ण

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (एमआयएएल) द्वारे संचालित छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (सीएसएमआयए) आपली वार्षिक रनवे देखभाल मोहिम यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यामुळे आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळ विमानांच्या उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. भारतातील सर्वात व्‍यस्‍त मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोन्ही रनवे नियोजित कामानंतर आता कार्यान्वित झाले आहेत. एअरलाइन्‍सना त्यांच्या उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल करण्यास मदत व्हावी यासाठी सहा महिने आधीच समन्वय या कामाची कल्पना देण्यात आली होती. या कामामुळे पावसाळ्यापूर्वीच विमानतळाच्या रनवेची देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. सकाळी ११:०० ते सायंकाळी ५:०० या सहा तासांच्या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली. यादरम्यान रनवे क्रमांक ०९/२७ (३४४८ मीटर) आणि रनवे क्रमांक ११४/३२ (२८७१ मीटर) यांची सखोल तपासणी करण्यात आली. आता हे दोन्ही रनवे पुन्हा पूर्णपणे कार्यान्वित झाले आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?