AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आता वडापाव विक्री बंदचा निर्णय, तुकाराम मुंढेंच्या आदेशाची तडकाफडकी अंमलबजावणी

Vadapav : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर अंबरनाथमधील प्रसिद्ध बबन वडापावने लहान मुलांना वडापाव, समोसा आणि भजी यांसारखे पदार्थ विकणे बंद केले आहे.

मोठी बातमी! आता वडापाव विक्री बंदचा निर्णय, तुकाराम मुंढेंच्या आदेशाची तडकाफडकी अंमलबजावणी
Vadapav selling ban to student in ambarnath NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 01, 2026 | 4:54 PM
Share

शाळकरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने जंक फूडच्या विक्रीवर निर्बंध आणण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आता अंबरनाथमध्येही सुरू झाली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर अंबरनाथमधील प्रसिद्ध बबन वडापावने लहान मुलांना वडापाव, समोसा आणि भजी यांसारखे पदार्थ विकणे बंद केले आहे. याबाबत दुकानाबाहेर फलकही लावण्यात आला आहे.

अंबरनाथमध्ये शाळकरी मुलांना वडापाव विकण्यास बंदी

समोर आलेल्या माहितीनुसार, शाळकरी मुलांना जंक फुडची विक्री करू नये, असा आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्यानंतर अंबरनाथमधील प्रसिद्ध बबन वडापावने लहान मुलांना वडा, समोसा, भजी देणं बंद केलंय. याबाबतचा फलकच दुकानाबाहेर लावण्यात आला आहे. त्यामुळे आता शाळकरी मुलांना वडापाव मिळणार नाही. अनेकांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्त्वाचे

बबन वडापाव हा अंबरनाथ शहरातला प्रसिद्ध वडापाव आहे. या वडापावची एक शाखा अंबरनाथ पश्चिमेच्या महात्मा गांधी शाळेबाहेर आहे. याठिकाणी इतर ग्राहकांना 15 रुपये, तर शालेय विद्यार्थ्यांना 10 रुपयात वडापाव दिला जायचा. मात्र तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर याठिकाणी लहान मुलांना कोणतेही खाद्यपदार्थ विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. यामुळं आर्थिक नुकसान होत असलं, तरी विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि शासनाचा निर्णय हे नफा-तोट्यापेक्षा महत्त्वाचं असल्याचं बबन वडापावचे मालक अमर पटेल यांनी सांगितलं आहे.

वडापाव खाल्ल्याने शाळकरी मुलांच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?

वारंवार वडापावसारखे जास्त कॅलरी आणि चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. वडापाव पोट भरतो, पण तो फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्य आणि इतर पोषक पदार्थांचा पर्याय नाही. मुलांच्या वाढीसाठी विविध आणि संतुलित आहार आवश्यक असतो. त्यामुळे वडापाव खाल्ल्यास पोषणाचा समतोल बिघडू शकतो.

वडापावसोबत चटणी, सॉस इत्यादी घेतल्यास एकूण सोडियमचे सेवन वाढू शकते. जास्त सोडियमचे सेवन केल्यास बीपीसी समस्या उद्भवू शकते. तसेच वडापाव तयार करताना स्वच्छता न राखल्यास आणि खराब तेल किंवा दूषित पाणी/कच्चा माल वापरल्यास अन्नातून होणारे आजार होऊ शकतात. त्यामुळे लहान मुलांनी वडापाव खाणे टाळणे गरजेचे आहे.

Follow Us
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला