AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaishnavi Hagawane: सुनेच्या मृत्यूनंतर हगवणेंच्या मागे लागली साडेसाती! आणखी एक काळं कांड उघड, थेट बंदुकीने…

वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहेत. हगवणेंचे काळे कांड रोज समोर येत आहेत. आता वैष्णवीचा पती शशांक आणि सासूविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे.

Vaishnavi Hagawane: सुनेच्या मृत्यूनंतर हगवणेंच्या मागे लागली साडेसाती! आणखी एक काळं कांड उघड, थेट बंदुकीने...
vaishnavi hagawaneImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jun 02, 2025 | 11:58 AM
Share

पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे प्रकरणात दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. वैष्णवीच्या आत्महत्येला कारणीभूत असलेले तिचा पती शशांक, सासूबाई, नणंद आणि सासरे हे सर्वजण पोलिस कोठडीत आहेत. त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, वैष्णवीचा नवरा शशांक आणि त्याची आई लता हगवणे यांचे एक नवं प्रकरण समोर आलं आहे. त्यांच्या विरोधात आणखी एक पोलीस तक्रार दाखल झाली आहे. आता नेमकं त्यांनी काय केलं जाणून घ्या…

नेमकी काय आहे तक्रार?

म्हाळुंगे पोलीस स्टेशनमध्ये वैष्णवी हगवणेचा पती शशांक आणि सासूबाई लता हगवणे यांच्याविरोधात जेसीबी विक्रीच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अडवान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेलं 11 लाख 70 हजार रुपये हगवणेंनी परत केले नाहीत. उलट पिस्तूलाचा धाक दाखवून ‘आता पैसे मागू नकोस, अन्यथा घरचे नीट राहणार नाहीत’ अशी धमकी दिल्याचे तक्रारीमध्ये म्हटले आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी हगवणेंचा जेसीबी जप्त केला आहे.

वाचा: लग्नाच्या रुखवतासाठी 1.5 लाख? हगवणे प्रकरणात सुपेकरांच्या बायकोचे देखील नाव, वाचा काय आहे कनेक्शन

महाळुंगे पोलीस घेणार ताब्यात

शशांक हगवणे आणि त्यांची आई लता हगवणे यांच्या दोघां विरोधात महाळुंगे पोलीस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवत फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. रोपी शशांक हगवणे,लता हगवणे यांनी ज्या जेसीबी संदर्भात फसवणूक केली होती तो जेसीबी महाळुंगे पोलिसांनी जप्त केला आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात येरवडा जेलमध्ये असलेला आरोपी शशांक हगवणे आणि त्याची आई लता हगवणे यांना महाळुंगे पोलीस जेलमधून काढून चौकशीसाठी ताब्यात घेणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता त्यांना येरवडा जेलमधून ताब्यात घेत खेड च्या न्यायालयात हजर करणार आहेत.

काय आहे प्रकरण?

मुळशी येथील वैष्णवी हगवणे या महिलेने सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली. 16 मे रोजी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली. मुलीने उचलल्या पाऊलानंतर वैष्णवीच्या वडिलांनी पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे, नणंद करिश्मा हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी हगवणे कुटुंबीयांना अटक केली आहे.

Follow Us
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं