हगवणे कुटुंबाचा हादरवणारा नवा कांड, ‘ही’ एक गोष्ट मिळवण्यासाठी…काय डाव रचला?
वैष्णवी हगवणे हिचा जाच करणाऱ्या हगवणे कुटुंबाचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. आता याच कुटुंबाचा एक धक्कादायक कांड समोर आला आहे.

Vaishnavi Hagawane Death Case : वैष्णवी हगवणेच्या मृत्यू प्रकरणात तिचे संपूर्ण सासरचे कुटुंब आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. तिचा मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यानंतर आता याच हगवणे कुटुंबाचे एक-एक कारनामे समोर येत आहेत. आता बंदुक मिळवण्यासाठी हगवणेंनी रचलेला नवा कांड समोर आला आहे.
हगवणे कुटुंबाचा नवा करानामा समोर
हगवणे कुटुंबाचा नवा कारनामा आता समोर आला आहे. त्यांनी पिस्तुलाचा परवाना मिळवा यासाठी वास्तव्याचा खोटा पत्ता दिला होता. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता निलेस चव्हाण याच्या पिस्तुल परवान्याचीही आता चौकशी सुरू आहे.
अन् पिस्तुल ठेवण्याचा परवाना मिळाला
मिळालेल्या माहितीनुसार शशांक आणि सुनिल हगवणे या दोघांनी पिस्तुल परवान्यासाठी पोलिसांची दिशाभूल केल्याचं समोर आलं आहे. 2022 साली हगवणे बंधूंना पिस्तुल ठेवण्याचा परवाना मिळाला. हगवणे कुटुंब पौडमध्ये राहतं. मात्र त्यांनी पिस्तुलाचा परवाना मिळावा यासाठी पुण्याचा पत्ता दिला. पुण्याच्या पत्त्यावर भाड्याने राहात असल्याचे दाखवत त्यांनी पिस्तुलाचे परवाने मिळवले.
निलेश चव्हाने त्याच पिस्तूलाने दिली होती धमकी
पोलिसांची दिशाभूल केल्याने आता हगवणे बंधुंचा पिस्तुल परवानाही रद्द करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती आहे. खोटा पुरावा दिल्याचे निष्पन्न झाल्यास हगवणे बंधूंवर या प्रकरणातही गुन्हा दाखल होऊ शकतो. हगवणे बंधूंसोबतच 2022 साली निलेश चव्हाणलाही पिस्तुलाचा परवाना मिळाला होता. निलेशने याच पिस्तुलाचा धाक वैष्णवीच्या कुटुंबीयांना दाखवला होता. नलेश चव्हाणच्या पिस्तुल परवान्याची सध्या चौकशी चालू आहे. त्यामुळे आता पुढे नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हगवणेंच्या वकिलाचा अजब युक्तिवाद
दरम्यान, दुसरीकडे वैष्णवी हगवणेचं मृत्यू प्रकरण सध्या न्यायालयात पोहोचलं आहे. सुनावणीदरम्यान हगवणे कुटुंबाच्या वकिलाने वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका घेतली आहे. ती दुसऱ्या मुलासोबत बालायची, असा युक्तिवाद हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केलाय. तसेच वैष्णवीमध्ये आत्महत्या करण्याची प्रवृत्ती होती. याआधी तिने दोन वेळा तसा प्रयत्न केला होता, असाही दावा वकिलाने केला आहे.
