AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राज्यात 3 जातीच्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार, सरकारचा तातडीचा निर्णय; थेट मंत्र्याने दिल्या सूचना

‘हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या तीनही जाती एकच आहेत’, असा निर्वाळा देत राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

मोठी बातमी! राज्यात 3 जातीच्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळणार, सरकारचा तातडीचा निर्णय; थेट मंत्र्याने दिल्या सूचना
vaishyavani obc certificateImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 09, 2026 | 6:32 PM
Share

‘हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या तीनही जाती एकच आहेत’, असा निर्वाळा देत राज्याचे ओबीसी मंत्री अतुल सावे यांनी विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे वैश्यवाणी जातीच्या नागरिकांना ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाचा दाखला देत मंत्री अतुल सावे यांनी या तिन्ही जातींचा एकच सामाजिक घटक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे संबंधित विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी वैश्यवाणी जातीच्या प्रमाणपत्रांच्या प्रकरणांमध्ये आयोगाच्या अहवालाचा विचार करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचा निर्णय

वैश्यवाणी समाजातील नागरिकांना ओबीसी प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळताना अनेकदा अडचणी येत असल्याची बाब समोर आली होती. हिंदू वैश्य, हिंदू वाणी आणि हिंदू वैश्य वाणी या नावांमुळे जात प्रमाणपत्र आणि जात वैधतेच्या प्रक्रियेत निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आता स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात या तिन्ही जाती एकाच असल्याचे नमूद करण्यात आल्याने संबंधित प्रकरणांमध्ये त्यानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे वैश्यवाणी समाजातील पात्र नागरिकांना ओबीसी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

या निर्णयामुळे शिक्षण, सरकारी नोकरी तसेच इतर शासकीय योजनांमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेला मोठी मदत होऊ शकते. विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून आता या संदर्भातील प्रकरणांची छाननी आयोगाच्या अहवालाच्या आधारे केली जाणार आहे. ओबीसी प्रवर्गातील वैश्यवाणी समाजासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्राच्या प्रश्नाला यामुळे दिशा मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा... - सूत्र
Eknath Shinde : रामदास कदमांना एकनाथ शिंदेंचा फोन? माध्यमांशी बोलणं टाळा; महायुतीतील वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न - सूत्र
पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
Navi Mumbai Water Crisis : पालिकेत पाणी कपातीवरून भाजप-शिवसेनेत जोरदार खडाजंगी
सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
Sushma Andhare : सुशील कुलकर्णीचा माज की उदयनराजेंची अवहेलना? अंधारेंचा सवाल
32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा....
Bhaskar Jadhav : 32 मिनिटांची क्लिप पुन्हा पुन्हा ऐकली; भास्कर जाधवांचा मोठा दावा, पुढे म्हणाले....
जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
Shrikant Shinde On Jarange Patil : जरांगेंना जो प्रश्न पडलाय, तोच मलाही..; श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया आली समोर, पुढे म्हणाले...
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया....
Shirkant Shinde On Audio Clip : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....
आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; जरांगेंनी सांगितली मराठा..
Manoj Jarange On Maratha : आंदोलन काही दिवस पुढे ढकललं तरी चालेल, पण…; मनोज जरांगेंनी सांगितली मराठा आरक्षण आंदोलनाची रणनीती
या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
Prasad Lad On Viral Audio Clip : या क्लिपचे रायटर, क्रिएटर... प्रसाद लाड यांनी नावच सांगून टाकलं
ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं...
Aditya Thackeray : ठाण्यातील निवासी भागातून AI डेटा सेंटर हटवा; आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; जरांगेंचा दावा
Manoj Jarange Patil : मोठं षडयंत्र उघड झालं, आता दोघेही माझ्या मागे लागतील; मनोज जरांगेंचा मोठा दावा, पुढे म्हणाले...