AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…म्हणून वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंच्या पीएचीही हत्या करायची होती, सनसनाटी आरोपाने खळबळ

वाल्मिक कराड याचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले आहेत, कराडला धनंजय मुंडे यांच्या पीएला देखील मारायचं होतं, असा आरोप बांगर यांनी केला आहे.

...म्हणून वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंच्या पीएचीही हत्या करायची होती, सनसनाटी आरोपाने खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 02, 2025 | 3:38 PM
Share

अजय काळुकटे, बीड प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे, वाल्मिक कराडच्या अडचणी आता आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले आहेत. वाल्मिक कराडला धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांना देखील मारायचे होते, असा आरोप विजयसिंह बांगर यांनी केला आहे. या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.

नेमकं काय म्हणाले बांगर? 

वाल्मिक कराड याचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी बोलताना सांगितले की धनंजय मुंडेंचे पीए प्रशांत जोशी यांनी वाल्मीक कराडचा फोन न उचलल्याने त्याचा इगो हर्ट झाला आणि त्याने मला सांगितले की आता प्रशांत जोशी याचा काटा काढायचा आहे. मी वाल्मिकला अनेक वेळा समजावून सांगितले, असा धक्कादायक खुलासा विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी वाल्मिक कराडवर अनेक आरोप केले आहेत. माझ्यासमोर वाल्मीक कराडने तिघांना मारलं, त्याचा मी साक्षीदार आहे. महादेव मुंडेंना मारल्यानंतर वाल्मीक कराडच्या टेबलवर त्याचं कातडं, हाड आणि रक्त आणून ठेवलं होतं. यानंतर वाल्मिक कराडने मारणाऱ्यांना शाबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट दिल्या, असा गौप्यस्फोट बांगर यांनी केला आहे.

मी वाल्मीक कराडचं काम करत नसल्याने आणि त्याचं ऐकत नसल्याने त्याने माझ्यासमोर पिस्तूल ठेवली आणि मला म्हणाला गोळी झाडून घे, किंवा तुझ्या शैक्षणिक संस्था मला दे नाहीतर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा टाकून तुला अडकवतो असा देखील धक्कादायक खुलासा यावेळी बांगर यांनी केला आहे.

याच दरम्यानन वाल्मिक कराडची एक कॉल रेकॉर्डिंग देखील त्यांनी ऐकवली,  त्यामध्ये कराड हा शिविगाळ करताना दिसत आहे. दरम्यान बांगर यांनी केलेल्या या गंभीर आरोपांनंतर आता कराडच्या अडचणीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.