वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, बीड पोलिसांचा मोठा निर्णय, ..तर कधीच सुटका नाही?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बीड पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.

वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात, बीड पोलिसांचा मोठा निर्णय, ..तर कधीच सुटका नाही?
Image Credit source: गुगल
| Updated on: Jul 04, 2025 | 3:36 PM

अशोक काळकुटे, प्रतिनिधी : महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे जुने सहकारी विजयसिंह बांगर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन कराडवर गंभीर आरोप केले होते. महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर हाडं आणि रक्त वाल्मिक कराडच्या टेबलावर होते.  वाल्मिक कराड याने मारेकऱ्याला शबासकी दिली आणि गाड्याही गिफ्ट केल्या, असा खळबळजनक आरोप विजयसिंह बांगर यांनी केला होता, या आरोपांमुळे चांगलीच खबळ उडाली.

दरम्यान विजयसिंह बांगर यांनी केलेल्या आरोपांनंतर आता बीड पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे.  परळीतील महादेव मुंडे यांची हत्या वाल्मिक कराडच्याच लोकांनी केली आणि महादेव मुंडेंचे मास हे वाल्मिक कराड समोर टेबलवर ठेवण्यात आले. यानंतर मारेकऱ्यांना वाल्मीक कराडने शाबासकी दिली आणि गाड्या गिफ्ट दिल्या असा आरोप विजयसिंह बांगर यांनी केला होता.

त्या संदर्भात आपण स्वतः तक्रार देणार आणि पोलीस अधीक्षकांना भेटणार असंही विजयसिंह बांगर यांनी सांगितलं होतं. मात्र अद्यापपर्यंत विजयसिंह बांगर यांनी आपली भेट घेतली नसल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दिली आहे. तर या संदर्भात तपास अधिकाऱ्यांना विजयसिंह बांगर यांच्याकडे काही पुरावे आहेत का? आणि त्यामध्ये काय तथ्य आहे?  याबाबत चौकशी करण्याचे तोंडी आदेश बीडच्या पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. दरम्यान जर पुरावे मिळाले तर तात्काळ कारवाई केली जाईल, असं पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी म्हटलं आहे, दरम्यान जर पोलिसांना या संदर्भात काही पुरावे मिळाले तर आता वाल्मिक कराडच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान याच पत्रकार परिषदेमध्ये बोलताना बांगर यांनी आणखी काही गंभीर आरोप वाल्मिक कराडवर केले होते. त्याच्यासोबत काम करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला. त्याने मला बंदूक दाखवून धमकावले देखील होते. तुमच्या शैक्षणिक संस्था मला दे असंही यावेळी वाल्मिक कराड यांने म्हटलं होतं, असा दावा बांगर यांनी केला होता. दरम्यान आता या प्रकरणात बांगर यांची चौकशी करण्यात येणार आहे.