आन तिरंगा शान तिरंगा, फडकत ठेवू नभांगणीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे नाशिक जिल्ह्यात जोरदार आयोजन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित राज्यभर विविध कार्यक्रम सुरू असून, नाशिक जिल्ह्यातही 9 नोव्हेंबरपर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आन तिरंगा शान तिरंगा, फडकत ठेवू नभांगणीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे नाशिक जिल्ह्यात जोरदार आयोजन
संग्रहित छायाचित्र.


नाशिक: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित राज्यभर विविध कार्यक्रम सुरू असून, नाशिक जिल्ह्यातही 9 नोव्हेंबरपर्यंत अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

डिसेंबर 1971 मध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला धूळ चारली. या विजयाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल देशभरात स्वर्णिम विजय वर्ष साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने नाशिक येथील तोफखाना केंद्रात येत्या नऊ तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात 1 नोव्हेंबर रोजी तोफखाना केंद्र ते पांडवलेणी पर्यंत सायकल रॅली काढण्यात येणार आहे. 2 नोव्हेंबर रोजी ओझर एअरफोर्स रॅली, 4 नोव्हेंबर रोजी भोसला स्कूलमध्ये कार्यक्रम होईल. 5 नोव्हेंबर रोजी पोलीस अकॅडमीत कार्यक्रम होईल, तर 6 नोव्हेंबर रोजी योद्ध्यांचा गौरव केला जाणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी आर्टिलरी म्युझियम येथे सांस्कृतिक कार्यक्रम, तर 9 नोव्हेंबर रोजी विजयी मशाल नाशिकहून महूकडे रवाना होणार आहे.

महासंचालकांनी घेतला आढवा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित होणाऱ्या विविध शासकीय कार्यक्रमांच्या तसेच शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्ताने विभागीय आणि जिल्हास्तरावरून प्रसिद्धीचे व्यापक नियोजन करण्याच्या सूचना माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महांसचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिल्या आहेत. नाशिक येथील विभागीय माहिती कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीस नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत (नाशिक), विलास बोडके (धुळे), माहिती अधिकारी अर्चना देशमुख, सहायक संचालक मोहिनी राणे, माहिती सहायक जयश्री कोल्हे, मनोहर पाटील, किरण डोळस, प्रवीण बावा उपस्थित होते.

कॉफीटेबल बुक करणार

यावेळी डॉ. दिलीप पांढरेपट्टे म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावाच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या विविध शासकीय कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी द्यावी. जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांवर लेख लिहिणे, स्वातंत्र्य सैनिकांच्या कामगिरीवर आधारित पुस्तिका अथवा कॉफीटेबल बुक तयार करण्याबाबत जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करण्यात यावी, जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांबाबत लेख लिहून प्रसिद्धी देताना जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनांचे सहकार्य घ्यावे. जिल्ह्यात स्वातंत्र्य संग्रामाशी निगडीत काही घटना, आंदोलने, मेळावे अथवा लढे उभारले असतील त्याविषयीचा इतिहास जाणून घेवून त्याबाबत देखील लेखांना व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्याचे नियोजन ऑगस्ट 2023 पर्यंत करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

इतर बातम्याः

एकाच दिवशी तब्बल 24 लाखांचे वीजबिल भरून जळगावचे 13 शेतकरी कृषिपंप थकबाकीतून मुक्त

730 कामगारांना कामावर कधी घेणार; BOSCH कंपनीला कामगार उपायुक्तांचा सवाल

उत्तर महाराष्ट्रात थंडी वाढली; जळगावमध्ये 12 अंश सेल्सियस नीचांकी तापमानाची नोंद

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI