AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शत्रू बाहेर नाही घरातच असतो… 32 कोटींसाठी फुलप्रूफ मर्डर प्लान, घडलं तरी काय? पोलिसांकडून मोठी अपडेट समोर

काही भयानक घडलं की आपण कायम बाहेरच्या लोकांवर संशय घेतो, पण खरा आरोपी आपल्याच बाजूचा आणि विश्वासू असतो... अता देखील असंच काही झाली, वसई येथे 32 कोटींसाठी फुलप्रूफ मर्डर प्लान करण्यात आला... याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांना अटक केली असून, कसून तपास सुरु आहे.

शत्रू बाहेर नाही घरातच असतो... 32 कोटींसाठी फुलप्रूफ मर्डर प्लान, घडलं तरी काय? पोलिसांकडून मोठी अपडेट समोर
| Updated on: Aug 01, 2026 | 12:06 PM
Share

कोणतीही घटना घडली की, आपण बाहेरच्या लोकांवर संशय घेतो. पण अनेकदा शत्रू आपल्या बाजूलाच असतो. पण त्या व्यक्तीवर आपला विश्वास असल्यामुळे तिच्याकडे आपण कधी संशयाच्या नजरेने पाहातच नाही. आता देखील असंच काही झालं. सांगायचं झालं तर, व्यवसाय कायम विश्वासाच्या जोरावर चालतो. पण वसई येखील व्यवसायिक नात्याची कहाणी अशी समोर आली की, जेथे विश्वासाची जागा 32 कोटी रुपयांनी घेतली. 32 कोटींची परडफेड टाळण्यासाठी एका उद्योजकाने त्याच्याच पार्टनरच्या मर्डरचा फुलप्रूफ प्लान तयार केला… सुरुवातील पार्टनरवर कोणालाच संशय आला नाही. पण पोलिसांनी सत्य अखेर शोधूनच काढलं…

हे प्रकरण डायमंड इंडस्ट्रियल इस्टेटमधील ‘जीएसएम फॉईल्स लिमिटेड‘चे (GSM Foils Limited) आहे. 24 जुलै रोजी, कंपनीचा पार्टनर मोहनसिंग लक्ष्मणसिंग परमार हे नेहमीप्रमाणेच परिसराबाहेर पडत असताना, मोटारसायकलवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. पहिली गोळी परमार यांना लागली. त्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपी फरार झाली. अखेर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कसून चौकशी केली आणि धक्कादायक सत्य समोर आलं.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी उद्योजकाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जेथे त्यांनी सर्जरी करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. सुरुवातीला हे प्रकरण व्यावसायिक स्पर्धेतून उद्भवल्याचे वाटत होतं, परंतु जसजसा तपास पुढे सरकला, तसतसा एक धक्कादायक आरोप समोर आला. वालीव पोलिसांच्या माहितीनुसार, या संपूर्ण कटाचा सूत्रधार एखादा बाहेरील शत्रू नसून खुद्द कंपनीतीलच एक भागीदार सागर गिरीश भानुशाली असल्याचं निष्पन्न झालं.

तपासात असं समोर आलं आहे की, शेअर बाजारात मोठं नुकसान आणि कर्जाचं डोंगर झाल्यानंतर सागर गिरीश भानुशाली याने मोहनसिंह परमार यांच्याकडून 32 कोटी रुपये घेतलेले. पोलिसांचा असा आरोप आहे की, जर मोहनसिंह यांची हत्या झाली असती तर, एवढी मोठ्या रकमेची परतफेड करावी लागली नसती आणि कंपनीवर असलेली त्यांची पकड देखील मजबूत झाली असती.

त्यानंतर, पोलिसांनी तांत्रिक तपास पद्धतीचा अवलंब केला. सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली, कॉल डिटेल रेकॉर्ड्स तपासले, डिजिटल व फॉरेन्सिक पुरावे गोळा केले गेले आणि खबऱ्यांकडून माहिती मिळवण्यात आली. या धाग्यांच्या आधारे पोलिसांचा तपास महाराष्ट्रातून थेट उत्तर प्रदेशपर्यंत पोहोचला. तिथे पोलिसांनी मुख्य संशयित शूटर सुजित देवेंद्रभाई पांडे याला, तसेच त्याचा साथीदार अनुप वीरेंद्र प्रजापती, शस्त्र पुरवठादार मनोज थथेरा आणि इतर आरोपींना अटक केली. या प्रकरणात गिरीश भानुशाली सोबत सात जणांना अटक केली असून पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे.

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा