अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे, नक्की चूक कुठे ते…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार पवार आज आपल्यात नाहीत, त्यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठी माहिती पुढे, नक्की चूक कुठे ते...
Ajit Pawar plane crash
| Updated on: Feb 05, 2026 | 12:43 PM

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अजित पवार यांचे निधन झाले, यावर कोणालाही विश्वास बसत नाहीये. मुंबईहून बारातमीला अजित पवार प्रचार सभेसाठी जात होते. 28 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या बारामतीमध्ये 4 सभा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीनिमित्त होत्या. अजित पवार बारामतीमध्ये येत असल्याने कार्यकर्ते विमानतळावर पुष्पगुच्छ घेऊन त्यांची वाट पाहत होते. मात्र, विमानतळाच्या काही अंतरावरच अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि या विमान अपघातात एकही व्यक्ती जिवंत राहू शकली नाही. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेकांनी शंका देखील उपस्थित केली. या विमान अपघाताचे व्हिडीओही पुढे आली. थेट विमान एका बाजूला अचानक कोलमडल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. या विमान अपघाताची चाैकशी देखील सुरू आहे.

अजित पवार यांचा विमान अपघात नक्की कसा झाला, याबद्दल मोठी माहिती पुढे येत आहे. विमान धावपट्टीजवळ पोहोचले होते, त्यावेळी धुके असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय जेव्हा पायलट विमान उतरवण्याकरिता प्रयत्न करत होता, त्यावेळी अॅंगल चुकला असल्याचाही अंदाज आहे. कारण धावपट्टीच्या अगदी शेजारी असलेल्या शेतात अजित पवार यांचे विमान कोसळले.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय यांनी विमानाचा ब्लॅक बॉक्सची ताब्यात घेतला. कॉकपिय व्हॉईस रेकॉर्डचा डेटा अगदी बारकाईने तपासला जात आहे. त्यामुळे स्पष्ट होईल की नक्की विमान अपघात ज्यावेळी झाला त्यावेळी काय झाले. कारण शेवटच्या क्षणी पायलटमध्ये काय संवाद झाला हे सर्व ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होते.

विमान उतरवताना पायलटचा धावपट्टीचा अंदाज चुकल्याचे सातत्याने सांगितले जात आहे. विमानातील एकही व्यक्ती वाचू शकला नाही. हैराण करणारे म्हणजे विमान अपघाताच्या काही मिनिटे अगोदरच अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यासोबत संवाद साधला होता. ज्याचे रेकॉर्डिंगही पुढे आले. या फोन संवादानंतर अगदी काही मिनिटांमध्ये भीषण विमान अपघात झाला. नेमके काय घडले हे देखील यादरम्यान प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.