Petrol-Diesel Price Today: विकेंडला गाडीने फिरायला जाण्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर
Petrol-Diesel Price Today: आज CNG च्या दरात बदल झाले तसेच पेट्रोल-डिझेलच्या दरात काही बदल झाले आहेत का हे गाडीची टाकी फुल करण्यापूर्वी जाणून घ्या.

देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांकडून दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे दर आणि इतर आर्थिक घटकांचा इंधन दरांवर परिणाम होत असतो. मात्र, आज वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे. कारण बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये मात्र दरांमध्ये किरकोळ वाढ नोंदवण्यात आली आहे. पुण्यात पेट्रोलच्या दरात 0.12 रुपयांची, तर डिझेलच्या दरात 0.11 रुपयांची वाढ झाली आहे. राज्यातील प्रमुख शहरांमधील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर नेमके काय आहेत हे जाणून घ्या.
महाराष्ट्रातील पेट्रोलचे आजचे दर
अहमदनगर – ₹112.41, अकोला – ₹111.78, अमरावती – ₹111.97, औरंगाबाद – ₹112.08, भंडारा – ₹112.81, बीड – ₹112.45, बुलढाणा – ₹112.63, चंद्रपूर – ₹112.58, धुळे – ₹112.19, गडचिरोली – ₹112.95, गोंदिया – ₹113.04, ग्रेटर मुंबई – ₹111.21, हिंगोली – ₹113.17, जळगाव – ₹112.57, जालना – ₹113.21, कोल्हापूर – ₹112.60, लातूर – ₹112.61, मुंबई – ₹111.21, नागपूर – ₹111.72, नांदेड – ₹113.18, नंदुरबार – ₹112.48, नाशिक – ₹112.24, धाराशिव – ₹112.45, पालघर – ₹112.04, परभणी – ₹113.16, पुणे – ₹112.02, रायगड – ₹111.46, रत्नागिरी – ₹113.17, सांगली – ₹112.44, सातारा – ₹111.88, सिंधुदुर्ग – ₹113.17, सोलापूर – ₹111.85, ठाणे – ₹111.31, वर्धा – ₹112.38, वाशिम – ₹112.63, यवतमाळ – ₹113.17.
महाराष्ट्रातील आजचे डिझेलचे दर
अहमदनगर – ₹99.06, अकोला – ₹98.48, अमरावती – ₹98.64, औरंगाबाद – ₹98.72, भंडारा – ₹99.47, बीड – ₹99.11, बुलढाणा – ₹99.28, चंद्रपूर – ₹99.26, धुळे – ₹98.84, गडचिरोली – ₹99.61, गोंदिया – ₹99.66, ग्रेटर मुंबई – ₹97.83, हिंगोली – ₹99.83, जळगाव – ₹99.20, जालना – ₹99.87, कोल्हापूर – ₹99.25, लातूर – ₹99.21, मुंबई – ₹97.83, नागपूर – ₹98.38, नांदेड – ₹99.83, नंदुरबार – ₹99.13, नाशिक – ₹98.89, धाराशिव – ₹99.11, पालघर – ₹98.66, परभणी – ₹99.83, पुणे – ₹98.66, रायगड – ₹98.11, रत्नागिरी – ₹99.83, सांगली – ₹99.11, सातारा – ₹98.53, सिंधुदुर्ग – ₹99.83, सोलापूर – ₹98.52, ठाणे – ₹97.97, वर्धा – ₹99.05, वाशिम – ₹99.28, यवतमाळ – ₹99.83.
